गणपतीच्या पाटाखाली राज्यघटना ठेवल्यानं अभिनेता प्रवीण तरडेवर टीकेची झोड, FB पोस्ट केली डिलीट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 02:15 PM2020-08-22T14:15:44+5:302020-08-22T14:19:19+5:30

Mulshi pattern fame Pravin tarde: प्रवीण तरडे यांनी घरच्या गणपतीची पुस्तकांचे मनोरे रचत प्रतिष्ठापना केली आहे. कल्पना चांगली होती मात्र, गणपतीच्या मूर्तीच्या पाटाखाली संविधानाची प्रत ठेवल्याने वादाला तोंड फुटले आहे.

Constitution of India book was placed under the Ganapati chair; Actor Praveen Tarde trolled | गणपतीच्या पाटाखाली राज्यघटना ठेवल्यानं अभिनेता प्रवीण तरडेवर टीकेची झोड, FB पोस्ट केली डिलीट

गणपतीच्या पाटाखाली राज्यघटना ठेवल्यानं अभिनेता प्रवीण तरडेवर टीकेची झोड, FB पोस्ट केली डिलीट

googlenewsNext

जगभरात गणपती बाप्पांचे आज मोठ्या भक्तीभावाने आगमन झाले आहे. कोरोना संकटामुळे अनेकांना डेकोरेशन करण्यासाठी फुले, साहित्य, तोरणे मिळालेली नाहीत. यामुळे काहींनी वेगवेगळ्या कल्पना लढवून त्यांच्या घरी बाप्पाचे स्वागत केले आहे. असेच स्वागत मुळशी पॅटर्न फेम अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांनी घरच्या बाप्पाचे केले आहे. मात्र, यावरून ते सोशल मीडियावर कमालीचे ट्रोल होऊ लागले आहेत. 


प्रवीण तरडे यांनी घरच्या गणपतीची पुस्तकांचे मनोरे रचत प्रतिष्ठापना केली आहे. कल्पना चांगली होती मात्र, गणपतीच्या मूर्तीच्या पाटाखाली संविधानाची प्रत ठेवल्याने वादाला तोंड फुटले आहे. या पुस्तकांच्या मनोऱ्यांवर विठ्ठल, संत तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज, श्रीकृष्णाची मूर्ती ठेवण्यात आली आहे. तरडेंच्या मनामध्ये मध्यभागी संविधान ठेवून मान देण्याची कल्पना असण्याची शक्यता आहे. मात्र, ती नेटकऱ्यांना काही आवडलेली नाहीय. 


एका फेसबुक युजरने तरडेंना केसांची वाढ झाल्याने मेंदूची वाढ खुंटली असेल, अशी खोचक टीका केली आहे. तसेच गणपती बाप्पा प्रवीण तरडेंना सद्बुद्धी दे असे आवाहन केले आहे. देशाच्या संविधानाचा अपमान केल्यावरून तरडे ट्रोल झाले आहेत. तरडेंनी मुद्दामहून असा खोडसाळपणा केला असल्याचे आरोप होत असून कारवाईची मागणी केली जात आहे. 

 

तरडेंनी टीका होत असलेली पाहून नंतर ती पुस्तक बाप्पाच्या फोटोची पोस्टच डिलीट केली आहे. मात्र, तोपर्यंत या पोस्टचे स्क्रीनशॉट सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते.
 

अन्य महत्वाच्या बातम्या...

लय भारी! SBI ATM येणार तुमच्या दारी; केवळ व्हॉट्सअ‍ॅप मॅसेज करावा लागणार

धक्कादायक! महिलेवर 143 जणांचा बलात्कार, लैंगिक अत्याचार; 42 पानी FIR दाखल

पंजाब बॉर्डरवर BSF ची मोठी कारवाई; पाच पाकिस्तानी घुसखोरांना ठार केले

अफाट संपत्ती! तीन किलो सोने, दोन किलो चांदी, नोटांच्या थप्प्या; टीडीपीच्या नेत्यावर सीबीआयचा छापा

शिबू सोरेन यांना कोरोना; झारखंड मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचीही होणार टेस्ट

सोनू सूदचे 'ते' ट्विटर खाते बनावट; म्हणाला ''लवकरच अटक होणार''

65 वर्षांची महिला, 14 महिन्यांत 8 मुलींना जन्म दिला; घोटाळेबाज बिहारमध्ये झाले शक्य

वंदे भारत! चीनला रेल्वेचा आणखी एक झटका; 1500 कोटी रुपयांची निविदा रद्द

Web Title: Constitution of India book was placed under the Ganapati chair; Actor Praveen Tarde trolled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.