४ मार्चपासून या लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात १५९९ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला व ८५८ लाेकांना दुसरा डोस देण्यात आला. त्यांच्याबरोबरीने काम करणाऱ्या अन्य कर्मचाऱ्यांपैकी ३१५५जणांना पहिला व १०८३ जणांना दुसरा डोस मिळाला आहे.
दुसऱ्या टप्प्यात सुरू झालेल्या साठ वर्षांपुढील नागरिकांपैकी २८ हजार ७८ लोकांना पहिला व ५९०८ जणांना दुसरा डोस मिळाला आहे. ४५ ते ६० वयोगटातील २२४१८ नागरिकांना पहिला व १९२५ जणांना दुसरा डोस दिला आहे. आरोग्य विभागाने ठरवलेल्या उद्दिष्टानुसार दररोज प्रत्येक आरोग्य केंद्राच्या कक्षेत दोनशे ते अडीचशे प्रमाणे १२०० ते १५०० लोकांना लस देणे अपेक्षित आहे. मात्र, इतक्या प्रमाणात लस उपलब्ध होत नाही. त्यामुळे केवळ तीनशे ते साडेतीनशे लोकांनाच लस दिली जात आहे. यात पहिला डोस घेतलेल्या लोकांना प्राधान्याने दुसरा डोस दिला जात आहे.