उत्तूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तूर (ता. आजरा) येथील ऊसतोडणी मजुरांना उबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी विजय गुरव, विठ्ठल उत्तूरकर, मिलिंद कोळेकर, प्रशांत ढोणुक्षे, तुषार घोरपडे, सुधीर सावंत, सुनील रावण, रोहन उत्तूरकर आदींसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
--------------------
वेळवट्टीत वाटाघाटी कार्यशाळा
पेरणोली : वेळवट्टी (ता. आजरा) येथे कुरकुंदेश्वर अकॅडमी येथे कोकण विकास संस्थेतर्फे वाटाघाटी या विषयावर एकदिवशीय कार्यशाळा पार पडली. कॉ. संपत देसाई, रणजित कालेकर, विकास सुतार, अरविंद लोखंडे यांनी चळवळींचा संघर्ष, वाटाघाटी, धोरण व प्रसार माध्यमांची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी दशरथ घुरे, नारायण भडांगे, भीमराव माधव, पांडुरंग दोरूगडे, निवृत्ती फगरे, मारुती पाटील, मुकुंद नार्वेकर, मनोहर कोगनूळकर, आदी उपस्थित होते. संस्थाध्यक्ष राजेंद्र कांबळे यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश मोरूस्कर यांनी आभार मानले.
--------------------
३) ऐश्वर्या नाईक हिची निवड
गडहिंग्लज : शहरातील शिवराज महाविद्यालयाच्या ऐश्वर्या जयसिंग देसाई हिची लोकसेवा आयोगाच्या ''''एक्साईज सबइन्स्पेक्टर''''पदी निवड झाली आहे. तिला संस्था सचिव प्रा. अनिल कुराडे, प्राचार्य डॉ. संभाजीराव कदम यांचे प्रोत्साहन, तर क्रीडाशिक्षक प्रा. राहुल मगदूम, प्रा. जयवंत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
--------------------
४) ''''शिवराज''''मध्ये मार्गदर्शन कक्षाची सुरुवात
गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयात नव्याने सुरू झालेल्या डी. फार्मसीकरिता प्रवेश घेतलेल्या व घेऊ इच्छिणाºया विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन कक्षाची सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती संस्था सचिव प्रा. किसनराव कुराडे यांनी दिली.
--------------------