शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

मूलभूत सुविधांच्या गर्तेत विचारे माळ

By admin | Updated: March 12, 2015 23:51 IST

कमी दाबाचा अवेळी पाणीपुरवठा : शौचालयांची दुरवस्था, प्रॉपर्टी कार्डची प्रतीक्षा

शहरातील झोपडपट्टीबहुल मतदारसंघ म्हणून विचारे माळ प्रभागाची ओळख आहे. गेल्या पाच वर्षांत या प्रभागाचा चेहरा बदलण्याचा प्रयत्न महापालिकेतील राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते राजेश लाटकर यांनी केला आहे. सिमेंट कॉँक्रीटचे अंतर्गत रस्ते, गटर्स, वीजपुरवठा, समाजमंदिर अशी कामे केली आहेत; पण शौचालयांची दुरवस्था, कमी दाबाचा पाणीपुरवठा आणि प्रॉपर्टी कार्डची वानवा या प्रभागातील प्रमुख समस्या आहेत. विचारेमाळ प्रभागात अठरापगड जातींचे लोक राहतात. हकीम गल्ली, वडर गल्ली, धनगर गल्ली आणि पन्हाळकर गल्ली, पंढरपूर वसाहत येथे झोपडपट्टी वसाहत आहे. हकीम गल्ली, वडर गल्ली आणि पन्हाळकर गल्लीत रस्त्यांची दुर्दशा आहे. गटारी अरुंद असून त्या घुशींनी पोखरलेल्या आहेत. येथील नागरिकांची गटारींची मागणी जुनी आहे. लोकसंख्येच्या तुलनेत शौचालयांची संख्या अपुरी आहे. पन्हाळकर आणि हकीम गल्ली येथील शौचालयांत परिसरात प्रचंड दुर्गंधी आहे. अनेक ठिकाणी शौचालयांची दारेच गायब आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव असलेल्या सभागृहाची अवस्था दयनीय आहे. पावसाळ्यात या सभागृहात गळती लागते. कुलुपांचा पत्ता नाही. आजूबाजूला घाणीचे साम्राज्य आहे. वडर गल्ली विकासापासून वंचित असल्याचे येथील समाजबांधवांचे म्हणणे आहे. अपवाद वगळता प्रभागात सर्वच ठिकाणी कमी दाबाचा पाणीपुरवठा होतो. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी उशिरापर्यंत वाट पाहावी लागते. त्यामुळे सकाळी अकराच्या सुमारासही पाण्यासाठी इथे गर्दी असते. अनेक ठिकाणी पाण्याच्या टाक्या बसविण्यात आलेल्या आहेत; पण कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे प्रभागात अनेक ठिकाणी मोटारींचा वापर केला जातो. हकीम गल्ली, पन्हाळकर गल्ली, धनगर गल्ली येथे गेल्या पाच वर्षांत रस्ते झालेले नाहीत. रस्ते उखडलेले आहेत. या ठिकाणी रस्ते होणे गरजेचे आहे. बौद्धविहाराकडील बाजूच्या गटारी उघड्याच आहेत. कचऱ्यांचे ढीगच्या ढीगच येथे आहेत. कचऱ्यांचा उठाव वेळेवर केला जात नाही. अनेक ठिकाणी अरुंद गटारी असल्यामुळे पावसाळ्यात झोपड्यांमध्ये पाणी शिरते. एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत येथे बांधण्यात आलेल्या इमारतीमधील नागरिकांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागतो. शौचालयांतील मैला वाहून नेण्यासाठी ड्रेनेज लाईनची गैरसोय आहे. त्यामुळे इमारतीच्या परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरते. सुमारे १०४ सदनिका असलेल्या या इमारतीमधून बाहेर येण्यासाठी एकच जिना आहे. पालिका आणि शासनाने राहण्याची सोय नव्हे, शुद्ध फसवणूक केल्याची भावना येथील रहिवाशांमध्ये आहे. गेल्या पाच वर्षांत विचारेमाळ झोपडपट्टीचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न केला आहे. प्रमुख गल्ल्यांत सिमेंट-कॉँक्रीटचे रस्ते आणि गटारी केलेल्या आहेत. शाहू कॉलेज ते लिशा हॉटेल हा रस्ता, पंचशील सांस्कृतिक हॉल, एलईडी लाईट ही कामे केली आहेत. निळा चौक समाजमंदिर रस्ता मंजूर आहे. जागेअभावी शौचालये बांधण्याची समस्या आहे. आजपर्यंत सुमारे दीडशे कुटुंबांना शौचालयासाठी अनुदान दिले आहे. - राजेश लाटकर, नगरसेवक