शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

Killari Earthquake : त्या रात्री... डोळ्यांदेखत आई-वडील, भाऊ-बहीण सारे काही संपले, तरीही....

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 11:24 IST

त्या रात्री... उभ्या राहिलेल्या मनीषाताईंच्या आयुष्याची कहाणी..

धर्मराज हल्लाळे लातूर :  ‘भूकंप झाला आणि हसलगण (ता. लोहारा) गावात घरांचे ढिगारे झाले. आम्ही भाऊ-बहीण, आई-वडील आमच्याच उद्ध्वस्त झालेल्या घरात मातीच्या ढिगाºयाखाली होतो. आईचा आवाज येत नव्हता. वडील बोलत होते. ते माझ्या लेकरांना वाचवा म्हणत होते. लहान असलेला माझा भाऊ राम जोरजोरात ओरडत होता. मला उठता का येत नाही. माझ्या अंगावर माती का पडली आहे, असा त्याचा आक्रोश चालला होता. घरावरील लाकडे आमच्या अंगावर पडल्यामुळे दगड-माती थेट पडली नाही. त्यामुळे आम्ही एकमेकांशी बोलत होतो. वडिलांनी आईला हाक मारली. तिचा आवाज आला नाही. माझी बहीण जनाबाई, आणि मी एकमेकींशी बोलत होतो...’

अंगावर शहारे आणणारा हा अनुभव सांगताना मनीषा आप्पासाहेब मोरे पंचवीस वर्षांनंतरही गहिवरून गेल्या होत्या. मातीच्या ढिगाºयाखाली अडकलेला त्यांचा लहान भाऊ राम हाही खूपच घाबरून गेला होता. त्याचे ओरडणे थांबत नव्हते. त्यावेळी मोठी बहीण जनाबाई म्हणाली, ‘ओरडू नको.. आपल्यालाही कोणी तरी येऊन बाहेर काढेल. शांतपणे पडून राहा. ओरडून दमशील.’ त्यावेळी मनीषा दहा वर्षांच्या होत्या. मनीषा, जनाबाई, राम हे एकमेकांच्या आजूबाजूला असूनही एकमेकांना पाहू शकत नव्हते.  अंधार, धूळ, माती सगळीकडे पसरली होती. घरावरील माळवदाच्या लाकडांमुळे ते बचावले होते. मात्र आधीपासूनच त्यांच्या आईचा आवाज येत नव्हता. नंतर रामही बोलायचा थांबला. वडिलांचाही आवाज क्षीण झाला. 

जनाबाई आणि मनीषा यांना मात्र त्यांच्यावर असलेल्या ढिगाऱ्याांमधून लोकांचे आवाज ऐकू येत होते. काही वेळाने त्यांना एकेकाला बाहेर काढण्यात आले. तोपर्यंत आईने प्राण सोडले होते. वडील विव्हळत होते. भाऊही वाचवा वाचवा म्हणून निपचित पडला होता. दोघी बहिणी वाचल्या होत्या. सभोवताली अंधार. लोक मातीने माखलेले. ते पाहून त्या दोघीही प्रचंड घाबरल्या.

वडील म्हणाले, माझ्या लेकरांना आणा. दोघी बहिणी समोरच थांबल्या होत्या. मात्र त्यांच्या बाजूलाच पत्नी आणि लहान मुलाचा मृतदेह पाहून वडिलांनी जोरदार टाहो फोडला अन् एका क्षणात त्यांनीही मान टाकली. - मनीषा यांच्या परिवारातील सर्वात मोठी बहीण लग्न झाल्याने सासरी होती. मात्र भूकंपाने मनीषा व जनाबाई या दोघी बहिणी पोरक्या झाल्या. काही दिवस शेतामध्येच उभारलेल्या छावण्यांमध्ये  राहिल्या. बहिणींमध्ये मनीषा यांना शाळेची आवड होती. त्यावेळी भूकंपानंतर अनेक संस्थांनी मदतीचे हात पुढे केले होते. एसओएस संस्थेमधून राम यादव आले. त्यांनी धीर दिला. तद्नंतर मनीषा लातूरच्या एसओएस बालग्राममध्ये दाखल झाली. आणि तिथे तिला आई मिळाली. सुनंदा लिंबापुरे या बालग्राममधील मदर. त्यांच्यासोबत मनीषासह नऊ जणांचा परिवार होता.

आज त्या परिवारातील सर्वच मुले स्वत:च्या पायावर उभी राहिली आहेत. मदर सुनंदा यांनी मनीषाला आईची उणीव भासू दिली नाही. तिने बारावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर नर्सिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला. तिचे आयुष्य एसओएसमध्ये घडल्यामुळे आपले लग्नही एसओएसमध्ये व्हावे, अशी मनीषा इच्छा होती. उमरगा तालुक्यातीलच शाहुराज धुमाळ यांच्याशी तिचा विवाह झाला. आज मनीषा आपल्या परिवारासह पुण्यात राहते. ती परिचारिका म्हणून सेवा बजावते. पती कंपनीत अधिकारी आहेत. शेवटी मनीषा म्हणते, भूकंपाने आमच्यापासून सर्वकाही हिरावले. मात्र संस्था आणि समाजाच्या पाठबळावर आज माझ्यासारख्या पोरक्या झालेल्या लेकरांनाही परिवार मिळाला आहे. 

टॅग्स :Killari Earthquakeकिल्लारी भूकंपlaturलातूर