शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

संसार चिखलातच...!

By admin | Updated: November 17, 2014 00:24 IST

गळीत हंगामावर अवकळा : ऊसतोड मजुरांना सतावतोय निवाऱ्याचा प्रश्न

गणपती कोळी - कुरुंदवाड -निर्जन ठिकाणी वास्तव्य, गैरसोयींच्या व झाडाझुडपांनी व्यापलेले, कधी रणरणत्या उन्हात होरपळून निघायचे, तर कधी वादळी वाऱ्यातून खोपट उडून जायचे, तर पावसात गुडघाभर चिखलातून संसार थाटायचा याचे सुख-दु:ख कोणालाच नाही. ही अवस्था आहे ऊसतोड मजुरांची. दोन दिवस पडलेल्या पावसामुळे खोपटात पाणी शिरले आणि चिखल झाला. खोपटातील कर्ती माणसं कंत्राटदारांचे पैसे फेडण्यासाठी ऊस तोडण्यासाठी शेतावर गेली आहेत अन् त्यांची लहान मुले खोपटातील पाणी काढून पूर्ववत संसार थाटत आहेत. या मजुरांच्या जिवावर वाहतूकदार, कंत्राटदार मोठे झाले. मात्र, मानवतेतून या मजुरांच्या किमान निवाऱ्याचा प्रश्न तरी सुटायला हवा.ऊसतोड हंगाम चालू झाला की, सोलापूर, लातूर, बीड, उस्मानाबाद, कर्नाटक, आदी भागांतून मजुरांचा तांडा येतो. या भागातील बहुतेक मजुरांचे शेती क्षेत्र मोठे आहे. मात्र, पाण्याअभावी शेती पिकत नाही. त्यामुळे पोटाची भूक व संसाराचा गाडा चालविण्यासाठी ऊसतोड मजुरीचा पर्याय स्वीकारावा लागतो. त्यासाठी ऊस वाहतूकदारांकडून उचल घेतली जाते व ते मजुरी करून फेडतात.मजुरांच्या अस्वच्छतेचे कारण पुढे करीत सधन भागातील लोक गावालगत अथवा आपल्या शेतात तांडा उभारण्यास तयार नसल्याने निर्जन, पडीक जमीन असलेल्या ठिकाणी हा तांडा विसावतो. पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या या मजुरांची गैरसोयींबाबत अजिबात तक्रार नसते. हंगामातील ऊन, वारा, पाऊस, थंडी याबरोबरच सरपटणाऱ्या प्राण्यांशी दोन हात करीत त्यांना प्रत्येक दिवस घालवावा लागतो.दोन दिवसांच्या पावसाच्या रिपरिपीमुळे खोपटाभोवती पाणी साचले आहे. अनेकांच्या खोपटांतच पाणी शिरले आहे. कंत्राटदार, वाहतूकदार अथवा साखर कारखानदार यांचा मजुरांना दिलेले पैसे फेडून घेणे एवढाच उद्देश असल्याने, अशा संकटावेळीही खोपटावर थांबून चालत नाही. त्यामुळे या कामाची जबाबदारी लहान मुलांवर टाकून ते ऊसतोडीसाठी जात आहेत. पावसामुळे ऊसतोड मजुरांचे हाल पाहून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाचे मन हेलावते. मात्र, मजुरांची परवड थांबता थांबत नाही. याबाबत गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे.कामागरांकडून काम करून घेताना त्यांना मूलभूत सुविधा देणे हेही तितकेच बंधनकारक आहे. साखर कारखानदार व वाहतूकदार यांच्या समन्वयाने किमान त्यांच्या निवाऱ्याची सोय करणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांच्या मजुरीतून काही रक्कम कपात करून सोयी दिल्या, तरी त्याला कोणाचा विरोध राहणार नाही. मात्र, हे मजूर आगाऊ घेतलेली उचल फेडण्यासाठी आले आहेत. ते कोणत्या परिस्थितीत राहतात याचे काही देणेघेणे नाही, असा समज करणे म्हणजे एक प्रकारे या मजुरांच्या जिवाशीच खेळण्याचा प्रकार आहे. त्यामुळे जागरूक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्त्यांनी कारखानदारांना जागे करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.कुरुंदवाड-शिरढोण रस्त्यालगत अवकाळी पावसामुळे ऊसतोड मजुरांच्या खोपटाभोवती साचलेले पाणी व चिखल यातच हंगामी संसार थाटावा लागत आहे.