शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
2
Video: चीनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
3
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
4
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
5
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
6
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
7
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
8
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
9
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
11
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
12
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
13
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
14
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
15
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
16
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
17
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
18
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
19
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
20
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 

जलशुद्धिकरणाचे ‘अशुद्ध, गलिच्छ’ केंद्र

By admin | Updated: November 26, 2015 00:33 IST

बालिंगा केंद्र बनले लावारिस : जलशुद्धिकरणाची प्रक्रिया उघड्यावरच; परिसरात कचरा, शेणाच्या ढिगाऱ्यांचे साम्राज्य

भारत चव्हाण ल्ल कोल्हापूरबालिंगा येथील ऐतिहासिक जलशुद्धिकरण केंद्र आता लावारिस बनले आहे. गेल्या ६७ वर्षांत शहराची तहान भागविणाऱ्या या जलशुद्धिकरण केंद्राकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे निसर्गरम्य परिसर आता कचरा आणि शेणाच्या ढिगाऱ्यात बुडाला आहे. कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आता गावठी श्वानांची व जनावरांची आश्रयस्थाने बनली आहेत. करोडोंची मिळकत आणि त्याहीपेक्षा नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाचा परिसर असा अस्वच्छ बनल्याने ‘स्मार्ट सिटी’कडे आपण कशी वाटचाल करणार, हाच प्रश्न आहे. कोल्हापूर शहराची तहान भागविण्यासाठी १९४९ मध्ये शहराच्या पश्चिमेला बालिंगा गावच्या हद्दीत सरकारने प्रतिदिन २४ लक्ष गॅलन क्षमतेचे जलशुद्धिकरण केंद्र उभारले. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर हे जलशुद्धिकरण केंद्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली आले; परंतु राज्य सरकारच्या धोरणांत बदल होऊन शहराला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी महापालिकेवर सोपविण्यात आली. त्याचाच भाग म्हणून हे जलशुद्धिकरण केंद्र १९९२ मध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या ताब्यात आले. महानगरपालिकेच्या ताब्यात हे केंद्र आल्यानंतर त्याचा विस्तार झाला. त्याची शुद्धिकरणाची क्षमताही वाढविण्यात आली. सध्या जलशुद्धिकरणासाठी या केंद्रात आठ वाळूंचे वाफे (बेड) आहेत; परंतु केंद्रातील दुरुस्ती, देखभालीकडे प्रशासनाने म्हणाव्या तितक्या गांभीर्याने लक्ष दिले नसल्याने या वाफ्यातील वाळूचे वाफे गाळात बुडाले आहेत. बऱ्याच ठिकाणी गळती लागली आहे तर लोखंडी जलवाहिन्या अक्षरश: गंजलेल्या आहेत. नदीतून घेतलेल्या पाण्यात वाऱ्याद्वारे वाहून आलेली बाहेरील धूळ मिसळते. जलशुद्धिकरण केंद्राच्या परिसरात एक सुंदर अशी बाग होती, परंतु ती आता गायब झाली आहे. बागेचे अवशेषही पाहायला मिळत नाहीत. काही एकरांचा हा परिसर तारेच्या कुंपणाद्वारे बंदिस्त असायचा. सुरक्षेची पूर्ण खात्री पटल्याखेरीज कर्मचाऱ्यांच्या नातेवाइकांनाही आतमध्ये सोडले जात नव्हते. खात्री पटल्यावरदेखील नाव, पत्ता, सही घेतली जात असे; परंतु या सर्व गोष्टी आता इतिहासजमा झाल्या आहेत. परिसरातील तारेचे कुंपण, लोखंडी दरवाजे गायब झाले आहेत. कोणीही, कोणत्याही बाजूने सहजपणे जलशुद्धिकरण केंद्रात जाऊ शकते. खिडक्या गायब आहेत. काही ठिकाणी काचा फुटलेल्या आहेत. दरवाजे तर कुठेच दिसत नाहीत. इतके ते असुरक्षित बनले आहे. निवासस्थाने बनलीत जनावरांचे आश्रयस्थानजलशुद्धिकरण केंद्राच्या परिसरातच कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी सुबक कौलारू घरे बांधण्यात आली होती. त्यातील काही घरांत आजही कर्मचाऱ्यांची कुटुंबे राहतात; परंतु चार घरे तसेच अधिकाऱ्याचा बंगला आता गावठी कुत्र्यांचा, जनावरांचे आश्रयस्थान बनले आहे. काही मद्यपी लोकही त्याचा राजरोस वापर करतात. निवासस्थानांचे दरवाजे, खिडक्या, कौले चोरीस गेली आहेत. त्यातच गवत, झाडे-झुडपे वाढली आहेत. अतिशय सुसज्ज स्थितीतील ही घरे आता नामशेष होऊ लागली असून, अधिकाऱ्याचा बंगला तर भूतबंगला बनला आहे. कचरा, शेणाचे ढीग काही एकरांत पसरलेल्या जलशुद्धिकरण केंद्राच्या परिसरात आता कचऱ्याचे आणि जनावरांच्या शेणाचे ढीग साचले आहेत. बालिंगा गावचा सगळा कचरा येथेच टाकला जातो की काय, अशी शंका येते. शेणापासून गोवऱ्या थापल्या जात आहेत. जलशुद्धिकरण केंद्राकडून येणारा एक पाण्याचा ओहोळ रस्त्यावरच अडवून शेणी थापण्यासाठी हे पाणी वापरले जात आहे. एका बाजूला कचरा आणि दुसऱ्या बाजूला शेणाचे ढीग यामुळे परिसराचे प्रचंड विद्रुपीकरण झाले आहे. या भागाला पाणीपुरवठा ४बालिंगा जलशुद्धिकरण केंद्रातून कोल्हापूर शहराच्या बहुतांशी भागात पाणीपुरवठा करण्यात येतो. ४चंबुखडी टाकीतून सी व डी वॉर्डाला पाणीपुरवठा होतो. त्यामध्ये रंकाळा तलावापासून ते बी. टी. कॉलेज, बागल चौकापर्यंतच्या भाग येतो. ४आपटेनगर टाकीतून सानेगुरुजी, तुळजाभवानी मंदिर ते शिवाजी पेठ व मंगळवार पेठेच्या काही भागाला पाणीपुरवठा होतो.