शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार, चकमकीत २६ नक्षली ठार
2
पाकिस्तानची वाटचाल लष्करी राजवटीच्या दिशेने...; असीम मुनीर बनले दुसरे फिल्ड मार्शल
3
पत्नी व्यभिचारी असल्यास तिला पोटगी मागण्याचा हक्क उरत नाही : उच्च न्यायालय
4
सोनं पुन्हा १ लाखाच्या जवळ? चांदीही ३००० नी महागली, तुमच्या शहरातील दर काय?
5
कलरफुल देश म्हणत ज्योती मल्होत्राचं पाकिस्तान प्रेम उफाळून आलं; डायरीत तिनं आणखी काय काय लिहिलं?
6
'या' शाही हॉटेल्सचा येतोय IPO, ग्रे मार्केटमध्येही घालतोय धुमाकूळ; गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी!
7
सिंधू नदीच्या पाण्यावरुन पाकिस्तानमध्ये गोंधळ; लोकांनी मंत्र्यांचं घरच जाळलं
8
Suicide Blast: पाकिस्तानमध्ये धक्कादायक प्रकार! शाळेच्या बसवर दहशतवादी हल्ला, ४ लहान मुलांचा मृत्यू, ३८ जखमी
9
नागपूरची मराठमोळी लेक थेट कान्स फेस्टिव्हलमध्ये झळकली, ग्लॅमरस लूक करुन लुटली लाइमलाइट
10
'हेरा फेरी ३'च्या आधीही बाबूरावने अक्षय कुमारला दिलेला गुलीगत धोका; या सिनेमाला दिलेला नकार
11
“PM मोदी धाडसी नेतृत्व, पाकिस्तानाने भारतात समस्या निर्माण केली”; आफ्रिकेतील देशाचा पाठिंबा
12
१४,००० मुले उपाशी; २२ देशांचा इस्रायलवर दबाव, इस्रायलवर निर्बंध लागू करण्याचा दिला इशारा
13
Operation Sindoor : 'आधी जीव वाचवा, चौक्या नंतर बांधू'; भारतीय सैन्याच्या कारवाईला घाबरून पाकिस्तानी कमांडर मशिदीत लपला होता
14
“PM मोदींची प्रशंसा, शरद पवार आता भाजपामय होताना दिसत आहेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
15
ऑपरेशन सिंदूर दरम्यान ज्योतीने पाकिस्तानला पुरवली 'ही' माहिती; दानिशसोबत होती संपर्कात!
16
पाकचे गिरे तो भी टांग उपर; लष्करप्रमुख मुनीरचे प्रमोशन, फिल्ड मार्शल पदावर बढती; 
17
तरुणांना नोकरीची मोठी संधी! सुझुकी 'या' राज्यात उभारणार १२०० कोटी रुपयांचा प्लांट
18
Astrology: राहू केतूचे संक्रमण होणार, कोरोना परत थैमान घालणार? काय सांगते ग्रहस्थिती?
19
हृदयद्रावक! लग्नात आक्रित घडलं, खेळताना कारमध्ये लॉक झाली ४ मुलं; झाला मृत्यू, ६ तासांनंतर....
20
लग्न नको म्हणून तमन्नाशी केलं ब्रेकअप, आता अभिनेत्याने मुंबईत घेतला सी फेसिंग फ्लॅट

अपंग अशोकची ‘एव्हरेस्ट भरारी’

By admin | Updated: May 21, 2016 17:06 IST

अशोक रामलाल मुन्ने या तरुणाने अपंगत्वावर मात करत जिद्द, परिश्रम आणि तपश्चर्येच्या जोरावर कठीण असे एव्हरेस्ट शिखर पार केले

गणेश खवसे - 
 
आकांक्षापुढे शिखरही ठेंगणे : जिद्दीला मिळाली यशाची किनार
 
नागपूर, दि. 21 - नियतीच्या एका डावामुळे अपंगत्व आले. मात्र त्यातून स्वत:ला सावरत दृढनिश्चयच जणू अंगी बाळगला आणि पाहता -पाहता जिद्द, परिश्रम आणि तपश्चर्येच्या जोरावर कठीण असे एव्हरेस्ट शिखर पार केले. अशोक रामलाल मुन्ने (३२) असे या ध्येयवेड्या आणि चिकाटी असलेल्या तरुणाचे नाव असून तो मुळचा मूर्ती (ता. काटोल, जि. नागपूर) येथील रहिवासी आहे. विशेष म्हणजे, अपंग म्हणून एव्हरेस्ट सर करणारा अशोक हा भारतातील दुसरा व्यक्ती आहे.
 
अशोक हा तसा जन्मत: सर्वसामान्यच. मात्र २००८ मध्ये रेल्वेने प्रवास करीत असताना तो खाली पडला. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाल्याने हॉस्पिटलध्ये भरती केले. तेथील डॉक्टरांनी त्याचा पाय कापण्याचा सल्ला दिला. त्यानुसार पाय कापावा लागला. हॉस्पिटलमधून सुटी झाली आणि जणू पुनर्जन्म झालेलाच अशोक परतला. जिद्द, आत्मविश्वास अंगी बाळगलेल्या अशोकने आपणही इतरांसारखे सर्वसामान्य जीवन जगत सर्वांपेक्षा काही हटके करण्याचा दृढनिश्चय केला. त्याचवेळी म्हणजे २००९ मध्ये कृष्णा पाटीलने एव्हरेस्ट शिखर सर केले. ही बातमी त्याच्या कानावर पडताच त्यानेही ‘एव्हरेस्ट’ सर करण्याचा ‘इरादा पक्का’ केला. 
 
