शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

अंबाबाईच्या गाभाऱ्यात बसविणार लाकडी खिडक्या

By admin | Updated: June 23, 2016 01:07 IST

देवस्थान समितीचा निर्णय : वेदर स्टेशनची आठ दिवसांत सोय, निविदा प्रसिद्ध

कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई मूर्तीचे जतन, संवर्धनासाठी व गाभाऱ्यातील आर्द्रता कमी करण्यासाठी लाकडी खिडक्या बसविण्यात येणार आहेत. याशिवाय मंदिरातील तापमान व आर्द्रता मोजण्यासाठी वेदर स्टेशन सुरू करण्याचा निर्णय बुधवारच्या देवस्थान समितीच्या बैठकीत घेण्यात आला. अंबाबाई मूर्तीच्या संवर्धनासाठी देवस्थान समितीने नियुक्त केलेल्या शिवाजी विद्यापीठाचे पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख पी. डी. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आर्द्रता समिती कार्यरत आहे. अंबाबाई मूर्तीचे रासायनिक संवर्धन झाल्यानंतर पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी मूर्ती संवर्धनासाठी काही नियम घालून दिले होते. मात्र, त्याचे अद्यापही पालन होत नसल्याने त्याचा परिणाम मूर्तीवर होत आहे. त्या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी डॉ. पी. डी. राऊत, देवस्थानच्या सचिव शुभांगी साठे, सदस्या संगीता खाडे, पर्यावरणतज्ज्ञ उदय गायकवाड, श्रीपूजक केदार मुनीश्वर, माधव मुनीश्वर, विवेकानंद महाविद्यालयाचे मिलिंद कारंजकर, अभियंता सुदेश देशपांडे उपस्थित होते. यावेळी पुरातत्त्व खात्याने दिलेल्या अंतरिम अहवालातील शिफारशींचा आढावा घेण्यात आला. गाभाऱ्यातील आर्द्रता कमी व्हावी व हवा खेळती राहावी, यासाठी गाभाऱ्यात लाकडी खिडक्या बसविण्याचा निर्णय झाला. मॉडेल म्हणून एक लाकडी खिडकी बनविली होती. त्याला सदस्यांनी मान्यता दिली. गाभाऱ्यासह मंदिरातील तापमान व आर्द्रता मोजता यावी, यासाठी वेदर स्टेशन बसविण्यात येणार आहे. त्यासाठीची निविदा देवस्थानच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आली असून, आता केवळ आॅर्डर काढणे बाकी आहे. येत्या आठ दिवसांत हे वेदर स्टेशन मशीन कार्यान्वित करण्यात येणार आहे, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली आहे.अंबाबाई मंदिर गाभारा : श्रीपूजकांसाठी सूचनागाभाऱ्यात कमीत कमी पाण्याचा वापर केला जावा, अशी सूचना श्रीपूजकांना केली. पाण्याचा साठा करावा लागू नये, यासाठी २४ तास पाण्याचे कनेक्शन देण्यात येणार असून, त्याचा प्रस्ताव महिन्यापूर्वी महापालिकेला पाठविला आहे. नवरात्रीत मंदिर पाण्याने धुऊन काढले जाते. यावर्षीपासून मंदिर न धुता केवळ व्हॅक्यूम क्लीन करण्यात येणार आहे.देवीची पूजा बांधताना कमीत कमी फुलांचा वापर करावा, अशा सूचना श्रीपूजकांना दिल्या आहेत.कोणत्याही भाविकाला मंदिराच्या परिसरात फुलांची सजावट करायला परवानगी देण्यात येणार नाही. मंदिरात सर्वत्र एलईडी बल्ब बसवले असून, दुकानदारांना व व्यापाऱ्यांनाही तशा लेखी सूचना देण्यात येणार आहेत.