शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
3
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
4
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
5
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
6
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
7
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
8
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
9
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
10
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
11
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
12
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
13
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
14
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
15
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
16
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
17
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
18
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
19
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
20
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय

क्रीडापटूंच्या पायात बाबूगिरीची बेडी

By admin | Updated: September 7, 2015 02:45 IST

क्रीडा क्षेत्रातील अत्युच्च गुणवत्ताधारक १२ क्रीडापटूंना राज्य शासनाने चार वर्षांपूर्वी शासकीय सेवेत दाखल करून घेतले. मात्र ‘बाबूगिरी’ची घट्ट बेडी या क्रीडापटूंच्या पायात अडकल्याने क्रीडा क्षेत्रातील स्थान टिकवण्याकरिता कराव्या लागणाऱ्या सरावाकरिता त्यांना पुरेसा वेळ देता येत नाही

संदीप प्रधान, मुंबईक्रीडा क्षेत्रातील अत्युच्च गुणवत्ताधारक १२ क्रीडापटूंना राज्य शासनाने चार वर्षांपूर्वी शासकीय सेवेत दाखल करून घेतले. मात्र ‘बाबूगिरी’ची घट्ट बेडी या क्रीडापटूंच्या पायात अडकल्याने क्रीडा क्षेत्रातील स्थान टिकवण्याकरिता कराव्या लागणाऱ्या सरावाकरिता त्यांना पुरेसा वेळ देता येत नाही. सरावाकरिता सवलत देण्याची रेल्वेत असलेली तरतूद राज्य सरकारी सेवेत नसल्याने क्रीडापटूंची घुसमट होत आहे.राज्य सरकारच्या सेवेत श्रेणी-१च्या पदाकरिता पंकज शिरसाट (कबड्डी), धनंजय महाडिक (हॉकी), नवनाथ फडतरे (नेमबाजी), नरसिंह यादव (कुस्ती), नितीन घुले (कबड्डी), स्नेहल साळुंखे (कबड्डी), वीरधवल खाडे (जलतरणपटू), दीपिका जोसेफ (कबड्डी) या आठ जणांची तर श्रेणी-२च्या पदाकरिता दीपाली कुलकर्णी (पॉवरलिफ्टींग), सुहास खामकर (बॉडीबिल्डिंग), संदीप आवारी (पॉवरलिफ्टिंग), सतीश पाताडे (पॉवरलिफ्टिंग) या चार खेळाडूंची निवड करण्याचे आदेश ४ आॅक्टोबर २०११ रोजी देण्यात आले. अगोदर राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने व त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने खेळाडूंच्या अर्जांची छाननी करून त्यांची निवड केली. आशियाई व जागतिक स्तरावर गौरवास्पद कामगिरी बजावलेल्या खेळाडूंची निवड केली गेली.या क्रीडापटूंना सरकारने जबाबदारीची पदे दिल्याने बहुतांश क्रीडापटूंना आठ ते दहा तास सरकारी कामकाज करण्याकरिता द्यावे लागतात. स्नेहल साळुंखे या परळ येथील शिरोडकर शाळेतील क्लबतर्फे कबड्डी खेळतात. गेली तीन वर्षे त्यांची धारावी येथे जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती होती. दिवसभर कार्यालयात व्यस्त राहिल्यावर त्यांना सायंकाळी जेमतेम दोन तास सरावाकरिता वेळ मिळत होता. विवाह झाल्यावर कल्याणला राहायला गेलेल्या स्नेहल यांची महिनाभरापूर्वी रायगड जिल्ह्यातील अलिबागला बदली केली आहे. त्यामुळे सध्या सकाळी सात वाजता घर सोडणाऱ्या स्नेहल साडेदहा वाजता घरी पोहचतात. त्यांचे कब्बडी खेळणे बंदच झाले आहे.ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात सहाय्यक करमणूक कर अधिकारी पदावर काम करीत असलेले संदीप आवारी हे सकाळी साडेनऊ वाजता घर सोडताना सोबत पॉवरलिफ्टींगची सर्व साधनसामुग्री घेऊन बाहेर पडतात. ठाणे जिल्ह्यातून करमणूक कर वसुलीचे ११५ कोटी रुपयांचे उद्दीष्ट पूर्ण करण्याचे लक्ष्य त्यांच्यासमोर आहे. त्याच्या पूर्ततेकरिता त्यांना आठ तास द्यावे लागतात. त्यानंतर कार्यालयाजवळील जीममध्ये सराव करून रात्री अकरा वाजता ते घर गाठतात. मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाच्या संसदीय कार्य विभागात काम करणारे सतीश पाताडे हेही पावणेदहा ते साडेपाच सेवा बजावल्यावर सरावाकरिता मोकळे होतात. दुपारी सराव केला तर कार्यालयीन वेळेनंतर बसून त्यांना काम पूर्ण करावे लागते.