कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात काही १५ वर्षांखालील बालकांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. मात्र सध्याच्या स्थितीत जिल्ह्यातील पोस्ट कोविड बालकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे पुढे आले नाही. मात्र, जिल्ह्यात सध्या मलेरिया, डेंग्यू, न्यूमोनियाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. यात बालरुग्णांचे प्रमाण अधिक आहे. शहरासह जिल्ह्यात रुग्णालयात डेंग्यूच्या रुग्णांत वाढ झाली आहे. यात दाेन ते तीन बालकांना डेंग्यूची लागण असल्याचे आढळत आहे. त्यामुळे पोस्ट कोविड मुलांना जपण्याची गरज असून, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची गरज आहे.
ही घ्यावी काळजी...
सध्या जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांत वाढ झाली आहे. त्यातच कोरोना होऊन गेलेल्या काही बालकांना त्रास होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे.
बाहरे जाताना मास्क, फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझर आदी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी त्रास जाणवत असल्यास तत्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा.
या लक्षणांकडे लक्ष असून द्या...
जिल्ह्यात सध्या डेंग्यू, मलेरिया आणि म्यूमोनियाची साथ सुरू आहे.
व्हायरल फीव्हरचे प्रमाण बालकांमध्ये अधिक आहे.
सर्दी, खोकला, ताप आदी लक्षणे असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा.
ज्या बालकांना कोविड होऊन गेला आहे त्यांची अधिक काळजी घ्या.
बालरोगतज्ञ्ज म्हणतात...
कोरोना होऊन गेलेल्या बालकांमध्ये ताप येणे, पुरळ येणे, डोळे, हात-पायांवर चट्टे येणे, अशक्तपणा अशी लक्षणे दिसतात. सध्या यामध्ये घट झाली आहे. मात्र, तरीही काळजी घेण्याची गरज आहे. लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. मुलांचा आहार आणि व्यायाम यावर पालकांनी लक्ष देणे आवश्यक आहे. - डॉ. वर्धमान उदगीरकर
कोरोना झाल्यानंतर काही दिवसांनी बालकांमध्ये ताप कमी न होणे, ओठ लाल होणे, पुरळ येणे आदी लक्षणे दिसतात. त्यामुळे पालकांनी योग्य ती काळजी घेतली पाहिजे. लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे बालकांना कोरोना होणारच नाही याकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. - डॉ. महेश सोनार