शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुनी औद्योगिक वसाहतीसाठी स्वारस्य कोणाचे ?

By admin | Updated: March 20, 2016 23:24 IST

शासकीय यंत्रणा कार्यरत : शेतकरी लोकप्रतिनिधींचा विरोध

जहाँगीर शेख -- कागल --निपाणी शहरालगत महाराष्ट्रात असलेल्या अर्जुनी तालुका कागल येथे जवळपास ६२५ एकर शेतजमिनीवर उभारण्यात येणाऱ्या औद्योगिक वसाहतीला येथील शेतकऱ्यांचा विरोध कायम असून २०११ पासून हे शेतकरी महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयाविरुद्घ लढाई करीत आहेत. ज्यांच्या जमिनी यासाठी जाणार आहेत त्यांचा जमिनी देण्यास ठाम विरोध असतानाही शासकीय यंत्रणा या औद्यागिक वसाहतीच्या निर्मितीसाठी धडपडत करीत आहेत. कागल तालुक्यातील लोकप्रतिनिधींसह निपाणीच्या लोकप्रतिनिधींचाही यास विरोध असताना येथेच औद्योगिक वसाहत उभी करण्यात नेमका ‘‘इंटरेस्ट’’ कोणचा ? हा एकच सवाल अर्जुनी परिसरात ऐकावयास मिळतो.कागल येथील बहुद्देशीय शासकीय सभागृहात प्रांताधिकारी मोनिका सिंह यांच्या अध्यक्षतेखाली प्रस्तावित औद्योगिक वसाहतीला संपादित करावयाच्या जमिनीची मोजणी आणि सर्व्हे करण्याबद्दल नुकतीच बैठक घेण्यात आली. तेव्हा उपस्थित शेतकऱ्यांनी एक इंचही जमीन देण्यास विरोध कायम असल्याचे बजावले. प्रांताधिकारी आणि इतर शासकीय अधिकाऱ्यांनी या औद्योगिक वसाहतीच्या उभारणीचे फायदे किती याचा ऊहापोह केला. सरतेशेवटी शेतकऱ्यांच्या विरोधाची नोंद घेऊन तसे शासनास कळविण्यात येईल आणि शासन आदेशाने पुढील कारवाई करण्यात येईल, असे सांगितल्याने शासन स्तरावर पुन्हा पुन्हा जमीन संपादनाचे प्रयत्न होत राहतील हे स्पष्ट झाले आहे. २०११ पासून विरोध करीत आहेत. पुढेही शेतकरी विरोधासाठी तयार असतील. यातून शेतकरी विरुद्ध शासन हा संघर्ष पहावयास मिळणार आहे.अर्जुनी येथे औद्योगिक वसाहत व्हावी अशी मागणी आम्ही अथवा कागल तालुक्यातील, जिल्ह्यातील कोणी एकानेही केलेली नसताना येथे हा घाट कोणी आणि कशासाठी घातला? हाच खरा प्रश्न आहे. पर्यावरण निसर्ग संपदा शेतजमीन, रहिवाशी क्षेत्र अशा कोणत्याही बाजूचा विचार न करता शासन स्तरावर औद्योगिक वसाहतीच्या उभारणीचे प्रयत्न सुरू आहेत. मुळात जिल्ह्यातील उद्योजकच कर्नाटकात स्थलांतरित होण्याची भाषा करीत असताना नेमकी ही वसाहत कोणाला हवी आहे?- आनंदा रामा नाईक (गायकवाडी) एका औद्योगिक वसाहतीच्या निर्मितीतून त्या परिसरातील लोकांचा मोठा फायदा होतो. परिसराचा कायापालट होतो. सीमाभागातील औद्योगिकीकरणासाठी अर्जुनी येथे औद्योगिक वसाहत उभारण्याचा निर्णय झाला आहे. जमीन संपादन, नुकसानभरपाई असे विविध प्रश्न चर्चेतून सोडविता येतील. मात्र, याबद्दल कोणी गैरसमज करु नयेत. सकारात्मक भूमिका ठेवली पाहिजे. शासन शेतकरी आणि जमीनधारकांना विश्वासात घेऊन निर्णय घेईल.- मोनिका सिंह, प्रांताधिकारी, करवीरप्रस्तावित औद्योगिक वसाहतजून २०११ दरम्यान शेतकऱ्यांच्या सात-बारावर औद्योगिक वसाहतीसाठी राखीव अशी नोंद तलाठांच्याकडून करण्यात आणि ही नोंद २४७ हेक्टरवर झाली. तेथून आंदोलनाला सुरवात.कागल तालुक्यातील अर्जुनी गावातील तसेच ४१९ कर्नाटक हद्दीतील गायकवाडी गावातील शेतकऱ्यांच्या या जमिनी आहेत. या जमिनीत ऊस, तंबाखू, भाजीपाला, फळे यासह कडधान्ये आदी पिके घेतली जातात. धनगर समाजाची चराऊ पडीक जमीनही मोठ्या प्रमाणात आहे.प्रस्तावितऔद्योगिक वसाहत निपाणीपासून ५ किलोमीटरवर निपाणी- मुरगूड रस्त्याकडेला आहे. २०११ पासून आंदोलन सुरू आहे. माजी आमदार काकासाहेब पाटील वगळता कागल व निपाणीमधील सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधींनीही विरोध असल्याची पत्रे दिली आहेत. प्रत्येकवेळी सर्व शेतकरी विरोधासाठी एकदिलाने लढाई करीत आहेत. काकासाहेब पाटील यांच्यामुळे या वसाहतीला मंजुरी मिळाल्याचा आंदोलकांचा दावा.