शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

इचलकरंजीतील प्रमुख रस्त्यांसाठी बारा कोटी

By admin | Updated: April 17, 2015 00:08 IST

सुरेश हाळवणकर : फुटपाथ, पथदिव्यांसह रस्ते करणार; रामलिंग, धुळोबासाठी विकास आराखडा तयार

इचलकरंजी : शहरातील बाह्यवळण मार्गांसह प्रमुख रस्ते सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत करण्यात येणार असून, त्यासाठी बारा कोटी रुपयांचे अनुदान शासनाने देण्याची मंजुरी दर्शविली आहे. तसेच शासनाच्या अनुदानातून शहरातील सर्व नळांना मीटर बसविण्यात येतील, अशी माहिती आमदार सुरेश हाळवणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.इचलकरंजी शहरातील प्रमुख रस्त्यांसाठी शासनाने बारा कोटी रुपयांचे विशेष अनुदान देण्यास मंजुरी दिली आहे. हे रस्ते दुभाजक फुटपाथांसह पथदिव्यांनी सुशोभित केले जातील, असे सांगून आमदार हाळवणकर म्हणाले, या रस्त्यांसाठी संबंधित मक्तेदाराकडून पाच वर्षांची हमी घेतली जाईल. नगरपालिकेकडील आयजीएम दवाखान्यासाठी ३० कोटी रुपयांची यंत्रसामग्री देण्याची तयारी शासनाची आहे; पण त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर व तंत्रज्ञ मिळत नाहीत. म्हणून ‘पब्लिक-प्रायव्हेट प्रॉपर्टी’ तत्त्वाने दवाखाना पूर्णपणे चालू केला जाईल. त्यामुळे केसरी, पिवळ्या व अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना मोफत उपचार मिळतील. यंत्रमाग व्यवसाय कृषिपूरक उद्योग असल्याने त्याला स्वतंत्र वर्गवारीचा दर्जा दिला जाईल. यंत्रमाग उद्योगासाठी सवलतीचा वीज दर मिळावा, यासाठी शासनाने १२३२ कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. त्यामुळे वीज दर दोन रुपये ५० पैसे प्रति युनिट राहण्याची शक्यता आहे. कृष्णा नळपाणी योजनेची अशुद्ध पाण्याची दाबनलिका अंशत: बदलण्यासाठी ३० कोटी रुपयांच्या प्रस्तावाला गती मिळाली आहे. रामलिंग व धुळोबा येथे वनपर्यटन व वनउद्यान अशी २०० एकर जागा विकसित करण्याचा आराखडा तयार करण्यात आला असून, तेथे वन खात्याकडून निधी उपलब्ध करून विकास केला जाणार आहे. कबनूर हद्दीमध्ये नवीन पोलीस ठाणे, रेल्वे मार्गावर अतिग्रे व हातकणंगले येथे उडान पूल बांधण्यासाठी सरकारकडून निधी देण्यात येईल. (प्रतिनिधी)चिंचवाड-रुकडीच्या भू-संपादनासाठी ३.५ कोटीनवे चिंचवाड ते रुकडी दरम्यानच्या रस्त्याचे भू-संपादन करण्यासाठी साडेतीन कोटी रुपये शासनाने मंजूर केले असून, पंचगंगा नदीवरील पूल थेट या रस्त्याने जोडला जाईल. त्याचप्रमाणे या मार्गाचे रुंदीकरण व विकास जिल्हा मार्ग म्हणून केला जाईल. तसेच इचलकरंजी मतदारसंघातील अन्य गावांनाही जोडणारे रस्ते विकसित केले जाणार असून, त्यासाठी १२.५५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.यंत्रमाग कामगार मंडळ महिन्यातसुतावर प्रतिकिलो एक रुपया सेस आकारून यंत्रमाग कामगार कल्याण मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. त्याला येत्या महिन्याभरात अंतिम मान्यता मिळेल. तसेच यंत्रमाग कामगार किमान वेतनाची पुनर्रचना २८ वर्षानंतर झाली असून, त्याची अधिसूचना २९ जानेवारीला जाहीर झाली आहे. त्यामुळे आता या क्षेत्रातील कामगारांना ८५०० ते ९५०० रुपये दरमहा वेतन मिळेल, अशीही माहिती आमदार हाळवणकर यांनी दिली.