शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

सिंधुदुर्गातील हळद क्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:44 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यात हळद लागवडीला पोषक असे वातावरण असून, या लागवडीला प्रोत्साहन दिल्यास अनेकांना आत्मनिर्भरतेकडे जाणारी वाट आपण दाखवू शकतो, ...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात हळद लागवडीला पोषक असे वातावरण असून, या लागवडीला प्रोत्साहन दिल्यास अनेकांना आत्मनिर्भरतेकडे जाणारी वाट आपण दाखवू शकतो, ही गोष्ट लक्षात आल्यावर या अभियानाचे संयोजक अतुल काळसेकर यांनी या विषयाचा सर्वांगीण विचार आणि अभ्यास करायला सुरुवात केली. पारंपरिक पद्धतीने भात लागवड सोडून अन्य पीक पर्यायांकडे फारसे लक्ष न देणाऱ्या इथल्या शेतकरी बंधूंना एखाद्या नवीन पीक प्रकाराकडे वळविणे म्हणावे तितके सहज सोपे नव्हते.

त्यामुळे चिकित्सक असलेल्या आपल्या लोकांना या पीक बदलातील आर्थिक गणित समजावून सांगणे, त्यानंतर बियाणे पुरविण्यापासून, त्याच्या लागवडीचे मार्गदर्शन ते उत्पादित मालाची विक्री इथपर्यंतच्या सगळ्या व्यवस्था उभ्या करण्याचा विश्वास त्यांना देणे गरजेचे होते. महत्त्वाचे म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या सिंधू आत्मनिर्भर अभियानाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा विश्वास दिला.

इतकेच नव्हे, तर विश्वासावरचा 'विश्वास' वाढवा इतक्या आत्मियतेने तो सार्थ ठरवला. गेल्या जून महिन्याच्या सुरुवातीस जिल्ह्यात या अभियानांतर्गत २५/३० टन हळद बियाण्यांचे मोफत वाटप करण्यात आले. ठिकठिकाणी महिला बचतगट आणि तरुणांना हळद लागवडीची प्रशिक्षणे देण्यात आली. तरुणाईला शेती प्रयोगासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ‘सेल्फी वुईथ हळद कॅम्पेन’ राबविण्यात आले. त्यानंतर मोफत खत वितरण करण्यात आले. अभियानाच्या कार्यकर्त्यांनी हळदीच्या प्लॉटवर भेटी दिल्या. या सर्वाचा अपेक्षित असा परिणाम या प्रयोगात झाला .पहिले वर्ष असूनही उत्पादन चांगले मिळाले.

दरम्यान, इतक्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन होणारी हळद खरेदी करण्याची यंत्रणा उभी करणे गरजेचे होते. त्यासाठी १०,५०० प्रतिटन असा विक्रमी दर देऊन खरेदी केंद्र सुरू होत आहेत, ज्याचा काही दिवसांपूर्वी प्रारंभदेखील झाला.

त्याचबरोबर या ओल्या हळदीची हळद पावडर करण्यासाठी प्रोसेसिंग युनिट उभारणे गरजेचे होते. जे आपल्या जिल्ह्यात नव्हते. माणगावच्या हेडगेवार प्रकल्पात असे अनेक शेती आणि फळ प्रक्रिया प्रयोग सुरू आहेत, यशस्वी झालेले आहेत. त्या प्रकल्प व्यवस्थापनाला या अभियानाशी जोडण्यात आले. यापुढे जाऊन मशीनरी खरेदीचा विषय होता. तोही प्रश्न के. एस. एस. आर. इंटरप्रायझेस या कंपनीच्या माध्यमातून निकाली निघाला.

आता प्रकल्पात येणाऱ्या हळदीवर प्रोसेसिंग करून त्याची गुणवत्तापूर्ण अशी हळद पावडर करण्यात येणार आहे. खास कोकणी अशा ब्रँडद्वारे त्याची मुंबई-पुण्यासारख्या शहरात विक्री व्यवस्था उभी रहात आहे. अंदाजाप्रमाणे साधारण ७० ते ७५ टन हळद पावडर यावर्षी जिल्ह्यात तयार होईल आणि पुढच्यावर्षीच्या लागवडीसाठी किमान ६०/७० टन बियाणे उपलब्ध होईल. तसं पाहिलं तर जिल्ह्याच्या दृष्टीने हा फार मोठा विषय आहे.

अशातऱ्हेने या हळद क्रांती प्रयोगात भगीरथ ग्रामविकास, हेडगेवार प्रकल्प अशा सेवाभावी संस्थांचा सहयोग घेत, हे अभियान वेगाने पुढे जात आहे आणि म्हणूनच मी मघाशी म्हणालो तसं ‘अ’पासून ‘ज्ञ’ म्हणजे बियाणे पुरवठा ते विक्री व्यवस्था असे हे परिपूर्ण अभियान आहे. त्यामुळे राज्यातील आत्मनिर्भर अभियान चळवळीला ते आदर्शवत ठरेल, यात वाद नाही.

