शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
2
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
3
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
4
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
5
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
6
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
7
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
8
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
9
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
10
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
11
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
12
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
13
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
14
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
15
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
16
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
17
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
18
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
19
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
20
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल

आलासमध्ये बहुरंगी लढतीचे वातावरण

By admin | Updated: December 29, 2016 00:22 IST

नेते सक्षम उमेदवारांच्या शोधात : महिला आरक्षणामुळे मातब्बर इच्छुकांचा हिरमोड; कार्यकर्त्यांची पत्नींसाठी तयारी

अजित चंपुणावर-- बुबनाळ -आलास जिल्हा परिषद मतदारसंघ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला जागेसाठी आरक्षित झाल्याने इच्छुक मातब्बरांचा हिरमोड झाला आहे. आलास पंचायत समिती सर्वसाधारण महिला, तर गणेशवाडी पंचायत समिती सर्वसाधारण जागेसाठी खुला झाला आहे. त्यामुळे इच्छुकांनी मोर्चेबांधणीला प्रारंभ केला आहे. मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वर्चस्व असल्यामुळे स्वाभिमानी विरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यामध्ये बहुरंगी लढत होणार आहे. कर्नाटक सीमाभागालगत वसलेला शिरोळ तालुक्यातील ४३ हजार ३९५ लोकसंख्या असलेला आलास जिल्हा परिषद मतदारसंघात यापूर्वी आठ गावांचा समावेश होता. मतदारसंघ पुनर्ररचनेत शिरटी व बस्तवाड या दोन गावांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. आलास मतदारसंघात २००२च्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी खासदार निवेदिता माने यांचे समर्थक दिवंगत शौकत पटेल यांनी नेतृत्व केले. धैर्यशील माने यांनी राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा येथू करीत २००७ ची निवडणूक जिंकत पुढे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपदही भूषविले. दरम्यान, २०१२ च्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली. यामध्ये सा.रे. पाटील गटाच्या अर्चना अनंत धनवडे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. या निवड प्रक्रियेत खासदार माने गटाला वगळण्यात आले होते. त्याचा फटका त्यांना बसला. खासदार माने गटाने गोकुळचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांच्या शिरोळ तालुका विकास आघाडीला अप्रत्यक्षरित्या बळ दिले. या आघाडीतर्फे जिल्हा परिषदेला पाशाजादी साहेबपाशा पटेल यांना तसेच आलास पंचायत समितीसाठी अभिजित जगदाळे यांना उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीत स्वाभिमानीच्या सुनंदा अजित दानोळे निवडून आल्या. तर आलास पंचायत समितीसाठी अफसर पटेल यांना उमेदवारी देण्यात आली. यावेळी स्वाभिमानीने नवख्या कमरोद्दीन पटेल यांना उमेदवारी दिली. स्वाभिमानीच्या लाटेत पहिल्याच प्रयत्नात पटेल निवडून आले.आलास मतदारसंघ नागरिकांचा मागासवर्ग महिला जागेसाठी आरक्षित आहे. त्यामुळे सध्यातरी मतदारसंघात शांतता असून, नेते मात्र सक्षम उमेदवाराच्या शोधात आहेत. सध्या या मतदारसंघावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्राबल्य असून, संघटना स्वबळावर लढणार आहे. संघटनेकडून जिल्हा परिषदेसाठी बुबनाळ ग्रामपंचायत सदस्य रोशनबी बैरगदार, कवठेगुलंदच्या सलमा वाळवेकर यांच्या नावाची चर्चा आहे. तर औरवाडचे उपसरपंच दादेपाशा पटेल यांच्या पत्नी परवीन पटेल यांचे नाव राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीकडून चर्चेत आहे. याबरोबर उल्फतबी मकानदार, आसमा जमादार, शमशाद झाकीर शिकलगार यांची नावेही चर्चेत आहेत. आलास पंचायत समितीसाठी सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून महावीर मगदूम यांच्या पत्नी रूपाली मगदूम, गौतम किणिंगे यांच्या पत्नी अश्विनी किणिंगे, औरवाडच्या माहेनूर रफ्युद्दीन पटेल यांची नावे चर्चेत आहेत. तर काँग्रेस, राष्ट्रवादीकडून शशिकला किणिंगे, दादामियाँ पठाण यांच्या पत्नी सायरा पठाण, आबिद पटेल यांच्या पत्नी सुमैय्या पटेल यांची नावे चर्चेत आहेत. बहुजन विकास आघाडीतर्फे अपर्णा अमोल हिंगणगावे हे इच्छुक आहेत. स्वभिमानीची ताकदसीमाभागालगत असलेला आलास मतदारसंघात सध्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हा परिषद सदस्य सुनंदा दानोळे, गणेशवाडी पंचायत समिती सदस्य वैशाली देवताळे, आलास पंचायत समितीचे सदस्य कमरोद्दीन पटेल यांच्यासह अजित दानोळे, मन्सुर मखमल्ला, रजनीकांत मरजे, बापुसो ऐनापूरे, शमशोद्दीन पटेल, नारायण वास्कर, अशोक देवताळे, अमृत आणुजे, गौतम किणिंगे ही स्वाभिमानी संघटनेची ताकद आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची शक्तीस्थळेमाजी पंचायत समिती सदस्य अर्चना धनवडे, ‘जवाहर’चे संचालक सुकुमार किणिंगे, नासर पठाण, बापूसो बोरगावे, सुरेश शहापूरे, आशरफ पटेल, विजय कुंभोजे, आनंदा कुम्मे, मल्लाप्पा चौगुले, अनंत धनवडे, दादासो देवताळे, विजयकुमार गाताडे, बशीर पटेल, शरद कारखान्याचे धनपाल मरजे, धनाजीराव जगदाळे, फजलेअली पटेल, असलम मखमल्ला, अफसर पटेल, सईद पटेल, अनिरुद्ध राजमाने यांच्यासह कार्यकर्ते काँग्रेसची शक्तीस्थळे आहेत. काँग्रेसला मानणारा मतदार, कार्यकर्ते, गट या मतदारसंघात कार्यरत आहे.