शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लाईन बझारची इन्फंट्रीच्या त्र्यंबोली यात्रेची परंपरा

By admin | Updated: July 26, 2016 00:37 IST

पी-ढबाकचा गजर : संस्थानकालीन राजाराम रायफल्सने १८६८ मध्ये अर्पण केले मुखवटे

इंदुमती गणेश -- कोल्हापूर --राजाराम महाराज यांच्या काळातील इन्फंट्रीमधील सैनिकांकडून केल्या जाणाऱ्या त्र्यंबोली यात्रेची परंपरा अद्यापही लाईन बझारने जपली आहे. ‘कोल्हापूरचे रक्षण करणारी देवता’ म्हणून त्र्यंबोली व मरगाई देवीला राजाराम रायफल्सकडून सन १८६८ मध्ये मुखवटे अर्पण करण्यात आले. डॉल्बीच्या जमान्यात त्र्यंबोली यात्रेचे स्वरूप बदलले असले तरी येथून मात्र ‘पी ढबाक्’च्या गजरात पालखी त्र्यंबोलीला जाते. ब्रिटिशांनी सन १८४५-४८ च्या दरम्यान आताच्या लाईन बझार येथील स्थानिकांकडून भूखंड घेऊन रेसिडेन्सी स्थापन केली. याच्या संरक्षणासाठी इन्फंट्री सुरू करण्यात आली त्यात ८०० हून अधिक स्थानिकांची भरती करण्यात आली. ‘रक्षणकर्ती देवता’ म्हणून इन्फंट्रीमधील सैनिकांनी सन १८६८ मध्ये त्र्यंबोली व मरगाई देवीला चांदीचे मुखवटे, मासपट्टा, चपला अर्पण केल्या. त्यातील मुखवट्यांवर राजाराम रायफल्स कोल्हापूर यांच्याकडून ‘अर्पण शके १८६८ भार ७५’ असे नमूद आहे. शहाजी महाराजांच्या काळात इन्फंट्रीचे ‘शहाजी नगर’ असे नामांतर झाले. येथील वसाहती एका ओळीत होत्या. येथेच बाजारही भरायचा त्यामुळे या भागाला आता ‘लाईन बझार’ म्हणून ओळखले जाते. या लाईन बझारची त्र्यंबोली यात्रा आज, मंगळवारी होणार आहे. आजही हिंदू समाजातर्फे लाईन बझार या परिसरासाठी सरपंचांची निवड केली जाते. येथील मैदानावर होणाऱ्या सीमोल्लंघन सोहळ््याचा पहिला मान या सरपंचांना आहे. संस्थानकालीन वास्तूंचा परिसर या परिसरात संस्थानकालीन वास्तू आहे. लक्ष्मी-विलास पॅलेस, रिसाला म्हणजे आताचे एसआरपी कॅम्प, भगवा चौकातील पोलिसांची शाळा, ब्रिटिशकालीन रेसिडेन्सियल निवास म्हणजे सध्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निवासस्थान. इन्फंट्री पोलिसांचे निवासस्थान म्हणजे पोलीस मुख्यालय, कवायत मैदान म्हणजे महासैनिक दरबार, इंदुमती राणी सरकारांचा वाडा म्हणजे सर्किट हाऊस, घोड्याच्या पागा व राऊंडाचा माळ म्हणजे शेती फार्म कार्यालय.देवीचा कौल त्र्यंबोली यात्रा करण्यासाठी आजही येथील नागरिकांकडून देवीचा कौल घेतला जातो. त्यासाठी आषाढ महिन्याच्या पंधरा दिवस आधी लाईन बझार येथील जुनी जाणती मंडळी त्र्यंबोलीला जातात.घरटी एक आणा...देवस्थान समितीच्या कागदपत्रात त्र्यंबोली यात्रा राजाराम रायफल्समधील सैनिकांनी करावी. त्यासाठीचा खर्च कवट्याचं रान व मारुती देवालयामागील जमिनीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून करावा, असे नमूद आहे नंतर इन्फंट्रीच्या पगारातून रक्कम वजा केली जायची. पुढे घरटी मासिक एक आणा वर्गणी गोळा केली जायची. या सगळ््या हिंदू समाजाच्या सन १९६८-७१ या काळातील नोंदी आहेत.