शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

शहरांच्या विकासाची ‘ब्ल्यू प्रिंट’

By admin | Updated: August 22, 2014 01:39 IST

देशात झपाट्याने शहरीकरण होत आहे. हे संकट मानायचे, आव्हान मानायचे की एक संधी मानायची, हे ठरविले पाहिजे. आजवर शहरीकरण हे एक संकट मानले जात होते. यापूर्वी देशात विकासाचे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प : मेट्रो रेल्वे व पारडी उड्डाणपुलाचे भूमिपूजन नागपूर : देशात झपाट्याने शहरीकरण होत आहे. हे संकट मानायचे, आव्हान मानायचे की एक संधी मानायची, हे ठरविले पाहिजे. आजवर शहरीकरण हे एक संकट मानले जात होते. यापूर्वी देशात विकासाचे नियोजन झाले नाही. वाढती लोकसंख्या, वाहतूक, नागरी सुविधांचा विचार केला गेला नाही. आता मात्र शहरीकरण ही एक संधी मानून शहरांच्या विकासाची ‘ब्ल्यू प्रिंट’ तयार केली जाईल, असा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.कस्तूरचंद पार्क येथे गुरुवारी आयोजित कार्यक्रमात नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्प व पारडी उड्डाणपुलाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी राज्यपाल के. शंकरनारायणन, केंद्रीय शहरी विकास मंत्री वेंकय्या नायडू, केंद्रीय परिवहन व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पीयूष गोयल, महापौर आ. अनिल सोले, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, नगरविकास सचिव शंकर अग्रवाल, नासुप्रचे सभापती प्रवीण दराडे, महापालिका आयुक्त श्याम वर्धने उपस्थित होते. कार्यक्रम शासकीय असला तरी समोर हजारोंच्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित असल्यामुळे कार्यक्रमाला जाहीर सभेचे स्वरूप आले. मोदी हे नागपुरात पहिल्यांदाच एखाद्या जाहीर कार्यक्रमात बोलणार होते. त्यामुळे उपस्थितांमध्ये उत्सुकता होती. मोदींनी मराठीतून भाषणाला सुरुवात करीत उपस्थितांची मने जिंकली. सुरुवातीलाच त्यांनी नागपूरचा गौरव केला. ते म्हणाले, नागपूर ही संत्रानगरी आहे. शून्य मैलाचे शहर आहे. आता आम्ही या शहराला ‘मेट्रो सिटी’ अशी नवी ओळख देणार आहोत. नागपूर हे विदर्भाचे आर्थिक केंद्र आहे. त्यामुळे केंद्र सरकारने येथे मेट्रो रेल्वे सुरू करण्यास प्राधान्य दिले. मेट्रो रेल्वे हा एक ‘स्टेटस्सिम्बॉल’ आहे. आता देशाच्या नकाशावर आधुनिक शहरांमध्ये नागपूरचेही नाव येईल. बदलत्या काळात पर्यावरण संवर्धन ही नैतिक जबाबदारी आहे. लोकसंख्या वाढली की वाहने वाढतात. वाहतुकीची समस्या निर्माण होते. प्रदूषणात वाढ होते. त्यासाठी एकाच वेळी हजारो लोकांना प्रवास करता यावा, अशी व्यवस्था उभारणे गरजेचे आहे. त्यासाठीच मोठ्या शहरांमध्ये मेट्रो रेल्वे प्रकल्प उभारले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ंशहरीकरणाच्या गतीने १०० स्मार्ट सिटी करण्याची गरज आहे. प्रत्येक राज्यात अशी पाच ते सहा शहरे व्हावी. तेथे आर्थिक उलाढाल, तंत्रज्ञानाच्या सुविध उपलब्ध व्हाव्यात या दिशेने प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ५०० शहरांमध्ये कचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प मोदींनी त्यांच्या भाषणात सार्वजनिक स्वच्छतेवर भर दिला. ते म्हणाले, आपण सिंगापूर, दुबईत जातो व तेथील स्वच्छतेचे गोडवे गातो. येथे मात्र आपण कचरा करतो. महात्मा गांधींनी पाहिलेले स्वच्छतेचे स्वप्न आपल्याला साकारायचे आहे. यासाठी देशातील ५०० लहानमोठी शहरांची निवड करून तेथे पीपीपी मॉडेलवर घनकचरा व्यवस्थापन व सांडपाण्याचा पुनर्वापर करण्याचे अभियान राबवायचे आहे. कचऱ्यापासून कंचन बनविण्याचा विडा उचला. शहर स्वच्छ होईल. गोळा झालेल्या कचऱ्यापासून सेंद्रीय खत, वीज, गॅस मिळेल. हे खत गावातील शेतीसाठी द्या. शहरातील सांडपाणी स्वच्छ करून ते शेतीसाठी गावकऱ्यांना द्या. ही व्यवस्था आपल्याला विकसित करायची आहे. केंद्र सरकार लवकरच यासाठी योजना घेऊन येत आहे. नगरपालिका व महापालिकांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.