शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

क्लस्टर आले हो अंगणी...

By admin | Updated: July 21, 2016 03:42 IST

सल्लागार नियुक्त करण्याची सूचना राज्य शासनाने केल्याने मंगळवारी झालेल्या महासभेत सल्लागार नियुक्त करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

मुरलीधर भवार,

कल्याण- कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत समूह विकास (क्लस्टर योजना) लागू केल्यास होणाऱ्या परिणामांचा अभ्यास (इम्पॅक्ट अ‍ॅसेसमेंट) करण्याकरिता सल्लागार नियुक्त करण्याची सूचना राज्य शासनाने केल्याने मंगळवारी झालेल्या महासभेत सल्लागार नियुक्त करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. येत्या दोन महिन्यांत सल्लागारांचा अहवाल प्राप्त झाल्यावर समूह विकासाचा नारळ फुटेल आणि महापालिका हद्दीतील ६५५ धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग प्रशस्त होण्याची आशा पल्लवित झाली आहे.कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत ६५५ इमारती धोकादायक आहे. त्यापैकी २९१ इमारती या अतिधोकादायक आहे. या इमारतींच्या पुनर्विकासासाठी महापालिकेने २.५ एफएसआय दिला होता. मात्र, अनेक इमारतींनी २ एफएसआयपेक्षा जास्तीचा एफएसआय वापरलेला आहे. त्यामुळे जास्तीच्या एफएसआयची मागणी केली जात होती. बिल्डर, जागामालक आणि धोकादायक इमारतीत राहणारे भाडेकरू यांच्यात एकमत नसल्याने व अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याने धोकादायक इमारतींचा विकास रखडलेला होता. धोकादायक अधिकृत इमारतींचा प्रस्ताव महापालिकेकडून पुनर्विकासासाठी मंजूर केला जात होता. त्यामुळे धोकादायक इमारतींची संख्या जास्त आणि केवळ ४० इमारतींचेच प्रस्ताव होते. इमारत नैसर्गिकरीत्या पडली तर भाडेकरूंचा घराचा हक्क बाद होणार. मात्र, महापालिकेने पाडल्यास भाडेकरूंचा हक्क अबाधित राहतो. धोकादायक इमारतींच्या विकासासाठी क्लस्टर योजनेंतर्गत चार एफएसआय दिला जाणार आहे. महापालिका क्षेत्रात एक ते सात सेक्टर आहेत. या सात सेक्टरपैकी सेक्टर एक व दोन या दोन सेक्टरच्या विकास योजनेला सप्टेंबर २००५ साली मंजुरी दिली. मंजुरी दिलेल्या सेक्टर एक व दोनचा विकास आराखडा आॅक्टोबर २००५ सालापासून अमलात आणला. उर्वरित सेक्टर तीन ते सात या पाच सेक्टरच्या आराखड्यास सरकारने एप्रिल २०१२ मध्ये मंजुरी दिली. मंजुरी दिलेला आराखडा जून २०१२ मध्ये अमलात आणला. क्लस्टर योजनेकरिता सेक्टर एक व दोन हे जुनी डोंबिवली परिसर आहेत. याठिकाणी ५ हजार चौरस मीटर क्षेत्रात क्लस्टर योजना लागू करता येणार आहे. सेक्टर तीन ते सात या परिसरात १० हजार चौरस मीटर क्षेत्राकरिता क्लस्टर योजना लागू करण्यात येणार असून वाढीव एफएसआय मिळणार आहे. चारचा एफएसआय मिळाल्यावर प्राप्त नागरी सुविधांवर त्याचा काय परिमाण होणार. अस्तित्वात असलेल्या लोकसंख्येची घनता व समूह विकास योजनेमुळे नागरी सुविधांवर पडणारा ताण किती, याचे मूल्यमापन या अहवालाद्वारे केले जाणार आहे. धोकादायक अधिकृत व अनधिकृत इमारतींच्या विकासाचा मार्ग समूह विकास योजनेमुळे मोकळा होईल, असा विश्वास महापौर राजेंद्र देवळेकर यांनी व्यक्त केला आहे. इम्पॅक्ट अ‍ॅसेसमेंट अहवाल राज्य सरकारला सादर केल्यावर त्यावर हरकती सूचना मागवल्या जातील. त्यानंतर, राज्य सरकारच्या नगरविकास खात्याकडून क्लस्टर योजनेला मंजुरी मिळेल. शिवसेना नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी सांगितले की, महापालिकेत क्लस्टर योजना लागू करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मात्र, महापालिका क्षेत्रात एका घराची किंमत स्टेशन परिसरात ७० लाख रुपये इतकी आहे. नागरिकांना क्लस्टरच्या सोबत परवडणाऱ्या घरांचाही पर्याय दिला पाहिजे. तसेच रेंटल हाऊसिंग स्कीमलाही मंजुरी दिली पाहिजे. परवडणाऱ्या घरांच्या योजनेतून नागरिकांना किमान २० ते ३० लाखांत कमी आकाराचे घर उपलब्ध होईल. ही योजना मार्गी लागल्यास महापालिका क्षेत्रात बेकायदा घरे होण्यास आळा बसेल. तसेच बेकायदा घरांच्या विक्रीतून सामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक थांबण्यास मदत होईल. >क्लस्टरअंतर्गत वाढीव एफएसआयक्लस्टर योजनेकरिता सेक्टर एक व दोन हे जुनी डोंबिवली परिसर आहेत. याठिकाणी ५ हजार चौरस मीटर क्षेत्रात क्लस्टर योजना लागू करता येणार आहे. सेक्टर तीन ते सात या परिसरात १० हजार चौरस मीटर क्षेत्राकरिता क्लस्टर योजना लागू करण्यात येणार असून वाढीव एफएसआय मिळणार आहे.धोकादायक इमारतींमधील नागरिकांकडून योजना लागू करण्यासाठी असलेला वाढता दबाव पाहता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यापाठोपाठ कल्याण-डोंबिवलीत क्लस्टर योजना लागू करण्यासाठी पाठपुरावा केला. ही मागणी महापौर देवळेकर यांनी एमएमआरडीएच्या बैठकीत, स्मार्ट सिटी शिखर परिषदेत आणि मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत नमूद केली होती, तर क्लस्टर योजना लागू न केल्यास उपोषण करण्याचा इशारा नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी दिला होता.