उन्हाची तीव्रता महिनाभरापासून सुरू झाली आहे. त्यात दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीपातळीत घट होत आहे. लातूर तालुक्यातील तावरजा आणि रेणापूर तालुक्यातील व्हटी या दोन मध्यम प्रकल्पांतील पाणीपातळी जोत्याखाली गेली आहे. त्यामुळे तिथे उपयुक्त पाणीसाठा शून्य आहे. रेणापूर मध्यम प्रकल्पात २.२२८ दलघमी, तिरु-२.९१०, देवर्जन- ५.६९१, साकोळ- ४.९८८, घरणी- १०.३५५ आणि निलंगा तालुक्यातील मसलगा मध्यम प्रकल्पात ६.७६२ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. सध्या शेतकरी उसासाठी पाण्याचा वापर करीत आहेत. त्याचबरोबर बाष्पीभवनही वाढले आहे. त्यामुळे जलसाठ्यात झपाट्याने घट होत आहे.
एकूण ३२.९९४ दलघमी पाणी
जिल्ह्यातील ६ मध्यम प्रकल्पांत सध्या ३२.९९४ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. रेणापूर मध्यम प्रकल्पात ११.१३ टक्के, तिरुमध्ये १९.०३ टक्के, देवर्जनमध्ये ५३.२८, साकोळ ४५.५५, घरणी ४६.०९, मसलगा प्रकल्पात ४९.७२ टक्के असा एकूण २७.०१ टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील १३२ लघु प्रकल्पांत ८९.३८३ दलघमी एवढा उपयुक्त पाणीसाठा आहे.