शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

बडतर्फी मरणोत्तर ठरली बेकायदा!

By admin | Updated: July 14, 2017 04:50 IST

मुंबई उच्च न्यायालयाने आता २२ वर्षांनंतर व विशेष म्हणजे पै यांच्या निधनानंतर बेकायदा ठरवून रद्द केली आहे.

विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सिंडिकेट बँक या राष्ट्रीयीकृत बँकेने बी.पी. दयानंद पै या वरिष्ठ अधिकाऱ्याची केलेली बडतर्फी मुंबई उच्च न्यायालयाने आता २२ वर्षांनंतर व विशेष म्हणजे पै यांच्या निधनानंतर बेकायदा ठरवून रद्द केली आहे.दयानंद पै हे त्यांचे निवृत्तीचे नियत वय होईपर्यंत किंवा मृत्यूपर्यंत विनाखंड सेवेत होते असे मानून त्यांचे थकबाकीसह पेन्शन, प्रॉ. फंड व ग्रॅच्युईटीची रक्कम बँकेने त्यांच्या वारसांना तीन आठवड्यांत चुकती करावी, असा आदेश उच्च न्यायालयाच्या न्या. अमजद सय्यद व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने दिला.पै सिंडिकेट बँकेच्या नरिमन पॉइंट, मुंबई शाखेत सहायक महाव्यवस्थापक होते. त्यांनी बडतर्फीच्या विरोधात सन १९९८मध्ये याचिका केली होती. ती प्रलंबित असताना त्यांचे निधन झाले. त्यांची विधवा पत्नी सुशीला आणि जगदीश, सुधीर व राघवेंद्र यांनी त्यांच्या पश्चात हे प्रकरण पुढे चालविले. सुमारे २० वर्षे प्रलंबित असलेली ही याचिका खंडपीठाने अंतिम सुनावणीनंतर गुरुवारी मंजूर करून वरीलप्रमाणे आदेश दिला. पै आता हयात नसल्याने बडतर्फी रद्द झाली तरी त्यांना पुन्हा कामावर घेण्याचा प्रश्नच नव्हता. याच कारणाने त्यांच्या वकिलाने मागच्या पगाराचाही आग्रह धरला नाही.पै बँकेच्या त्या शाखेत अनिवासी भारतीयांना ‘पोर्टफोलियो मॅनेजमेंट’ सेवा देणाऱ्या विभागाचे काम पाहत. बँकेने त्यांना हेच काम निवासी भारतीयांसाठीही सुरू करण्यास सांगितले. पुढे सन १९९१-९२मध्ये हर्षद मेहताचा रोखे गैरव्यवहार उघड झाला. रिझर्व्ह बँकेने सर्वच बँकांना आपापले व्यवहार त्या अनुषंगाने तपासून पाहण्यास सांगितले. सिंडिकेट बँकेनेही तसे केले व पै यांनी ‘पोर्टफोलियो इन्व्हेस्टमेंट’मध्ये काही मर्जीतील ग्राहकांचा गैरफायदा करून दिला, असा ठपका ठेवून दोन खातेनिहाय चौकशा लावल्या. >बळीचा बकरा केला?खरेतर, रिझर्व्ह बँकेने एका चार्टर्ड अकाउंटंट फर्मला नेमून बँकेच्या या शाखेतील व्यवहारांची तपासणी केली होती. त्यात काही गैर आढळले नव्हते व पै यांनी गैरव्यवहारांस मदत केल्याचे तर मुळीच निष्पन्न झाले नव्हते. तरी कोणाला तरी ‘बळीचा बकरा’ करायचे म्हणून आपल्याला बडतर्फ केले गेले, असा पै यांचा आरोप होता. न्यायालयाच्या निकालाने त्यास एका परीने दुजोरा मिळाला.पै यांनी शिक्षेविरुद्ध याचिका केली होती. या चौकशीत बँकेने पै यांना बचावाची रास्त संधी दिली नाही व नैसर्गिक न्यायतत्त्वाचे उल्लंघन केले. त्यामुळे चौकशी कलुषित झाली, असा निष्कर्ष न्यायालयाने काढला. पै कुटुंबीयांसाठी अ‍ॅड़ रमेश राममूर्ती यांनी तर बँकेसाठी अ‍ॅड़ प्रकाश यू़ शिंदे यांनी काम पाहिले़