म्हणून महागला वडापाव...
काेराेनापूर्वी खाद्यतेलाचे प्रतिकिलाे दर ९० रुपयांच्या घरात आहे. आता तेच दर १७० रुपयांच्या घरात आहे. दहा रुपयांना पूर्वी वडापाव विकला जात हाेता. त्यावेळी त्यातून नफा मिळत हाेता. आता खाद्यतेल, कांदा आणि बटाटे महागल्याने हा वडापाव दहा रुपयांना विक्री करणे शक्य नाही. परिणामी, काही विक्रेत्यांनी पंधरा रुपये, तर काहींनी २० रुपयांना केला आहे.
वडापावशिवाय दिवस जाणे कठीण...
मी दरराेज वडापाव खाताे. वडापावशिवाय दिवस जाणे कठीण आहे. अनेकदा नाश्ता म्हणून, वडापावचा वापर केला जाताे. महाविद्यालयात असताना दुपारच्यावेळी वडापाव, कचाेरी आणि समाेसाला प्राधान्य देत असत. आता दहा रुपयांचा वडापाव २० रुपयांना झाल्याने खाण्यावर निर्बंध आले आहेत. - पवन जाधव, लातूर
वडापावच्या भावामध्ये गत अनेक वर्षांपासून भाववाढ झालीच नव्हती. सध्याला तेल, कांदा, बटाट्याचे भाव दुपटीवर गेले आहेत. अशा स्थितीत दहा रुपयांना वडापाव देणे परवडणारे नाही. याचा विचार करून भाववाढ केली आहे ती याेग्य आहे. ग्राहकांना मात्र खिशाचा विचार करून मर्यादित प्रमाणात वडापाव खावा लागत आहे. - शादुल आवाळे, लातूर
काेराेना काळात व्यवसाय ठप्प, आर्थिक फटका...
काेराेनाच्या पार्श्वभूमीवर मार्च २०२० पासून छाेट्या-माेठ्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. लाॅकडाऊन काळात अनेक सर्व उलाढालच थांबली हाेती. या काळात अनेक दुकानांचे भाडे थकले, तर अनेकांनी आपला व्यवसायच बंद केला. आता पुन्हा व्यवसाय सुरू केला; मात्र महागाईमुळे भाववाढ करण्याशिवाय पर्याय उरला नाही. - इस्माइल बागवान, लातूर
खाद्यतेल, कांदे, बडाटे आणि इतर किराणा मालाचे दर वाढले आहेत. अशा स्थितीत काेराेनामुळे व्यवसायातील उलाढाल मंदावली आहे. दिवसभर झालेल्या व्यवसायातून राेजगार आणि दुकानचे भाडेही निघणे कठीण झाले आहे. केवळ व्यवसायातील सातत्य टिकवून ठेवण्यासाठी आहे त्या ठिकाणी तग धरून आहे. सध्याला ताेट्यातच व्यवसाय करावा लागत आहे.
- अमृत शेंडगे, लातूर