शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
पंतप्रधान मोदींनी दिलं खास गिफ्ट, खुश झाली अमेरिकन उपाध्यक्षांची मुलं! बघा VIDEO
4
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
5
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
6
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
7
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
9
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
10
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
11
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
12
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
13
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
14
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
15
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
16
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

Killari Earthquake : घरे उभारली; आठवणींच्या वेदना कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 11:26 IST

Killari Earthquake : भूकंपात संपूर्ण कुटुंब गमावलेल्या अनेक व्यक्ती आजही वेदनांवर फुंकर घालून जीवन जगत आहेत. ३० सप्टेंबर १९९३ रोजी पहाटे ३ वाजून ५६ मिनिटांनी ६.३ रिश्टर स्केलच्या धक्क्याने

आशपाक पठाणलातूर : भूकंपानंतर शासन व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने हजारो घरे उभारण्यात आली. भूकंपात संपूर्ण कुटुंब गमावलेल्या अनेक व्यक्ती आजही वेदनांवर फुंकर घालून जीवन जगताहेत...

भूकंपात संपूर्ण कुटुंब गमावलेल्या अनेक व्यक्ती आजही वेदनांवर फुंकर घालून जीवन जगत आहेत. ३० सप्टेंबर १९९३ रोजी पहाटे ३ वाजून ५६ मिनिटांनी ६.३ रिश्टर स्केलच्या धक्क्याने लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील जवळपास ५२ गावे जमीनदोस्त झाली. यात लातूर जिल्ह्यातील ९ हजार ७४८ जणांनी प्राण गमावले. ३० हजारांवर लोक जखमी झाले. डोळ्यांदेखत ढिगाºयाखाली दबलेल्या कुटुंबातील सदस्यांच्या किंकाळ्या अजूनही हृदय पिळवटून टाकतात. अनाथ झालेल्या १२८ मुलांना जीवन जगत असताना पदोपदी आपल्या कुटुंबाच्या आठवणींनी गहिवरून येते. ३० सप्टेंबर १९९३ च्या घटनेची माहिती काही क्षणात जगभर पसरली. मदतीचे लाखो हात किल्लारीच्या दिशेने धावले. जागोजागी जमीनदोस्त झालेली घरे, भिंतीखाली दबलेली माणसे, जखमांमुळे विव्हळत असलेले लोक, कोणी मुलांसाठी तर कोणी आपल्या आईसाठी टाहो करीत होते. प्रत्यक्षात ही सर्व घटना डोळ्यांत टिपणारी भूकंपग्रस्त गावातील माणसे आजही ‘त्या’ वेदनांवर फुंकर घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. मूळ जमीनधारकांना हवा भूखंड़

भूकंपग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी शासनाने जुन्या गावाच्या नजिक, शेत शिवाराच्या जवळ असलेली खडकाळ जमीन शोधली. भूकंप प्रवण क्षेत्र असल्याने काळ्या जमिनीपासून दूरच्या अंतरावर पुनर्वसन झाले. त्यावेळी ज्यांनी पुनर्वसनासाठी स्वत:च्या जमिनी दिल्या, त्यांना त्यावेळी तुटपुंजा मावेजा मिळाला. आता कायद्याने वाढीव मावेजा मिळणे शक्य नाही. त्यासाठी जमीनदात्या शेतकºयांचे संघटन झाले असून, त्या सर्वांनी मिळून आम्हाला पुनर्वसित गावांमध्ये किमान खुला प्लॉट अथवा आठव्या व नवव्या फेरीतील घर द्यावे, अशी मागणी केली आहे. त्याचा शासनस्तरावर अजूनही विचार झालेला नाही. उमरगा तालुक्यातील १० गावांसाठी २६३़२२ हेक्टर्स तर लोहारा तालुक्यातील १९ गावांच्या पुनर्वसनासाठी ४१९़१८ हेक्टर्स अशी एकूण ६८३ हेक्टर्स जमीन संपादित झाली होती. 

५२ गावांत हजारो घरे झाली होती जमीनदोस्त... भूकंपाला २५ वर्षे पूर्ण झाली. घटनेनंतर महाराष्ट्र शासनासह अनेकांनी मदतीचा हात दिला. औसा, उमरगा, लोहारा तालुक्यांतील ५२ गावे जमीनदोस्त झाल्यावर प्रशासनाने त्यांना मदतीचा हात देत घरे उभारून दिली. भूकंपाचा पुन्हा प्रकोप होऊ नये, यासाठी आधुनिक पद्धतीने घरांची उभारणी करण्यात आली.  देश-विदेशातून धावून आलेले मदतीचे हात आजही भूकंपग्रस्तांच्या हृदयात घर करून आहेत. मात्र काही गावांमध्ये घरांच्या बांधकाम दर्जाचा प्रश्न निर्माण झाला आहे. २५ वर्षांतच अनेकांची घरे खिळखिळी झाली आहेत.

टॅग्स :Killari Earthquakeकिल्लारी भूकंपlaturलातूर