शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

वेळा अमावस्यानिमित्त चाकरमान्यांना ओढ गावच्या मातीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:49 IST

उदगीर : महाराष्‍ट्र- कर्नाटक व तेलंगणाच्या सीमावर्ती भागातील गावांत मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या ही वेळा अमावस्या म्हणून साजरी केली जाते. ...

उदगीर : महाराष्‍ट्र- कर्नाटक व तेलंगणाच्या सीमावर्ती भागातील गावांत मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या ही वेळा अमावस्या म्हणून साजरी केली जाते. या सणाला खूप महत्व आहे. या सणानिमित्ताने माती व संस्कृतीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नोकरी व कामधंद्यासाठी बाहेरगावी असलेली मंडळी सहकुटुंब गावची वाट धरतात. चाकरमान्यांना या सणासाठी गावची ओढ लागते. त्यामुळे मंगळवारी लातूर जिल्ह्यासह, उस्मानाबाद, बीड, कर्नाटक व तेलंगणातील शेत- शिवार माणसांनी फुलणार आहेत.

ग्रामीण भागात येळवस असे म्हटले जाते. यंदा हा सण जानेवारीत साजरा होत आहे. मुळात हा सण कर्नाटकातला असता तरी मराठवाड्यातील बीड, लातूर, उस्मानाबाद व पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर तसेच तेलंगणा व सीमाभागातील कांही गावात हा सण शेतकरी मोठ्या उत्साहात साजरा करतात. कृषी संस्कृतीशी या सणाचे जवळचे नाते आहे. सणादिवशी शहर व ग्रामीण भागात एकप्रकारे अघोषित संचार बंदीचं असते.

रब्बी हंगामातील पिके बहरलेली असतात. त्यामुळे शेतशिवारं हिरवागार असतो. या सणासाठी बाहेरगावी राहणारी मंडळी शेताकडे येण्याचा प्रयत्न करतात. शेजारी, मित्रपरिवारांना जेवणाचे निमंत्रण दिले जाते. जेवणात भज्जी, रोडगा, अंब्बील, खिचडा गोड भात हा मेनू असतो. विशेषत: ज्यांच्याकडे शेती नाही, जे दुसऱ्या गावात स्थायिक झालेले आहेत, अशांना आवर्जून शिवारात भोजनासाठी निमंत्रण दिले जाते.

कडब्याच्या कोपीत पांडवांची पूजा

सकाळपासून बळीराजा साहित्य घेऊन शेतात जातात. पूर्वी सर्वजण बैलगाडीने जायचे. आता बैलगाडीची जागा दुचाकी, ट्रॅक्टर, कार, टेम्पो आदींनी घेतली आहे. शेतात पाच कडब्याच्या पेंड्या उभ्या करुन कोप तयार केली जाते. ती कोप म्हणजे आधार व सावलीचे प्रतीक होय. पांडव लक्ष्मीला दैवत मानून पूजा केली जाते. बळीराजा सपत्नीक पूजा करुन कोपीच्याभोवती ओलगे ओलगे सालम पलगे म्हणत फेऱ्या मारतो.