शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणात संभ्रमावस्था

By admin | Updated: April 9, 2017 00:12 IST

एनआयआरएफतर्फे देशातील महाविद्यालयांना रँकिंग देण्यात येते. म्हणजे देशात कोणते महाविद्यालय, विद्यापीठ अथवा संस्था अव्वल आहे, हे ठरवण्यात येते.

- राजन वेळूकर एनआयआरएफतर्फे देशातील महाविद्यालयांना रँकिंग देण्यात येते. म्हणजे देशात कोणते महाविद्यालय, विद्यापीठ अथवा संस्था अव्वल आहे, हे ठरवण्यात येते. देशातील १०० महाविद्यालयांची यादी जाहीर करण्यात येते. एनआयआरएफतर्फे यंदा जाहीर करण्यात आलेल्या रँकिंगवर अनेक चर्चा रंगल्या. कारण या रँकिंगमध्ये अनेक महाविद्यालये पुढे गेली, तर काही नामांकित महाविद्यालये ही मागे पडली आहेत. त्यामुळे आता नॅक की एनआयआरएफ यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.देशात एकूण ७०० विद्यापीठे आहेत, पण त्यापैकी फक्त १०० क्रमांक एनआयआरएफतर्फे देण्यात आले. १००व्या क्रमांकावर असलेल्यांचे गुण इतके कमी आढळून आले आहेत की, त्यामुळे अन्य विद्यापीठांचे काय, हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे. देशातील शिक्षण संस्था आणि महाविद्यालयांचा दर्जा सुधारण्यासाठी आणि शिक्षणात समानता यावी, यासाठी सरकारतर्फे १९८४ साली नॅशनल एसेसमेंट अँड अ‍ॅक्रिडिएशन कौन्सिलची (नॅक) स्थापना करण्यात आली . नॅकतर्फे महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्थांची गुणवत्ता तपासून त्यांना ग्रेड (ए, बी, सी) देण्यात येतात. एखाद्या महाविद्यालयाला भेट देऊन, तिथल्या गोष्टींची, कागदपत्रांची तपासणी करून ग्रेड देण्यात येते. गेल्या दोन वर्षांपासून मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे ‘नॅशनल इन्स्टिट्यूशनल रॅकिंग फ्रेमवर्क’ (एनआयआरएफ)ची सुरुवात करण्यात आली.त्याप्रमाणे, ‘नॅक’तर्फे ग्रेड दिली जाते. ग्रेडमुळे एका श्रेणीत अनेक महाविद्यालयांचा समावेश असतो, पण क्रमांक दिल्यास एकाच महाविद्यालयाला एक स्थान मिळते, त्यामुळे त्याचा क्रम लावला जातो. एनआयआरएफतर्फे हे काम केले जाते. नॅकच्या ग्रेडिंगसाठी महाविद्यालयाला प्रत्यक्ष भेट दिली जाते, पण एनआयआरएफमध्ये महाविद्यालयांना स्वत:हून त्यांचे काम सबमिट करावे लागते. नॅकतर्फे ग्रेड देताना ७ निकषांचा विचार केला जातो. कॅरिक्युलर आस्पेक्ट, टीचिंग-लर्निंग अँड इव्हॅल्युएशन, रिसर्च-कन्सल्टंसी अँड एक्स्टेंशन, इन्फ्रास्ट्रक्चर अँड लर्निंग रिसोर्सेस, स्टुडंट सपोर्ट अँड प्रोगे्रशन, गव्हर्न्सन-लीडरशीप अँड मॅनेजमेंट, इनोव्हेशन अँड बेस्ट प्रॅक्टिस या सर्व बाबींचा लेखाजोखा मांडून ग्रेड दिली जाते. एनआयआरएफतर्फे टीचिंग लर्निंग अँड रिसोर्सेस (टीएलआर), रिसर्च अँड प्रोफेशनल प्रॅक्टिस (आरपीसी), ग्रॅज्युएशन आउटकम (जीओ), आउटरिच अँड इन्क्लुझिव्हिटी (ओआय) आणि परसेप्शन (पीआर) या बाबींवर मूल्यांकन केले जाते. हे निकष महाविद्यालय, विद्यापीठ स्वत: अर्जाद्वारे एनआयआरएफकडे पाठवतात. या अर्जांमध्ये दिलेल्या माहितीवर गुण देऊन क्रमांक देण्याचे काम करण्यात येते, पण यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळून येत असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. एनआयआरएफतर्फे यंदा जाहीर करण्यात आलेल्या अहवालात याच पाच निकषांवर देशातील १०० महाविद्यालायांची निवड करण्यात आली, पण या क्रमवारीत पहिल्या आणि शंभराव्या महाविद्यालयांच्या गुणांमध्ये असलेली तफावत खूप मोठी आहे. टीएलआरमध्ये पहिल्या क्रमांकाला ८३.११ गुण आहेत, तर शंभराव्या क्रमांकाला २२.६१ इतके आहेत. आरपीसीमध्ये पहिल्याला ८७.५९ तर शेवटच्या क्रमांकाला १.०४ आहेत. जीओला ९८.७१ तर शेवटच्या क्रमांकाला ३५.०८ आहेत. ओआयमध्ये ८६.४९ तर ३५.४४ मिळाले आहेत. पीआरला ८३.३३ आणि ०.०२ इतके कमी आहे. या सर्व आकडेवारीतील तफावत ही खूप मोठी आहे. पहिल्या क्रमांकात आणि शेवटच्या क्रमांकात असलेली तफावत पाहता, गुण कमी असल्याने याकडे विशेष गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. दोन क्रमांकात असलेली तफावत इतकी मोठी मानली, तर नक्की दोष कोणात आहे अथवा वास्तवात शिक्षण क्षेत्रात इतक्या मोठ्या प्रमाणात तफावत आहे का, याची उत्तरे शोधणे गरजेचे ठरते. विद्यापीठ, संस्थांच्या शिक्षण देण्यात इतकी तफावत असल्यास, शास्त्रशुद्धपणे मोठ्या प्रमाणावर कारणमीमांसा होणे गरजेचे आहे. एनआयआरएफ आणि नॅकमध्येही यामुळे तफावत दिसून येत आहेत. नॅकप्रमाणे ए अथवा ए प्लसमध्ये असणारी काही महाविद्यालये ही एनआयआरएफ क्रमवारीत अव्वल आहेत. याउलट जी नॅक ग्रेडिंगमध्ये कमी असलेली एनआयआरएफमध्ये काही ठिकाणी अव्वल ठरली आहेत. त्यामुळे आता एक संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. शिक्षण क्षेत्रात नक्की कोणते निकष खरे, त्याचा दर्जा किती, याविषयी चित्र स्पष्ट होत नाही.

(लेखक मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत.)शब्दांकन- पूजा दामले