कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य हे न्यायाचे, नीतीचे आणि सर्वधर्मसमभावाचे होते. शत्रूंच्या मृतदेहाची विटंबना न करता इतमामात दफन करायला लावून त्यांचाही सन्मान करणाऱ्या शिवरायांचे चरित्र अथांग समुद्रासारखे आहे, असे प्रतिपादन दुर्ग अभ्यासक डॉ. अमर आडके यांनी आज, सोमवारी येथे केले.महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टतर्फे अंबाबाई मंदिरात आयोजित युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमालेच्या समारोपप्रसंगी ते ‘पन्हाळगड ते विशाळगड’ या विषयावर बोलत होते. डॉ. आडके म्हणाले, छत्रपती शिवरायांना संपविण्याचा विडा विजापूरच्या आदिलशहाचा सरदार अफझलखानाने उचलला. या अभिनिवेषातच तो आपले गुरू अमिन यांना भेटायला अफजलपूर येथे गेला. निद्रिस्त गुरुच्या पायाशी तो बसला होता. काही क्षणातच निद्रेतून गुरू जागे झाले. घामाघूम झालेले गुरू म्हणाले, तू शिवाजी महाराजांच्या मोहिमेवर जाऊ नकोस. अफझलने कारण विचारल्यावर, अरे तुझे शीर धडावेगळे झाल्याचे स्वप्न मला पडल्याचे त्यांनी उत्तर दिले. त्यामुळे अफझल बिथरला. तो विवेकशून्य झाला. मरण समोर आहे, पण विडा उचलल्याने प्रतिष्ठेचा प्रश्न होता. आपला मृत्यू गृहीत धरूनच तो तेथून बाहेर पडला. त्याला ६५ पत्नी होत्या. पहिली पत्नी वगळता अन्य ६३ जणींना ठार मारुन त्याने त्यांच्या कबरी बांधल्या हे पाहून त्याची एक पत्नी पळून गेली. परंतु तिला पुन्हा शोधून काढत तिला झाडाला उलटे टांगून तिला कोल्ह्या-कुत्र्यांना खायला घातले. त्यामुळे तिची कबर बांधली नाही. या घटनांचा साक्षीदार इटलीचा निकोलस मोरोची होता. मानवतेशी द्रोह करणाऱ्या अफझलखानाला शिवरायांनी ठार केले, ते बरं झाले, अशा शब्दांत त्याने लिहून ठेवले आहे.शत्रूच्या देहाची विटंबना करायची नाही, ही शिकवण शिवरायांनी आपल्या ‘मातोश्री’कडूनच घेतली होती. तीच परंपरा मराठ्यांनी जपली आहे. अफझल खानाच्या वधानंतर महाराजांनी काही दिवसांतच पन्हाळागड आपल्या ताब्यात घेतला. यावेळी लेखक शामकांत जाधव, माजी महापौर शिरिष कणेरकर, राजू मेवेकरी, नंदकुमार मराठे उपस्थित होते. (प्रतिनिधी)सुधा मूर्ती यांनीहीसमजून घेतली पावनखिंड ‘इन्फोसिस’च्या सुधा मूर्ती यांनी आपल्याकडून पावनखिंडीचा इतिहास प्रत्यक्ष चालून पाहिला व आपल्याकडून तो ऐकल्यानंतर त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या.
शिवरायांचे राज्य सर्वधर्मसमभावाच
By admin | Updated: December 9, 2014 00:31 IST