शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

क्विक सर्व्हिसेसला भरपाईचे आदेश

By admin | Updated: June 27, 2016 02:28 IST

वॉरंटी कालावधीत फ्री व्हिजिट असूनही त्यासाठी चार्जेस आकारणाऱ्या क्विक सर्व्हिसेसने ग्राहकाला ७ हजार नुकसानभरपाई द्यावी, असे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिले आहेत.

ठाणे : वॉरंटी कालावधीत फ्री व्हिजिट असूनही त्यासाठी चार्जेस आकारणाऱ्या क्विक सर्व्हिसेसने ग्राहकाला ७ हजार नुकसानभरपाई द्यावी, असे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिले आहेत. ठाणे येथे राहणारे उदय कुलकर्णी यांनी १४ नोव्हेंबर २००७ रोजी १४ हजारांची वॉशिंग मशीन विकत घेतली. त्यानंतर, त्यांनी क्विक सर्व्हिसेसकडून आॅक्टोबर २०१३ ते २०१४ या कालावधीसाठी ३२४० रुपये देऊन होम केअर प्लान घेतला. जून २०१४ मध्ये कुलकर्णी यांच्याकडील मशीन पूर्णत: ब्रेकडाऊन झाली. त्यांनी क्विक सर्व्हिसेसला त्याची माहिती दिल्यावर त्यांच्या टेक्निशियनने घरी येऊन मशीनची तपासणी केली. सुटा भाग खराब झाला असून बदलण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले आणि व्हिजिट चार्ज ३५० रुपये मागितले. कुलकर्णी यांनी देण्यास नकार दिला, तर चार्ज न दिल्यास पुढील वेळी तक्रार घेतली जाणार नाही, असे त्याने सांगितले. त्यामुळे त्यांनी टेक्निशियनला ३०० रुपये दिले. मात्र, बेकायदेशीरपणे चार्जेस आकारल्याचे सांगून ती रक्कम परत देण्याची मागणी सर्व्हिसेसकडे केली. मात्र, कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे, अखेर कुलकर्णी यांनी क्विक सर्व्हिसेसविरोधात मंचाकडे तक्रार दाखल केली.कागदपत्रांची पडताळणी केली असता होम केअर प्लानसाठी क्विक सर्व्हिसेसला रक्कम भरल्याची तसेच वॉशिंग मशीनच्या व्हिजिट चार्जेसची पावती आहे. तर, प्लानच्या ब्रोशरमधील अटी आणि शर्तींनुसार वॉॅरंटी कालावधीत फ्री व्हिजिट नमूद आहे. त्यामुळे वॉरंटी कालावधीत चुकीच्या चार्जेसची आकारणी करून फसवणूक करणाऱ्या क्विक सर्व्हिसेसने कुलकर्णी यांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश मंचाने दिले आहेत.