भगव्या लाटेने दिग्गजांना अक्षरश: भुईसपाट केले. शरद पवारांच्या बारामतीच्या गडालाही तडे गेले, मात्र हक्काच्या मतदानावर सुप्रिया सुळे विजयी झाल्या. पवार यांच्यासाठी सुप्रिया यांचा विजय आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे. पुण्यामध्ये भाजपाचे अनिल शिरोळे यांनी तीन लाखांहून अधिक मतांनी विजय मिळविला. कॉँग्रेसची विश्वजित कदम यांची उमेदवारीच चुकली असल्याचे सिद्ध झाले. मनसेचे दीपक पायगुडे यांना मते खाण्याची संधीही मिळाली नाही. मावळमध्ये लक्ष्मण जगताप यांनी स्वत:हून उमेदवारीस नकार दिल्याने राष्टÑवादीला पराभवाची चाहूल लागली होती. तेथे मतविभागणीत सेनेच्या श्रीरंग बारणे यांचा विजय सोपा झाला. शिरूरमध्ये सेनेचे शिवाजीराव आढळराव यांच्यासमोर आव्हानच नसल्याने ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. नगरमध्ये राष्टÑवादीने लावलेल्या ताकदीवर मोदी लाटेने एक हाती मात केली. त्यातून दिलीप गांधी यांचा विजय सुकर झाला. शिर्डी मतदारसंघात प्रस्थापित राजकारणाविरोधातील प्रक्षोभ भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पराभवातून व्यक्त झाला.
भगवी लाट, दिग्गज भुईसपाट
By admin | Updated: May 17, 2014 04:02 IST