(औरंगाबादच्या पोलिस कॉन्स्टेबलने सर केले ' एव्हरेस्ट शिखर')
 
अपंग असल्याने ब-याच अडचणी येणार याची कल्पना असल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी त्याने मार्शल आर्ट कराटे ट्रेनिंग करून ब्लॅक बेल्ट प्राप्त केले. सायकल चालविणे, सुरवातीला दोन नंतर सहा किमीपर्यत दौड, मोटारसायकल चालविणे, कार, ट्रॅक्टर चालविणे अशी सर्वसामान्यांशी निगडित दिनचर्या त्याने सुरू ठेवली. अपंगत्व आल्यामुळे रोजगार नाही; मात्र एका वीटभट्टीवर बेरोजगारासारखा जाऊन तेथील मालकाशी मैत्री वाढवून या व्यवसायाचे ज्ञान प्राप्त केले. यानंतर अशोकनेही स्वत:ची वीटभट्टी सुरू केली. इथवरच तो थांबला नाही, तर शेतात राबून भाजीपाल्याचे उत्पादन घेतले. याच काळात त्याने इच्छेची पूर्तता करण्यासाठी मूर्ती या गावाजवळच्या आनंदगड (चिखलागड) या टेकडीवर चढणे सुरू केले. त्यात त्याला यशही आले. 
 
गावाजवळच्या मोठ्या टेकडीवर चढल्यामुळे अशोकचा आत्मविश्वास वाढला. यामुळेच त्याने सातपुडा पर्वतातील सर्वात कठीण चढाई असलेला निशानगड चढण्याचा मनोदय ठरविला. यानुसार त्याने ऑगस्ट २०१० आणि ऑगस्ट २०११ मध्ये तो पर्वत पार केला. जगावेगळे काहीतरी करण्याच्या ध्येयाने झपाटलेल्या या तरुणाने नंतर निशानगडनजीकचा ४५ किमी परिसर पायी पिंजून काढला. तसेच कार नदी प्रकल्पाची ६५ अंश कोनातील भिंतीची चढाई केली. २९ ऑक्टोबर २०११ रोजी पातालकोट (मध्यप्रदेश) जंगलातील ७० किमी परिसर आणि पहाड फिरला. यानंतर त्याच वर्षी १५ नोव्हेंबरला महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कळसूबाई (१६४६ मीटर) सर केले. अशोकला जिम्नॅस्टिक, स्विमिंग, माउंटेनिंग, मार्शल आर्ट (कराटे), अ‍ॅडव्हेंचर, रॉक क्लायमिंग, योगा आदींमध्ये आवड आहे. 
 
(महाराष्ट्र कॅडर चे IPS अधिकारी सुहेल शर्मा एन्हरेस्टवर)
 
अपंगांमध्ये अशोक भारतातून दुसरा
आशिया खंडातून अशोक मुन्ने याच्यापूर्वी नेपाळचा सुदर्शन गौतम (२० मे २०१३) आणि भारताची अरुनिमा सिन्हा (२१ मे २०१३) या अपंग व्यक्तींनीही माऊंट एव्हरेस्ट शिखर सर केले. अरुनिमानंतर एव्हरेस्टवर जाणारा भारतातील तो दुसरा असून पुरुषांमध्ये पहिला आहे. सुदर्शन गौतमने ५७३२ मीटर, अरुनिमाने ८८४८ मीटर तर अशोकने ८५०० मीटर उंच शिखर पार केले.
 
 
निसर्गाची आडकाठी; तरीही मिशन फत्ते!
जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या एव्हरेस्टवर चढण्याचा बेत अशोकने २०१२ मध्येच केला होता. ‘१२-१२-१२’ असा योग साधून त्याने ‘मिशन एव्हरेस्ट’ सर करण्याचे ठरविले होते. मात्र त्यावेळी त्याचे प्रशिक्षण पूर्ण झालेले नव्हते. कमी तापमानात राहण्यासाठीही तो परिपक्व नव्हता. त्यामुळे १२-१२-१२ चा योग जुळून आला नाही. त्यानंतर तीन वर्षांआधीही त्याने नियोजन केले होते. परंतु महाप्रलय आल्याने त्याला अपयश आले. मात्र निसर्गाच्या आडकाठीने अपयशी न होता त्याचा संघर्ष सुरूच होता. अखेर २०१६ मध्ये त्याने एव्हरेस्ट सर करून सर्वांना आश्चर्यकारक आणि सुखद असा धक्का दिला. 
 
आर्थिक मदतीसाठी ‘लोकमत’चा पुढाकार
एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी किमान ३२ लाखांचा खर्च अपेक्षित होता. यासाठी त्याने अनेकांची दारे ठोठावली. बºयाच ठिकाणी त्याचा अपेक्षाभंग झाला. याचदरम्यान त्याचा हा संघर्ष ‘लोकमत’ने जगासमोर आणला आणि पाहता - पाहता त्याला आर्थिक मदतीचा ओघ सुरू झाला. याबद्दल त्याने ‘लोकमत’चे आभार मानले होते. या मदतीनेच त्याला एव्हरेस्ट सर करण्यासाठी हातभार लागला.