जमीर काझी - मुंबई
‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय, ही बिरुदावली मिरवणा:या जनतेच्या रक्षणासाठी कार्यरत असलेल्या राज्य पोलीस दलातील अधिकारी-कर्मचा:यांमध्ये अस्वस्थता व मानसिक ताणतणाव वाढत चालला आहे. त्याच्या अतिरेकामुळे गेल्या साडेचार वर्षामध्ये तब्बल 14क् खाकी वर्दीवाल्यांनी स्वत:च आपल्या आयुष्याचा शेवट करून घेतला आहे. या आत्महत्या करणा:या पोलिसांमध्ये अधिका:यांची संख्या 2क् वर आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये तिघा अधिका:यांसह 19 जणांनी सेवेत असताना आपल्या आयुष्याचा अंत करून घेतला आहे.
राज्यातील 11 कोटींवर नागरिकांच्या वित्त व जीविताच्या हमीसाठी जवळपास 2 लाख पोलिसांचा फौजफाटा कार्यरत आहे. मात्र, सर्वच प्रकारच्या गुन्ह्यांच्या वाढत्या आलेखामुळे महाराष्ट्राची बदनामी होत चालली आहे. गुन्हेगारीला प्रतिबंध करण्यासाठी अद्ययावत यंत्रसामग्रीसह मनुष्यबळ वाढवण्याचे प्रय} राज्य सरकारकडून एकीकडे होत असताना खात्यांतर्गत सुंदोपसुंदी, गटबाजी वाढत राहिलेली आहे. अवेळी, सलगपणो करावी लागणारी डय़ुटी, विविध प्रकारच्या बंदोबस्तामुळे हक्काच्या साप्ताहिक सुटीवर येणारी गदा, वरिष्ठ अधिका:यांची मनमानी, त्रसामुळे अधिकारी-कर्मचा:यांवरील मानसिक तणाव वाढत राहिला आहे. त्याचा परिणाम कुटुंबावर, वैयक्तिक जीवनावर होत आहे. कौटुंबिक कलह वाढल्याने परिणामी रुबाबदार, प्रतिष्ठेची नोकरीतील उर्वरित सेवा, कुटुंंबाचा विचार न करता आत्महत्या करण्याची मनोवृत्ती वाढत राहिली आहे.
गेल्या साडेचार वर्षामध्ये आतार्पयत म्हणजे जानेवारी 2क्1क् ते जून 2क्14 या कालावधीत 14क् जणांनी आयुष्याचा अंत करून
घेतला आहे. त्यामध्ये उपनिरीक्षक ते आयपीएस दर्जार्पयतच्या 2क्
अधिकारी तर कॉन्स्टेबल ते सहायक फौजदारपदार्पयतच्या 12क् जणांनी आयुष्याचा अंत करून घेतला आहे. 2क्1क् मध्ये 4 अधिकारी तर 3क् कर्मचा:यांनी आत्महत्या केली. त्याच्या पुढच्या वर्षी अशा घटनांचे प्रमाण अनुक्रमे 2 व 23 इतके होते.
2क्12 मध्ये 5 अधिकारी तर 2क् कर्मचा:यांनी आत्महत्या केली. गेल्या वर्षी त्याच्या प्रमाणात आणखी वाढ होऊन 6 अधिकारी तर तब्बल 31 पोलिसांनी आपले आयुष्य संपवल़े
या वर्षी जूनअखेर्पयत हा आकडा 19 र्पयत पोहोचला असून त्यामध्ये 3 अधिका:यांचा समावेश असल्याचे गृहविभागातील अधिका:यांकडून सांगण्यात आले. ही आकडेवारी एक विदारक चित्र आहे.
गृहविभागातील सूत्रंकडून
डय़ुटीवर बंदोबस्त, कामाचा अतिरेक ताण, वरिष्ठ सहका:यांकडून होणारी पिळवणूक आणि कौटुंबिक कलह ही त्यामागील प्रमुख कारणो असल्याचे त्याबाबत केलेल्या तपासातून पुढे आल्याचे गृहविभागातील सूत्रंकडून सांगण्यात आले.
पोलिसांचे मनुष्यबळ वाढवण्यात येत असले तरी अधिका:यांकडून प्रत्येकाच्या कामाची रीतसर नियोजन, त्यांच्या कौटुंबिक वैयक्तिक अडीअडचणी लक्षात घेऊन त्या सोडवल्या पाहिजेत़ त्यांच्यावरील कामाचा अतिरिक्त ताण, मानसिक त्रस कमी झाला तरच आत्महत्यांचे प्रमाण कमी होईल
- डॉ. माधव सानप (निवृत्त विशेष महानिरीक्षक)
1साडेचार वर्षात 14क् पोलिसांनी आत्महत्या केल्याची नोंद गृह विभागाकडे असली तरी प्रत्यक्षातील संख्या त्याच्या दुपटीहून अधिक असू शकते, असा अधिका:यांचा अंदाज आहे.
2आत्महत्या करणो हा गुन्हा असल्यामुळे त्यांच्या कुटुंबीय, वारसांना त्यांची ग्रॅच्युएटी, पेन्शन, भत्ते व अन्य शासकीय सवलती देता येत नाहीत. त्यामुळे त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून बहुतेक वेळा अशा घटनांची नोंद पोलिसांकडून अपघात अशी केली जाते.
3सार्वजनिक ठिकाणी, सगळ्यांसमोर कृत्य केल्यानंतर मात्र त्याची नाइलाजास्तव आत्महत्या अशी नोंद घेतली जाते. गेल्या वर्षापूर्वी नवरात्रोत्सवामध्ये अप्पर पोलीस महासंचालक आर.के. सहाय यांनी राहत्या घरी पेटवून घेतले. मात्र, पोलिसांच्या दप्तरी मात्र आकस्मिक व नजर चुकीमुळे ही घटना घडल्याची नोंद करून अपघात असल्याचे नमूद करण्यात आले.