शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
7
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
8
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
9
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
10
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
11
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
12
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
13
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
14
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
15
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
16
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
17
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
18
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
19
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
20
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल

‘मागेल त्याला शेततळे’ योजना ठरली कुचकामी!

By admin | Updated: September 15, 2016 01:45 IST

अमरावती विभागात शेततळ्यांचा लक्षांक १३, २१५; पूर्ण झाले केवळ ९८५.

सुनील काकडेवाशिम, दि. १४- 'मागेल त्याला शेततळे', असे गोंडस नाव देऊन राज्य शासनाने हाती घेतलेली शेततळ्यांची योजना जाचक व किचकट अटींमुळे अमरावती विभागात सपशेल अपयशी ठरली आहे. विभागातील पाच जिल्हय़ांना पहिल्या टप्प्यात देण्यात आलेल्या १३ हजार २१५ लक्षांकांपैकी ९८५ शेततळे पूर्ण करण्यात कृषी विभागाला यश मिळाले आहे. ७ डिसेंबर २0१५ रोजी नागपूर येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ह्यमागेल त्याला शेततळेह्ण योजनेची राज्यभरात अंमलबजावणी करण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार अमरावती विभागातील पाच जिल्हय़ांकरिता ३७ कोटी ४५ लाख रुपयांची तरतूद करून १३ हजार ९१५ शेततळे निर्माण करण्याचा निर्णय झाला. यात बुलडाणा जिल्हय़ात २६११ (७ कोटी ५५ लाख), अकोला २११0 (६ कोटी १0 लाख), वाशिम १८९२ (५ कोटी ५0 लाख), अमरावती ३१५९ (९ कोटी १0 लाख) आणि यवतमाळ जिल्हय़ाला ३४४३ (९ कोटी २0 लाख) शेततळे निर्माण करण्याचे 'टार्गेट' देण्यात आले. यासाठी ३१ मार्च ते १५ एप्रिल २0१६ दरम्यान शेतकर्‍यांकडून 'ऑनलाइन' प्रक्रियेच्या माध्यमातून अर्ज भरून घेण्यात आले. त्यानुसार १३ हजार २१५ शेततळ्यांसाठी कृषी विभागाला पाचही जिल्हय़ांमधून १३ हजार ९१५ अर्ज प्राप्त झाले आहेत. प्रत्यक्षात मात्र यातील केवळ ९८५ शेतकर्‍यांनाच पहिल्या टप्प्यात शेततळ्याचा लाभ देण्यात आला. यामुळे राज्य शासन तद्वतच कृषी विभागाची या योजनेप्रती असलेली उदासीनता चव्हाट्यावर आली असून, मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या या योजनेला सपशेल अपयश मिळाल्याचे सिद्ध होत आहे.जुन्याच योजनांची मोडतोडराज्यात सन २00९-१४ या पाच वर्षांत राष्ट्रीय कृषी विकास योजना व रोजगार हमी योजनेतून ९0 हजार शेततळी निर्माण करण्यात आली. शेततळ्यांसंदर्भातील याच चांगल्या योजनांची मोडतोड करून तद्वतच शेतकर्‍यांना देय असलेल्या अनुदानात मोठी कपात करून शासनाने 'मागेल त्याला शेततळे', ही केवळ ५0 हजार रुपये अनुदानाची योजना अमलात आणली. यामुळे शेतकर्‍यांनी योजनेकडे पाठ फिरविली.शेततळ्यांप्रती शेतकर्‍यांची नकारात्मक मानसिकताशेततळ्यांमध्ये साठून राहणार्‍या पाण्यामुळे शेती उत्पादनात कमालीची वाढ झाली. यायोगे शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावण्यास मोठी मदत मिळाली असून, शेततळ्यांची योजना शेतकर्‍यांना संजीवनी देणारी ठरली आहे, असा अभिप्राय अँग्रिकल्चर फायनान्स कार्पोरेशन (एएफ सी), मुंबई या त्रयस्थ संस्थेने शासनाला दिला होता. त्यानंतरही 'मागेल त्याला शेततळे', यासारखी तकलादू योजना हाती घेतल्याने शेतकर्‍यांमध्ये शेततळ्यांप्रती नकारात्मक मानसिकता निर्माण झाली आहे.'ऑनलाइन' प्रक्रियेने वाढविली डोकेदुखीग्रामीण भागात वास्तव्यास असलेले शेतकरी निरक्षर आहेत. असे असताना शेततळ्याचा लाभ घ्यायचा असेल तर ह्यऑनलाइनह्ण अर्ज सादर करण्याची अट घालण्यात आली. याशिवाय लाभार्थीच्या नावावर किमान 0.६0 हेक्टर जमीन असावी. यापूर्वी शासकीय योजनांमधून शेततळे घेतलेले नसावे. यासह इतरही अटींमुळे ही योजना अपयशी ठरली आहे.'मागेल त्याला शेततळे' योजनेचा विभागातील पाचही जिल्हय़ांमध्ये युद्धस्तरावर प्रचार-प्रसार करण्यात आला; मात्र शेतकर्‍यांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. प्राप्त 'ऑनलाइन' अर्जांमधून पात्र शेतकर्‍यांना शेततळ्यासाठी अनुदान दिले जात आहे.- व्ही.व्ही. चव्हाळे विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी, सहसंचालक कृषी कार्यालय, अमरावती.