अजित मांडके - ठाणो
ठाणो महापालिका हद्दीत 1क्क् टक्के शुद्ध पाणी मिळत नसल्याचा अहवाल समोर आला असतानाच आता महापालिकेने ठाण्यातील झोपडपट्टी भागात राहणा:या नागरिकांसाठी 1क्क् टक्के शुद्ध पाणी देण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर पायलट प्रोजेक्टची संकल्पना पुढे आणली आहे. खाजगी ठेकेदाराच्या माध्यमातून ठाणोकरांना देण्यात येणारे हे शुद्ध पाणी केवळ पिण्यासाठीच उपलब्ध होणार असून त्यासाठी 2क् लीटरमागे 1क् रुपये मोजावे लागणार आहेत.
ठाणो शहराची लोकसंख्या आजघडीला 18 लाखांच्या घरात आहे. महापालिका विविध स्नेतांच्या माध्यमातून रोज 46क् दशलक्ष लीटर पाणीपुरवठा करत आहे. स्टेम येथे या पाण्यावर ट्रीटमेंट केल्यानंतर हे पाणी जलकुंभांच्या माध्यमातून ठाणोकरांच्या घरात जात आहे. 1क्क् टक्के पाणी शुद्ध करूनच ते ठाणोकरांना दिले जात असल्याचा दावा पालिकेने केला आहे. केवळ काही जलवाहिन्या गटारांतून जात असल्याने आणि काही वेळेस सोसायटय़ांच्या टाक्या स्वच्छ केल्या जात नसल्याने त्याचा परिणाम म्हणून अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. तसेच पावसाळ्यात काही वेळेस अशुद्ध पाणीपुरवठा होत असतो. दरम्यान, वर्षातून एकदा शहरात असलेल्या 62 जलकुंभांची सफाईसुद्धा केली जात आहे. तसेच पालिकेच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पाण्याचे नमुने तपासले जात असून एखाद्या भागात अशुद्ध पाणी आढळले तर त्याबाबत योग्य ती खबरदारी घेऊन तेथील पाणी शुद्ध करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. परंतु, शहराला 1क्क् टक्के शुद्ध पाण्याची हमी आजही पालिका देताना दिसत नाही.
आता महापालिकेने झोपडपट्टी भागासाठी अभिनव संकल्पना पुढे आणली आहे. झोपडपट्टी भागासाठी 1क्क् टक्के शुद्ध पाणी देण्यासाठी पालिकेने आता पावले उचलली आहेत. खाजगी ठेकेदाराच्या माध्यमातून पालिकेने या भागातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी देण्याचा दावा केला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव मंजूर झाला असून निविदा मागवण्यात आल्या असल्याची माहिती महापालिकेने दिली. यासाठी पाच ते सात निविदा प्राप्त झाल्या असून लवकरच त्यांची छाननी केली जाणार आहे. ज्या ठेकेदाराचे दर कमी असतील, त्याला हे काम दिले जाणार आहे.
महापालिका खासगी ठेकेदाराला झोपडपट्टी भागात 8 बाय 1क् मीटरची जागा उपलब्ध करून देणार आहे. त्या ठिकाणी ठेकेदार आपला ट्रीटमेंट प्लांट उभारणार असून त्याला वाणिज्य वापराच्या दराने महापालिका पाणी उपलब्ध करून देणार आहे. त्यानंतर, संबंधित ठेकेदार त्या-त्या भागातील झोपडपट्टीधारकांचे रजिस्ट्रेशन करून कोणाला किती पिण्याचे पाणी हवे आहे, याचा डाटा तयार करणार आहे. त्यानंतर, हे पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे.
सोसायटीमध्ये असलेल्या टाक्या साफ केल्या जातात. परंतु झोपडपट्टी भागांत राहणा:या रहिवाशांकडे साठवण क्षमता कमी असल्याने त्यांना काही प्रमाणात अशुद्ध पाणी मिळत आहे. त्यामुळे त्यांना या पायलेट प्रोजेक्टमध्ये ग्राह्यधरूनच याची संकल्पना आखण्यात आली आहे.
- के. डी. लाला,
नगर अभियंता, ठामपा
च्सध्या बाजारात 5क्क् मिलिलीटरसाठी 1क् ते 2क् रुपये मोजावे लागत आहेत. परंतु, आता महापालिकेच्या या नव्या फंडय़ानुसार झोपडपट्टीधारकाला 2क् लीटर शुद्ध पाण्यासाठी सुमारे 1क् रुपये मोजावे लागतील, असा दावा पालिकेने केला आहे. त्यामुळे खासगी वितरकांना याचा फटका सहन करावा लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
च्सध्या तीन ते चार ठिकाणांवरच हा पायलेट प्रोजेक्ट कार्यान्वित करण्याचे महापालिकेने निश्चित केले असून झोपडपट्टी भागातील स्पॉट उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी शहर विकास विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. जागा उपलब्ध झाल्यानंतर त्या ठिकाणी शुद्ध पाण्याचे ट्रीटमेंट प्लांट उभारले जाणार आहेत. परंतु हा प्रयोग यशस्वी झाला तरच संपूर्ण शहरासाठी तो लागू केला जाईल, असे सूतोवाच पालिकेने केले आहे.