शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले
2
"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट
3
विमानांच्या इंजिनांचे आयुष्य किती असते? एअर इंडियाच्या विमानाला होती अशी इंजिने, जी...
4
५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?
5
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
6
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
7
गरमा गरम समोसे, गोड गोड जिलेबी की यम्मी पिझ्झा... आरोग्यासाठी काय आहे सर्वात घातक?
8
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
9
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
10
Lunchbox Recipe: दुधीची भाजी नको? ट्राय करा दुधीचे खमंग पराठे; करा झटपट, खा चटचट!
11
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
12
"इंग्लिश मीडियममध्ये शिकला, बायको ख्रिश्चन आणि हा म्हातारा...", 'बिग बॉस' फेम रीलस्टारने मराठीवरुन रितेश देशमुखला डिवचलं
13
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
14
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
15
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
16
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
17
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
18
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
19
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
20
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च

नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची

By admin | Updated: March 6, 2017 04:10 IST

महापालिकेला नागरिकांकडून कररुपाने चांगल्याप्रकारे निधी मिळतो

ठाणे : महापालिकेला नागरिकांकडून कररुपाने चांगल्याप्रकारे निधी मिळतो. नागरिक जसे कर देऊन आपले कर्तव्य बजावतात. तसेच कर्तव्य पालिकेनेही नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन बजावले पाहिजे. त्यासाठी परिणामकारक योजना राबविल्या पाहिजेत, असे मत ठाण्याचे निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त, तसेच महापालिकेचे माजी मुख्य सुरक्षा अधिकारी काशीनाथ कचरे आणि निवृत्त सहायक पोलीस आयुक्त राजा तांबट यांनी व्यक्त केले.नागरिकांच्या सूचना समजावून घेऊन त्याचा समावेश ठाणे महापालिका अर्थसंकल्पात करणार असल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांसह निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनीही समाधान व्यक्त केले. यात शहरातील चौकाचौकात क्लोज सर्किट टीव्ही (सीसीटीव्ही) योग्य ठिकाणी लावल्यास त्याचा चांगला परिणाम होईल. मार्केट, शाळा, महाविद्यालये, बँक आणि एटीएम केंद्राचे परिसर, मुख्य रस्ते, चौक जंक्शन, पादचारी पूल, रेल्वे आणि बस स्थानकांव्यतिरिक्त ओसाड जागीही सीसीटीव्ही असल्यास ते उपयुक्त ठरतील. त्यातून वाहन चोरी, महिलांची छेडछाड, खून, हाणामारीच्या प्रकारांवर नजर ठेवणे पोलिसांबरोबर पालिका प्रशासनालाही सोपे जाणार असल्याचे कचरे म्हणाले. एकदा लावलेल्या सीसीटीव्हींकडे पुन्हा लक्ष दिले जात नाही. तसे न होता, त्यांची देखभाल आणि त्यातून होणारी टेहळणी व्यवस्थित होते की नाही? याचा आढावाही पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी घेणे अत्यावश्यक आहे. सीसीटीव्हीतील संशयास्पद हालचालींची माहिती पालिकेच्या सुरक्षा अधिकाऱ्यांकडून पोलिसांना दिली गेली पाहिजे. डीव्हीआर आणि त्यासंबंधीच्या साधनसामुग्रीसाठी स्वतंत्र कक्षाची निर्मिती आवश्यक आहे. त्यातून शहरातील कोणत्याही भागात करडी नजर ठेवणे पालिका यंत्रणेलाही सोपे जाईल, असा दावा त्यांनी केला. शहरातील रस्त्यांवर मोकळेपणाने चालणे, हा नागरिकांचा अधिकार आहे. हा हक्क अबाधित राहण्यासाठी फेरीवाल्यांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करणे आवश्यक आहे. यासाठी ‘ना फेरीवाला क्षेत्रा’ची काटेकार अंमलबजावणी झाल्यास रस्ते बऱ्यापैकी मोकळे होतील. त्यावर नियंत्रणासाठी अतिक्रमण विरोधी पथकासारखे स्वतंत्र पथक तयार करुन तिथे आवश्यक तो निधी खर्च करता येईल, अशी सूचना त्यांनी केली. नागरिकांत मिसळून काम व्हावेजातीय आणि धार्मिक मुद्दयांवर दंगली होऊ नयेत म्हणून प्रत्येक पोलीस ठाण्यात मोहल्ला आणि शांतता कमिटी आहे. काही संभाव्य घटनाही त्यातून टाळता येतात. त्याच धर्तीवर पालिका प्रशासनानेही शांतता कमिट्यांची स्थापना करावी. सुरक्षेविषयी पालिका अधिकाऱ्यांनी जनजागृती करावी. पोलीस ज्याप्रमाणे नागरिकांमध्ये मिसळून काम करतात. त्याचप्रमाणे कर गोळा करणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांनीही सुरक्षिततेविषयी सोसायटी स्तरावर बैठका घेऊन कामे करावीत, असे कचरे म्हणाले.आगीपासून सुरक्षाप्रत्येक गृहसंकुलांमध्ये अग्निप्रतिबंधक अवजारे आणि जलवाहिनी लावलेली असते. यासाठी पालिकेच्या अग्निशमन विभागाने सोसायट्यांमध्ये तसेच मोठया हॉटेलांमध्ये जाऊन नियमित प्रात्यक्षिक देणे आवश्यक आहे. याबाबत प्रभाग अधिकारी स्तरावर सोसायटयांमध्ये अचानक पाहणी झाली पाहिजे, असा मुद्दा त्यांनी मांडला. (प्रतिनिधी)>‘सोसायट्यांची, उद्यानांची सुरक्षा तपासावी’