शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
5
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
6
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
7
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
8
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
9
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
10
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
11
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
12
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
13
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
14
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
15
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
16
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
17
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
18
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
19
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
20
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...

बेहरामपाड्यात इमारत कोसळून ६ ठार; ५ जखमी

By admin | Updated: October 14, 2016 03:40 IST

वांद्रे पूर्वेकडील बेहरामपाड्यात गुरुवारी दुपारी चार मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ६ जण ठार तर ५ जण जखमी झाले. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची शक्यता

मुंबई : वांद्रे पूर्वेकडील बेहरामपाड्यात गुरुवारी दुपारी चार मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ६ जण ठार तर ५ जण जखमी झाले. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची शक्यता अग्निशमन दलाने वर्तवली आहे. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते.

आयेशा अकबर खान (१२), अली निसार अहमद खान (३), ओसामा निसार खान (१४), अफिफा सादाब (१), अरिबी सदर निसार खान (२), रुसुदा निसार अहमद खान (१६) अशी मृतांची नावे आहेत. तर दौलत शेख, झुल्फेखान निसार खान, साखिया निसार अहमद खान, अब्दुल सलाम शेख, इस्लाम इकबाल शेख अशी जखमींची नावे आहेत. वांद्रे पूर्वेकडील अनंत काणेकर मार्गालगत बेहरामपाडा ही वस्ती आहे. कोसळलेले बांधकाम हे नॅशनल शाळेजवळील आहे.

जागा रेल्वेची, नियोजन एमएमआरडीएकडे-

बेहराम पाड्यातील अनधिकृत मजल्यांच्या टॉवरची उंची दिवसेंदिवस वाढतच आहे. संबंधित प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. महत्त्वाचे म्हणजे जुहू येथे दुर्घटना घडली तेव्हा पालिका आयुक्त अजय मेहता यांनी रेल्वे प्रशासनाला पत्र पाठवत १४ फुटांवरील झोपड्यांवर कारवाई करण्याबाबतची विनंती केली होती. या घटनेला काही दिवस उलटत नाहीत तोच आता बेहरामपाडा येथे दुर्घटना घडली. कोसळलेले बांधकाम हे रेल्वे प्रशासनाच्या भूखंडावरील असून, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावर या परिसराची ‘प्लानिंग अ‍ॅथोरिटी’ म्हणून जबाबदारी टाकण्यात आली आहे.

उपचारापूर्वीच मृत्यू-

वांद्रे येथील भाभा रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी ६ वाजेपर्यंत या दुर्घटनेत जखमी झालेल्या ११ लोकांना रुग्णालयात आणण्यात आले. त्यापैकी ६ जणांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला होता.शोधकार्य सुरूचबांधकामाचा ढिगारा उपसण्यासाठी २ जेसीबी आणि ३० कामगारांची मदत घेण्यात आली. प्रत्यक्षात घटनास्थळी काम करण्यास अपुरी जागा असल्याने १० कामगार आणि अग्निशमन दलाच्या जवानांमार्फत शोधकार्य हाती घेण्यात आले होते.

दाटीवाटीचा परिसर-

गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हे चार मजली बांधकाम पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळले आणि परिसरात एकच घबराट उडाली. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. हा परिसर अत्यंत दाटीवाटीचा असल्याने सुरुवातीपासून अग्निशमन दलाच्या कार्यात अडथळा येऊ लागला. चिंचोळ्या गल्ल्या आणि अरुंद मार्गामुळे अग्निशमन दलाची अग्निरोधक उपकरणेही घटनास्थळी पोहोचण्यास अडथळा निर्माण झाला. अग्निशमन दलाचे जवान, महापालिकेचे कर्मचारी आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून स्थानिकांना दिलासा देत वेगाने मदतकार्य हाती घेतले. (प्रतिनिधी)