नवी मुंबई : प्रस्तावित मेट्रो प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील ओवळा गावातील शेतकऱ्यांना नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या धर्तीवर २२.५ टक्के विकसित जमिनीचे पुनर्वसन पॅकेज हवे आहे. यासंदर्भात या गावातील शेतकऱ्यांनी पालकमंत्री गणेश नाईक यांना साकडे घातले आहे.वडाळा ते कासार वडवली या प्रस्तावित मेट्रो मार्गाला अलीकडेच मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार एमएमआरडीएने कार्यवाहीसुद्धा सुरू केली आहे. या प्रकल्पाअंतर्गत ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील ओवळा गावाच्या हद्दीत ४0 हेक्टर जागेवर मेट्रो कारशेड उभारण्यात येणार आहे. त्यामुळे या गावातील शेकडो शेतकरी भूमिहीन होणार आहेत. त्यामुळे जागा संपादित करण्यापूर्वी पुनर्वसनाचा व मोबदल्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी लावून धरली आहे. शेकडो शेतकऱ्यांनी आज पालकमंत्री नाईक यांच्या वाशी येथील जनता दरबारात आपली कैफियत मांडली. (प्रतिनिधी)
मेट्रोबाधितांना हवाय पुनर्वसनाचा सिडको पॅटर्न
By admin | Updated: July 4, 2014 06:18 IST