पुणे : पंतप्रधान निधीतून मृतांच्या कुटुंबियांना २ लाख रूपयांची अतिरिक्त मदत केली जाईल, तसेच पंतप्रधान निधीतील ५ लाख रूपयांपैकी ७५ टक्के हिस्सा केंद्र शासन देईल, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी गुरूवारी पत्रकारांशी बोलताना दिली. डोंगर कोसळण्याच्या दुर्घटना होत असताना ‘हिल टॉप हिल स्लोप’ यांचा विचार न करता बांधकामांना परवानगी मागण्याचे, अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचे प्रयत्न सत्ताधारी कार्यकर्ते करीत आहेत, असे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले असता सिंह यांनी विकास इकोफ्रेंडली असावा, पर्यावरणाचे संतुलन बिघडू नये, असे सांगितले. राज्य सरकारला केंद्राच्या जादा मदतीची गरज असेल तर ती दिली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. विरोधी पक्षनेते विनोद तावडे, खा. शिवाजीराव आढळराव पाटील, खा. अनिल शिरोळे हेही त्यांच्यासोबत दौऱ्यात होते. दुर्घटनाग्रस्तांना तातडीने मदत मिळावी, मदत जलदरित्या पोहचण्यासाठी काय केले जावे. मदतीसाठी कोणती साधने असावी, याबाबत लवकरच बैठक आयोजित केली जाणार असल्याचे ते म्हणाले.
‘पंतप्रधान निधीतून अतिरिक्त मदत’
By admin | Updated: August 1, 2014 04:13 IST