शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

१४ टन विषारी वायू हवेत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2016 19:26 IST

आंध्रप्रदेशातून बडोद्याकडे अ‍ॅसीड घेऊन जाणाऱ्या टँकरमधील गॅसकीट लिकेज झाल्याने तब्बल १४ टन विषारी वायू हवेत मिसळला. यामुळे आठ कि.मी. पर्यंत सगळीकडे धूरच धूर दिसत होता.

- सोमनाथ खताळ/फकिरा देशमुख/शाम पुंगळे

राजूर (जि.जालना) - आंध्रप्रदेशातून बडोद्याकडे अ‍ॅसीड घेऊन जाणाऱ्या टँकरमधील गॅसकीट लिकेज झाल्याने तब्बल १४ टन विषारी वायू हवेत मिसळला. यामुळे आठ कि.मी. पर्यंत सगळीकडे धूरच धूर दिसत होता. परिसरातील हजारो नागरिकांनी भयभीत होऊन सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. सोमवारी रात्री आठ वाजता भोकरदन तालुक्यातील भोकरदन-जालना राज्य रस्त्यावर राजूरजवळ ही घटना घडली. या मार्गावरील वाहतूक इतरत्र वळविण्यात आली असून २१ तासांनंतरही गळतीवर नियंत्रण आणण्यात प्रशासनाला यश आले नव्हते.आंध्रप्रदेश राज्यातून ‘क्लोरोसल्फोनिक’ नावाचा १४ टन विषारी वायू घेऊन हा टँकर ट्रक (जीजे ०६, एव्ही ३४८३) बडोद्याकडे जात होता. टँकरच्या बॉटम व्हॉल्वमधील गॅसकीट अचानक लिकेज झाली आणि वायूगळतीला सुरूवात झाली. ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्याने टँकर उभा करून पळ काढला. त्यानंतर ही बाब परिसरातील काही लोकांच्या लक्षात आली आणि त्यांनी प्रशासनाला कळविले. स्थानिक पोलीस, महसूल प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. परंतु रात्रीची वेळ असल्याने पुढे जाण्यास कोणीच धजावत नव्हते. मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत वायू गळतीवर नियंत्रण आणण्यात प्रशासनाला यश आले नव्हते. शेवटी हतबल झालेल्या प्रशासनाने टँकर जागेवरच खाली केव्हा होतो, याची वाट पाहण्याचा निर्णय घेतला. उपविभागीय अधिकारी हरिश्चंद्र गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी इश्वर वसावे, तहसीलदार रूपा चित्रक, सपोनि एस.एम.मेहेत्रे, तलाठी अविनाश देवकर, बारोटे हे तळ ठोकून होते. सरपंच शिवाजी पुंगळे आणि शिवसेनेचे तालुकाप्रमुख कैलास पुंगळे यांनी प्रशासनाला लागणारी मदत केली. जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनीही पाहणी केली. यावेळी परिसरातील लोकांना सुरक्षेबाबत सुचना देण्याचे आदेश त्यांनी दिले, तसेच तज्ज्ञांना पाचारण करण्यास सांगितले. गळतीचा धुर आठ कि.मी. पर्यंत पसरला. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. या परिसरातील पिंपळगाव थोटे, अंबेगाव, खामखेडा, थिगळखेडा, पळसखेडा पिंपळे या मोठ्या गावांसह वाड्या- वस्त्यांवर राहणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागला. अनेकांना श्वसनाचे त्रास होऊ लागल्याने त्यांनी सुरक्षित स्थळी जाणे पसंत केले. तसेच डोळ्यात जळजळ होत असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले.

अन् धूर अधिकच वाढला टँकरला आग लागली आहे, हा गैरसमज झाल्याने धावतपळत आलेल्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी टँकरवर पाणी मारले. परंतु हे वायू ‘वॉटर रिअ‍ॅक्ट’ होणारे असल्याने धुर अधिकच वाढला. औरंगाबाद, जालना, भोकरन येथील अग्निमन विभागाचे बंब दाखल झाले. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. सुदैवाने पाऊस नसल्याने दुर्घटना टळल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

पिकांचे नुकसानया अ‍ॅसीडमध्ये क्लोरक सल्फर नावाचे केमीकल होते. त्यामुळे यापासून मानवी जिवीतास धोका नाही, असे औरंगाबादचे औद्यागिक व आरोग्य सुरक्षा उपसंचालक प्रमोद सुरसे यांनी सांगितेले. परंतु या अ‍ॅसीडमुळे दोन कि.मी.पर्यंतची पिके पुर्णता: करपून गेली होती. झाडांचीही पाने पिवळी पडून झडल्याचे दिसून आले.

विद्यार्थी पाठविले परतराजूर परिसरातील अनेक गावांतील विद्यार्थी शिक्षणासाठी राजूर येथे येतात. परंतु या गळतीमुळे परिसरात सर्वत्र धुर पसरला होता. त्यामुळे परिसरातील पाचशे फुटापर्यंत येण्यास मज्जाव करण्यात आला होता. सकाळी शाळेत जाणाऱ्या मुलींनाही पोलिसांनी समजूत काढून परत पाठविले.

तज्ज्ञ आले अन् गेलेअ‍ॅसीड नियंत्रणासाठी प्रशासनाने औरंगाबाद येथील तीन खासगी कंपनीतील तज्ज्ञांना बोलविले. पाच तास प्रयत्न करूनही त्यांना यावर नियंत्रण आणण्यात यश आले नाही. परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे समजताच आपल्या सहकाऱ्यांसोबत फोटो काढून ते औरंगाबादच्या दिशेने परतले.

अवैध वाळू आली कामालाअ‍ॅसीड गळती रोखण्यासाठी पाणी मारणे योग्य नव्हते. म्हणून तज्ज्ञांनी वाळू आणण्यास सांगितले. परंतु ऐनवेळी वाळू आणणार कोठुन असा प्रश्न प्रशासनासमोर होता. एवढ्यात तहसीलदार रूपा चित्रक यांनी सोमवारी अवैध वाळू वाहतूक करणारा पकडलेला ट्रक (एमएच२० एटी ६६७४) बोलविला. यातील सर्व वाळू याठिकाणी टाकण्यात आली, परंतु तरीही धुर आटोक्यात आला नाही.

वाहतूक वळवली भोकरदन, टेंभूर्णीचे पोलीस आणि जालन्याहून १२ राज्य राखीव दलाचे जवान बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. भोकरदन-जालना या मार्गावरील वाहतूक जाफराबादमार्गे वळविण्यात आली होती.