शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

‘आधी कुस्ती, नंतर दोस्ती’

By admin | Updated: August 25, 2016 00:40 IST

जिल्हा परिषद : दोन्ही काँग्रेसचा छुपा अजेंडा; शिवसेना-भाजपला रोखण्याची खेळी

कोल्हापूर : काँग्रेसचे गटांतर्गत राजकारण व राष्ट्रवादी काँग्रेसची मर्यादित ताकद पाहिली तर जिल्हा परिषदेवर स्वबळावर सत्ता मिळविण्यासाठी ‘३५’ ही मॅजिक फिगर गाठणे अशक्यच आहे. सत्तेच्या ताकदीमुळे आक्रमक झालेल्या शिवसेना-भाजपला रोखणे अवघड असल्याने ‘पहिली कुस्ती, निवडणुकीनंतर दोस्ती’ करण्याचा छुपा अजेंडा दोन्ही काँग्रेसच्या पातळीवर राबविला जाणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदारसंघ पुनर्रचना व आरक्षणाची तयारी सुरू झाल्याने ग्रामीण भागात निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. जिल्हा परिषदेवर आपल्याच पक्षाचा झेंडा फडकाविण्यासाठी नेत्यांनी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. स्वबळावर सत्ता स्थापन करण्याची तयारी पक्षांनी सुरू केली असली तरी तालुकानिहाय पक्षांची वस्तुस्थिती पाहता एकाही पक्षाला स्वबळावर ३५ जागा जिंकणे कठीण आहे. जिल्हा परिषदेत सध्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मदतीने काँग्रेसची सत्ता आहे. गेल्या पाच वर्षांत काँग्रेसमधील प्रा. संजय मंडलिक, संजय घाटगे, आमदार प्रकाश आबिटकर, स्वर्गीय नरसिंग पाटील यांचा गट शिवसेनेत आले आहेत. गडहिंग्लजमध्ये जिल्हा बॅँकेचे उपाध्यक्ष अप्पी पाटील काँग्रेससोबत आहे, असे म्हटले तरी ते काँग्रेसपेक्षा महादेवराव महाडिक यांचेच जवळचे मानले जातात. त्यामुळेच गडहिंग्लज, कागल या तालुक्यांत काँग्रेसचे अस्तित्व शोधावे लागणार आहे. करवीरमध्ये काँग्रेस सक्षम असली तरी पन्हाळा, शाहूवाडीत दुसऱ्याच्या कुबड्यांवरच उभे राहावे लागणार आहे. हातकणंगले, शिरोळ, चंदगड, भुदरगड, आजरा तालुक्यांत फारसे आशादायक चित्र सध्या तरी नाही. काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीची स्थिती फारच नाजूक आहे. मुळातच कागल, राधानगरी-भुदरगड मर्यादित पक्ष असल्याची कबुली पक्षाचे राज्य पातळीवरील नेतेच देतात. गतनिवडणुकीत मुरगूडकर-पाटील, राजेखान जमादार, विक्रमसिंहराजेंचा गट मागे होता, तरीही राष्ट्रवादीला सपाटून मार खावा लागला. कागलमध्ये पक्ष बळकट असे जरी म्हटले तर विरोधकही प्रबळ असल्याने येथे एकतर्फी यशाची शक्यता फारच कमी आहे. गडहिंग्लजमध्ये गेल्यावेळेला स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर ताकदीने उभे राहिल्याने सर्वच्या सर्व पाच जागा जिंकल्या; पण पाच वर्षांत अप्पी पाटील, संग्रामसिंह कुपेकर हे बाहेर पडले. आजरामध्ये अशोक चराटी, विष्णुपंत केसरकर हे मोठे गट बाजूला गेले. भुदरगडमध्ये के. जी. नांदेकर पक्षातून बाहेर पडले. राष्ट्रवादीचे हे बालेकिल्ले काहीसे भुसभुशीत झाले आहेत. पन्हाळा, शाहूवाडी, करवीरमध्ये तर पक्षाचे अस्तित्व शोधावे लागते. हातकणंगले, शिरोळमध्ये गटातंर्गतच पक्ष विभागला आहे. त्यामुळे दोन्ही काँग्रेसनी कितीही स्वबळावर सत्ता आणण्याची भाषा केली तरी ते शक्य नाही. त्यामुळे आधी स्वबळावर लढायचे आणि सत्तेसाठी एकत्र यायचे, असाच ‘फॉर्म्युला’ पुढे येणार हे नक्की आहे. भाजपने जिल्हा परिषदेसाठी शड्डू ठोकला असला तरी गोपाळराव पाटील वगळता एकही मोहरा त्यांच्या हाताला लागलेला नाही. शिवसेनेचे सहा आमदारांच्या कार्यक्षेत्रात तब्बल ४२ जिल्हा परिषदेचे मतदारसंघ येतात. सहाही नेत्यांनी ताकद लावली तर जिल्हा परिषदेवर सत्ता येईल; पण प्रत्येकांने ‘सोयीचे राजकारण’ केल्याने तेही शक्य नाही. जनसुराज्य व स्वाभिमानी पक्षाची ताकद मर्यादित आहे. ते शेवटच्या क्षणी कोणाचा तरी आधार बनून सत्तेत घुसण्यासाठीच प्रयत्न करणार आहे. (प्रतिनिधी)शिवसेनेच्या नेत्यांना उघड भूमिका घ्यावी लागणारच!आमदार प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार सत्यजित पाटील, आमदार उल्हास पाटील, आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्यासह प्रा. संजय मंडलिक, संजय घाटगे यांच्या आतापर्यंतच्या भूमिका वेगवेगळ्या राहिल्या आहेत.प्रत्येक निवडणुकीत ‘सोयीच्या राजकारणा’मुळे सहा आमदार असतानाही जिल्ह्यात ‘धनुष्याचे अस्तित्व’ अजूनही ठळक दिसत नाही. या निवडणुकीत या नेत्यांना धनुष्यबाण घेऊनच रिंगणात उतरावे लागणार आहे.