शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
4
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
5
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
6
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
7
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
8
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
9
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
10
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
11
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
12
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
13
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
14
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
15
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
16
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!
17
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
18
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
19
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला

कपाशीचे २० हजार नमुने नापास!

By admin | Updated: March 8, 2015 02:01 IST

भरघोस उत्पादनासाठी बियाणे शुद्ध व दर्जेदार असावे लागते. सदोष व अप्रमाणित बियाण्यांमुळे उत्पादनात मोठी घट येते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

गजानन मोहोड ल्ल अमरावतीभरघोस उत्पादनासाठी बियाणे शुद्ध व दर्जेदार असावे लागते. सदोष व अप्रमाणित बियाण्यांमुळे उत्पादनात मोठी घट येते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या मूलभूत बाबींचा विचार करुन कृषी विभागाने बीज परीक्षण प्रयोगशाळेत सन २०१४-१५ या वर्षात ३७,७४० बियाण्यांची आनुवंशिक शुद्धता, उगवणशक्ती व गुणवत्ता तपासणी करण्यात आली. यामध्ये ४८३७ नमुने हे नापास ठरविण्यात आले आहेत. कुठलेही पीक असो अधिकाधिक उत्पन्नासाठी सुधारित जातीच्या बियाण्यांची पेरणी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. शेतकरी पेरणीसाठी बियाण्यांची खरेदी करतात. सर्वाधिक सोयाबीन व कपाशीची पेरणी विभागात होते. कपाशीचे संकरित बियाणे हे सर्वात महाग आहेत. त्यामुळे या बियाण्यांची शुद्धता पारखणे महत्त्वाचे ठरते. शेतकरी शेतातील बियाणे पुढील वर्षासाठी राखून ठेवतात. ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी साठवण केलेले बियाणे इतर शेतकऱ्यांनादेखील विकण्यात येते. मात्र या बियाण्यांचा दर्जा, प्रतवारी, गुणवत्ता प्रमाणित केलेला नसतो. अशा बियाण्यांबाबत खात्री देता येत नाही. परस्पर विश्वासावर या बियाण्यांची खरेदी-विक्री होते. अशा बियाण्यांमुळे शेतकऱ्यांची फसगत होत असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व बियाण्यांची तपासणी करुन खातरजमा करणे महत्त्वाचे आहे. दर्जेदार, आनुवंशिक शुद्धता, गुणवत्ता असणारे बियाणे शेतकऱ्यांना बियाणे प्रमाणिकरण यंत्रणा व बीज परीक्षण प्रयोगशाळा पुणे, परभणी व नागपूर या ठिकाणी स्थापन करण्यात आल्या आहेत. तेथे प्रामुख्याने बियाण्यांची आनुवंशिक शुद्धता व उगवण्याची शक्ती तपासण्यात येते. कायद्यांतर्गत नियमांचे पालन करुन काढलेल्या नमुन्यांची आवश्यकतेनुसार आनुवंशिक शुद्धता, बियाण्यातील आर्द्रता, ओलावा आदी बाबींची तपासणी करण्यात येते. या निकषावर कापूस बियाण्यांची तपासणी करण्यात आली. मागील पाच वर्षांत १ लाख ८१ हजार बियाण्यांची तपासणी केली असून यामध्ये १९ हजार ७३७ बियाणे हे अप्रमाणित करण्यात आले, हे येथे उल्लेखनीय. त्यामुळे शेतकऱ्यांनी खातरजमा करुनच बियाणे खरेदी करणे महत्त्वाचे ठरते. अन्यथा परस्पर विश्वासावर बियाण्यांची करण्यात आलेली खरेदी शेतकऱ्यांच्या अंगलट येऊ शकते. बियाण्यांचे दोन वेळा नमुने घेतले जातात. पहिल्यांदा बियाण्यांचा लॉट अलॉटमेंट झाल्यानंतर व दुसऱ्यांदा बियाणे बाजारात आल्यावर नक्की बियाणे कुठले अप्रमाणित आहे, याविषयीची माहिती घेतो. - दत्तात्रय मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अमरावती.असा आहे कायदाच्बी-बियाणे अधिनियम १९६६, बियाणे अधिनियम १९६८, बियाणे नियंत्रण आदेश १९६६ या कायद्याच्या अंमलबजावणीकरिता विविध बियाणे नमुन्यांची गुणवत्ता तपासणी वेगवेगळ्या स्तरावर करणे बंधनकारक आहे. यासाठी कायद्यांतर्गत तीन ठिकाणी प्रयोगशाळा स्थापन करण्यात आल्या आहेत.च्विदर्भात नागपूर येथे बीज परीक्षण प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळेत नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, अमरावती, बुलडाणा, अकोला, यवतमाळ व वाशीम आदी जिल्ह्यांतून कापूस बियाण्यांची तपासणी केली जाते. पाच वर्षांचा गोषवारावर्षतपासलेले नमुनेअप्रमाणित नमुने२००९-१०३७,२९३३,२३०२०१०-११३१,४२७४,६०५२०११-१२३६,५२२३,६३९२०१२-१३३८,३१९३,४१६२०१३-१४३७,७४०४,८४७च्दरवर्षी कापूस बियाण्यांची गुणवत्ता कमी होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसून सरासरी उत्पन्नात घट येत आहे.च् दशकाचा आढावा घेता विभागात कापसाची लागवड कमी होऊन याची जागा सोयाबीनने घेतली आहे. कापसाची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी शासनाने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.