उभारण्यात आलेले ऑक्सिजन प्लॅन्ट
रुग्णालये : सिलिंडरची संख्या
सीपीआर( १ हजार एलपीएम) : तीन प्लॅन्टमधूल ६०० सिलिंडर
आयजीएम, इचलकरंजी : दोन प्लॅन्टमधून ४०० सिलिंडर
आयसोलेशन : १५० सिलिंडर
गडहिंग्लज : दोन प्लॅन्टमधून ४०० सिलिंडर
कोडोली (५०० एलएमपी) : १००
मुरगूड : १००
राधानगरी : १००
मलकापूर : १००
चंदगड : १००
गारगोटी : १००
---
१०० टनाची तयारी
कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्याला रोज ३२ ते ३५ टन लिक्विज ऑक्सिजन लागायचे. दुसऱ्या लाटेत ही मागणी दुप्पट होऊन ५६ टनांपर्यंत गेली. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून राज्य शासनाने सर्वच जिल्ह्यांना ऑक्सिजनच्याबाबतीत स्वयंपूर्ण होण्यास सांगितले आहे, ही लाट अधिक तीव्र असेल, अशी शक्यता गृहित धरून जिल्हा प्रशासनाने १०० ते १५० टन ऑक्सिजनची तयारी ठेवली आहे. हे प्रकल्प हवेतून ऑक्सिजन शोषून घेतात व ते शुद्ध करून रुग्णापर्यंत पोहोचवले जाते. याशिवाय कोल्हापूर ऑक्सिजन या कंपनीकडून तसेच पुणे, रायगड येथून लिक्वीड ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. एका ठिकाणाहून ऑक्सिजनचा पुरवठा होऊ शकला नाही तर याचा विचार करून पर्यायदेखील तयार ठेवले आहेत.
----
ऑक्सिजन कॉन्संट्रेटर, व्हेंटिलेटरचीही सोय
ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पासाठी १५ कोटींचा खर्च झाला आहे. तुलनेने ऑक्सिजन कॉन्संट्रेटरचा खर्च कमी आहे, त्यामुळे जिल्ह्यात ३५० च्या वर ऑक्सिजन कॉन्संट्रेटरची तयारी ठेवण्यात आली आहे. व्हेंटिलेटरचे बेड, ऑक्सिजनचे बेड वाढवण्यात आले आहेत. ही सगळी आकडेवारी शासकीय रुग्णालयांची आहे. याशिवाय कोल्हापूर शहरातील तीन खासगी रुग्णालयांमध्येदेखील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात आले आहेत.
------