अर्थात या सर्व प्रवासात या अभियानाचे मार्गदर्शक आमदार रवींद्र चव्हाण, आमदार नीतेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचे सर्वच स्तरावरील सहकार्य, संयोजक अतुल काळसेकर यांची संकल्पना तसेच ते आणि त्यांचे सहकारी यांची मेहनत, या विषयातलं सातत्य, डॉ प्रसाद देवधर, सुनील उकिडवे यांचे तांत्रिक मार्गदर्शन, के. एस. एस. आर.च्या सुहासी रवींद्र चव्हाण यांचा आर्थिक सहयोग, तसेच जिल्ह्यातील सर्व शेतकरी, महिला, तरुण यांचा उत्साह या साऱ्या बाबी मैलाचे दगड ठरत आहेत.

चाैकट

हळद लागवडीचे पीक

सिंधुदुर्ग जिल्‍ह्यात आंबा, काजू, नारळ याबरोबरच हळद लागवडीतूनही लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. यातून शेतक-यांना आर्थिक विकासाचा मार्ग मिळू शकतो, हे वास्‍तवात घडले आहे. लुपीन फाऊंडेशनच्‍या माध्‍यमातून नारुर येथील संजय मेस्‍त्री या शेतक-याने दोन एकर क्षेत्रात हळद लागवडीतून सुमारे सव्‍वा लाख रुपयांची उलाढाल केली आहे. लुपीन फाऊंडेशनने सिंधुदुर्ग जिल्‍ह्यात आता तब्‍बल २३ हेक्‍टरवर हळद लागवडीचे पीक यशस्‍वीरित्‍या घेतले असून, या माध्‍यमातून जिल्‍ह्यात सुमारे २५ लाख रुपयांची जिल्‍ह्याच्‍या आर्थिक उत्‍पन्‍नात भर पडणार आहे.

चाैकट

हळद लागवडीतून आर्थिक विकास

सिंधुदुर्ग जिल्‍ह्यात आंबा, काजू, नारळ यांचे उत्‍पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते, हे सर्वश्रुत आहे. यानंतर जिल्‍ह्याच्‍या दक्षिण भागात केळी लागवडीतून मोठया प्रमाणात आर्थिक उलाढाल होत आहे. मात्र, या जिल्‍ह्यात हळद लागवड या नगदी पिकातून लाखो रुपयांची उलाढाल झालेली आहे. जिल्‍ह्यात हळद लागवडीतून मोठ्या प्रमाणात आर्थिक विकास साधण्‍याचे उद्दिष्‍ट डोळ्यासमोर ठेवून लुपीन फाऊंडेशन ही संस्‍था सिंधुदुर्ग जिल्‍ह्यात कार्यरत झाली आहे. गेल्‍या चार वर्षांपासून एक एकरपासून हळद लागवडीच्‍या उत्‍पादनाला सुरुवात करण्‍यात आली होती. आता हेच उत्‍पादन सिंधुदुर्ग जिल्‍ह्यात २३ हेक्‍टरपर्यंत पोहोचले आहे.

चाैकट

हळद लागवडीतील यशोगाथा

कुडाळ तालुक्‍यातील नारुर येथील संजय मेस्‍त्री या शेतक-याची हळद लागवडीतील यशोगाथा सर्वांना प्रेरणादायी ठरणारी आहे. या क्षेत्राने आपल्‍या दोन एकर वरकस जमिनीमध्‍ये हळद लागवडीचे उत्‍पादन घेण्‍यास सुरुवात केली आहे. डोंगराळ अशी ही जमीन गेली कित्‍येक वर्षे विनावापर पडून होती. या जमिनीत या शेतक-यांनी यावर्षी हळद लागवडीचे उत्‍पादन घेतले आहे. यासाठी या शेतक-याला लुपीन फाऊंडेशनने ६०० किलो हळदीचे बियाणे पुरवले होते. या उत्‍पादनाला त्‍याला चांगला प्रतिसाद मिळाला असून, पहिल्‍याचवर्षी सव्‍वालाख रुपयाची आर्थिक उलाढाल होण्‍याचा अंदाज या शेतक-याने व्‍यक्‍त केला आहे. यासाठी लुपीनचे कृषी अधिकारी प्रताप चव्‍हाण तसेच लुपीनचे योगेश प्रभू व कार्यक्रम अधिकारी नारायण कोरगावकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली या शेतक-यांनी हे हळदीचे उत्‍पादन यशस्‍वीरित्‍या घेतले आहे.

चाैकट

प्रेरणादायी प्रकल्प

यापूर्वी या शेतक-याने टिशू कल्‍चरवर आधारित केळ्याची लागवड केली होती. या उत्‍पादनातील यशस्‍वीता लक्षात घेऊन या शेतक-याने यावर्षी व्‍यापारी तत्त्‍वावर हळदीची लागवड केली आहे. यासाठी शेतक-याला सुमारे ३० हजार रुपये खर्च आला असून, सुमारे सव्‍वालाख रुपयांचे आर्थिक उत्‍पन्‍न येणे अपेक्षित आहे. घरची परिस्थिती गरिबीची असली तरी, या कष्‍टाळू शेतक-याने या वरकस जमिनीत हळदीचे सोने पिकवून आपल्‍या आर्थिक उन्‍नतीचा मार्ग सुकर केला आहे. जिल्‍ह्यातील इतर शेतक-यांसाठीही हा प्रकल्‍प प्रेरणादायी आहे.

प्रभाकर सावंत, सिंधुदुर्गनगरी

(लेखक भाजपचे जिल्हा पदाधिकारी आहेत.)

27 halad 01

27 halad 02

27 halad 03

27 halad 04

27 halad 05