शहरं
Join us  
Trending Stories
1
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
2
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
3
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
4
जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा
5
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, १ तासांत सर्व GR काढा, मग अंतिम निर्णय सांगतो: मनोज जरांगे पाटील
6
रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द
7
श्रीसंतची दुखापत अन् RR फ्रँचायझीचा ८२ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा! विमा कंपनीची सर्वोच्च न्यायालयात धाव
8
Manoj Jarange: मनोज जरांगे आजच उपोषण सोडणार? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली...
9
Pitru Paksha 2025: गणेशोत्सवानंतर लगेचच पितृपक्ष का? ९० टक्के लोकांना माहीतच नाही खरे कारण!
10
"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
11
मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! अंतिम मसुदा घेऊन सरकारचे ४ मंत्री मनोज जरांगेंच्या भेटीला
12
Viral Video : गर्लफ्रेंडचा फोन सतत लागत होता व्यस्त, संतापलेल्या बॉयफ्रेंडनं काय केलं बघाच!
13
Maratha Protest: मनोज जरांगे यांच्या पत्नी आणि मुलांचाही अन्नत्याग; मुलगी म्हणाली...
14
८ वर्षांपूर्वी गायब झालेला 'रीलस्टार' पती, सतत शोध घेत होती पत्नी! आता समोर आलं धक्कादायक सत्य
15
शेअर बाजारापेक्षा जास्त परतावा देणारी सरकारी योजना; EPF का ठरत आहे सरस? संपूर्ण गणित समजून घ्या
16
Video: आझाद मैदान परिसरात तणावाची स्थिती, आंदोलकांनी वाट अडवली; पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली
17
Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीला का बांधला जातो अनंताचा धागा? हे व्रत गणेशाचे नाही तर... 
18
नाशिकच्या राहुल धोत्रे हत्या प्रकरणातील फरार दोघांना बेड्या, पोलीस माजी नगरसेवक निमसेच्या मागावर
19
भाक्रा धरणापासून एअरबेसपर्यंत पाकिस्तानला दिली माहिती; प्रसिद्ध युटयूबर विरोधात आरोपपत्र दाखल
20
"पूर नव्हे, हा तर देवाचा आशीर्वाद"; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी जनतेला दिला अजब सल्ला! म्हणाले...

कोकमनंतर दापोलीतील महाजनांचा आता चिंचेवरचा ‘सोडा’

By admin | Updated: November 17, 2014 23:24 IST

भविष्यात कोकणातील दुर्लक्षित फळांच्या रसापासून सोडा बनवून फळांना दर्जा प्राप्त करुन देण्याचा प्रयत्न असल्याचे प्रगतशील शेतकरी विनय महाजन यांनी सांगितले.

