शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍यांच्या ४० कोटींच्या ठेवी बुडाल्या

By admin | Updated: May 12, 2014 03:35 IST

पेणच्या २४ गावांतील शेतकर्‍यांनी सेझ प्रकल्पाला शेतजमिनी विकून आलेल्या पैशांची गुंतवणूक जादा व्याजाच्या मोहापायी पेण अर्बनमध्ये केली होती.

पेण : पेणमध्ये २००६ साली सेझ प्रकल्पासाठी शासनातर्फे भूसंपादन करण्याची रिलायन्स कंपनीला परवानगी मिळाल्यानंतर पेणच्या २४ गावांतील शेतकर्‍यांनी सेझ प्रकल्पाला शेतजमिनी विकून आलेल्या पैशांची गुंतवणूक जादा व्याजाच्या मोहापायी पेण अर्बनमध्ये केली. त्या शेतकर्‍यांच्या तब्बल ४० कोटींच्या ठेवी बँक दिवाळखोरीत गेल्याने बुडाल्याने पैसेही गेले व जमिनीही गेल्या, अशा भीषण आर्थिक संकटाचा सामना भविष्यात या शेतकर्‍यांना करावा लागणाार आहे. त्यामुळे त्यांचे कुटुंबाचे चरितार्थाचे साधनच गेल्याने तेलही गेले, तूपही गेले, हाती धुपाटणे आले, अशी परिस्थिती या शेतकरीवर्गावर ओढवली आहे. महामुंबई एसईझेडच्या भूलभुलैयात अडकलेल्या शेतकर्‍यांनी जादा व्याजाच्या हव्यासापोटी आपले पैसे पेण अर्बनमध्ये ठेवीच्या स्वरूपात ठेवले. एवढे पैसे घरात ठेवण्यापेक्षा बँकेत गुंतवणूक करून महिन्याकाठी या ठेवीवर येणार्‍या व्याजातून दरमहा कुटुंबाचा चरितार्थ चालेल, अशा वेड्या आशेपायी हा पैसा ठेवीच्या स्वरूपात गुंतवला, तर दुसरीकडे याच काळात सेझ प्रकल्प येऊन नोकरी, कामधंदा मिळेल त्यातूनही पैसे मिळतील, असे या शेतकर्‍यांचे नियोजन होते. पण, काळाचा महिमा, गणित वेगळेच होते़ २००८ ते २००९ या कालखंडात या ठेवी ठेवल्या़ २००९ मध्ये सेझ हद्दपार झाला तर २३ सप्टेंबर २०१० मध्ये अर्बनला टाळे लागले. जेमतेम वर्षभर या ठेवीवर व्याज घेणारे शेतकरी २३ सप्टेंबर २०१० रोजी बँकेवर रिझर्व्ह बँकेने आर्थिक निर्बंध लादल्याने हादरले़ ते आजपर्यंत सावरलेच नाहीत. बँक आज सुरू होणार, उद्या सुरू होणार, मंत्र्यांच्या, मुख्यमंत्र्यांच्या तसेच केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवणारा शेतकरी अखेर जमीनदोस्त झाला आणि भविष्यात वेडाही होईल, इतका मोठा आर्थिक फटका त्यांना बसला आहे. सेझ प्रकल्पातील दादर-रावे, कळवे, जोहे, सोखार, उर्णोली या गावांतील शेतकर्‍यांच्या २२ कोटींच्या ठेवी तर वाशी खारेपाटातील मोठे भाल, विठ्ठलवाडी कणे, बोर्जे, वाशी, ओढांगी, वढाव, मोठेवढाव, काळेश्री, नाखेल, बेणवले, बहिराम कोटक, दिव, कान्होबा, जनवली, लाखोले, मळेघरवाडी, मंत्रीवाडी, पैरणकरवाडी या गावांतील शेतकर्‍यांच्या १८ कोटींच्या ठेवी अशा ४० कोटींच्या ठेवी संकटाच्या बँक घोटाळ्यातील दिवाळखोरीत बुडाल्या आहेत. कामधंद्यासाठी शेती हे एकमेव साधन असलेल्या या शेतकर्‍यांचा सातबारा सेझ प्रकल्पाच्या नावावर झाल्याने प्रकल्पही गेला आणि पैसेही गेले़ आज पैसे गेले, उद्या जमिनीचा ताबा जाणाऱ खायचे काय, या घोर आर्थिक संकटाचा सामना त्यांना करावा लागणार आहे. (वार्ताहर)