आष्टी (गडचिरोली) : विवाहाची जय्यत तयारी झाली... नवरदेवही विवाहमंडपात पोचला... लग्नघटिका समीप आली... तरी नियोजित वधूचा पत्ताच नव्हता. चौकशीअंती ती प्रियकरासोबत पळून गेल्याचे कळताच काही काळासाठी गोंधळ उडाला. मात्र ऐनवेळी मामाच्या मुलीने त्याला वरमाला घातली आणि हा विवाह पार पडला. चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील आष्टी गावात श्रीकांत मडावी याचा विवाह याच तालुक्याच्या शिवणी येथील एका युवतीसोबत ठरला होता. शुक्रवारी हा विवाह सोहळा होणार होता. नवरदेव श्रीकांत विवाहस्थळी पोहोचला; मात्र सायंकाळी ५ वाजेपर्यंत नियोजित वधू लग्नस्थळी आलीच नाही. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर वरासह उपस्थित मंडळींनी वधूची चौकशी केली असता ती दोन दिवसांपूर्वीच प्रियकरासह निघून गेल्याचे कळले. त्यानंतर वर श्रीकांत मडावी याने नातलगांसह झाल्या प्रकाराची तक्रार पोलिसांकडे नोंदवली. (वार्ताहर)
बोहल्यावर चढण्यापूर्वीच वधू पळाली
By admin | Updated: May 22, 2016 04:03 IST