शिवाजी गोरे - दापोली --मुंबईत शीतपेयाच्या कंपनीत काम करताना पाहिलेले दृश्य थक्क करणारे होते. शीतपेयामुळे लोखंडाच्या पार्टवर पडलेले छिद्र पाहून मन सुन्न झाले. त्यातूनच शरीराला हानिकारक नसलेली पेय बनवण्याचा निर्णय घेतला. २० वर्षांपूर्वी गावाकडे येऊन दुर्लक्षित कोकमापासून कोकम सोडा तयार केला. कोकम सोड्याला मिळालेला प्रतिसाद पाहून २० वर्षांत विविध प्रयोग केले. आत चिंचेपासून सोडा बनविला असून, भविष्यात कोकणातील दुर्लक्षित फळांच्या रसापासून सोडा बनवून फळांना दर्जा प्राप्त करुन देण्याचा प्रयत्न असल्याचे प्रगतशील शेतकरी विनय महाजन यांनी सांगितले.कोकणात आंबा, काजू, फणस, करवंद, जांभूळ, आवळा, कोकम ही फळे मोठ्या प्रमाणावर उत्पादीत होतात. मात्र, दरवर्षी आंब्याचे गडगडणारे दर पाहून शेतकऱ्याला कवडीमोल किमतीने आंबा विकण्याची वेळ येते. फणस, करवंद, जांभूळ ही फळे मोठ्या प्रमाणावर कोकणात येतात. परंतु करवंदावर केवळ २० टक्केच प्रक्रिया केली जाते. मोठ्या प्रमाणावर लोह करवंदातून मिळते. जांभूळसुद्धा आयुर्वेदिक फळ आहे. लाखो टन काजूबोंडे वाया जातात. काजूबोंडावर प्रक्रिया केल्यास त्याच्या रसापासून वाईन, काजूसोडा, काजू बिस्कीट विविध पदार्थ तयार होऊ शकतात. मात्र, यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. शेतकरी व छोटे उद्योजक यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने कोकणातील २० टक्के फळावरच प्रक्रिया केली जाते. फळ प्रक्रिया उद्योगाला चालना दिल्यास रोजगाराची चांगली संधी उपलब्ध होऊ शकते. कोकणातील काजूबोंड, करवंद, फणस, जांभूळ, आवळा, आंबा ही फळे आयुर्वेदिक फळे आहेत. या फळातून शरीराला कोणतीही हानी होत नाही.कोकणात २० वर्षांपूर्वी कोकम, जांभूळ, करवंद, काजूबोंड, फणस या फळांना कवडीमोल किंमत होती. करवंद, कोकम या दोन्ही फळांना आयुर्वेदात फार महत्त्व आहे. असे असूनसुद्धा ७० टक्के फळे जंगलात कुजून नष्ट व्हायची. त्यामुळे या फळांना दर्जा मिळवून देण्यासाठीच आपण फळांच्या रसापासून सोडा बनवण्याचा निर्णय घेतला, असे महाजन म्हणाले.मुंबई येथे एका नामवंत कंपनीत काम करताना फार वाईट अनुभव आला. कंपनीमध्ये शीतपेयाच्या बाटल्या भरताना सांडलेले पेय लोखंडी पार्टवर पडून त्या पार्टला अक्षरश: छिद्र पडली होती. सांडलेल्या पेयामुळे लोखंडाला छिद्र पडू शकतात, तर मनुष्याच्या पोटाचे काय होत असेल. ही कल्पना सतावू लागली. शीतपेयातील कीटकनाशक द्रव्य पाहून नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. नामवंत कंपनीतील नोकरी सोडून त्या कीटकनाशके मिश्रीत शीतपेयाला पर्याय म्हणून शरीराला हानिकारक नसलेला कोकम सोडा बनवण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला चार वर्षे कोळथरे येथे कोकम सोडा फॅक्टरी सुरु केली, असे ते म्हणाले.कोकम सोड्याला मिळालेल्या प्रतिसादामुळे कुडावळे येथे जमीन खरेदी करुन हा प्रकल्प कुडावळे येथे उभा राहिला. सुरुवातीच्या काळात फार अडचणींना तोंड द्यावे लागले. ग्रामपंचायतीकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नाही, असे ते म्हणाले.फळप्रक्रिया उद्योगापुढे काही अडचणी आहेत. त्या प्रामुख्याने सोडविणे गरजेचे आहे. फळप्रक्रिया उद्योग हा बारमाही सुरु राहण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यासाठी शीतसाखळी गरजेची आहे. स्थानिक उद्योजकांना फळप्रक्रिया उद्योगात छोट्या छोट्या तांत्रिक अडचणी येतात. त्या अडचणी कृषी विद्यापीठाकडून सुटाव्यात. कोकणात टेस्टिंग लॅबची गरज आहे. कोकण कृषी विद्यापीठाने टेस्टिंग करुन दिल्यास वेळ व पैशांची बचत होऊ शकते.- विनय महाजन, प्रगतशील शेतकरीचिंचेपासून चिंचसोडा बनवण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. चिंचेपासून सोडा बनवण्यामागचा हेतू एवढाच आहे की, कोकणात मोठ्या प्रमाणावर चिंचेची लागवड होऊ शकते. परंतु मार्केट नसल्यामुळे त्याची कोण लागवड करत नाही. आता चिंचेपासून सोडा बनविला जाऊ लागल्याने त्याला नक्कीच मार्के ट उपलब्ध होईल. सध्या चिंच बाहेरुन खरेदी केली जात आहे, असे महाजन यांनी यावेळी बोलताना सांगितले.