शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
4
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
5
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
6
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
7
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
8
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'
9
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
10
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
11
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
12
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
13
डेस्कटॉप पुन्हा फॉर्मात! वेगवान कामगिरी आणि सोयीमुळे मागणीत वाढ
14
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
15
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या
16
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
17
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
18
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
19
...तर तुम्हा-आम्हाला स्वस्त वीज मिळेल! खासगी कंपन्यांच्या प्रवेशाने महाराष्ट्राच्या वीज बाजारात स्पर्धा वाढणार
20
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग

थेट पाईपलाईनचा मार्ग खडतरच

By admin | Updated: December 12, 2014 23:36 IST

‘वन्यजीव’ची कारवाई; काम थांबविण्याची नामुष्की ओढविल्याने योजना वर्षभर रखडणार

कोल्हापूर : शहरवासीयांचे गेल्या तीन दशकांचे स्वप्न असलेल्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेला केंद्र शासनाने ४२५ कोटींचा निधी उपलब्ध केला. यानंतर वाढलेल्या ६० कोटी खर्चाची जमवाजमवही महापालिकेने केली. आता वन्यजीव विभागाची परवानगी नसल्याने योजनेचे काम थांबविण्याची नामुष्की ओढविली आहे. ‘प्रस्ताव पाठवून परवानगी घेऊ,’ असे अधिकारी सांगत असले तरी ‘वन्यजीव’च्या परवानगीचा मार्ग खडतर आहे. परवानगीची संपूर्ण प्रक्रिया किमान एक वर्षाची असल्याचे सूत्रांनी सांगितले. योजनेला आवश्यक सर्व परवानग्या मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या ‘युनिटी’ सल्लागार कंपनीची अकार्यक्षता व अधिकाऱ्यांच्या निव्वळ दिखाऊपणामुळे योजनेलाच खो बसण्याची वेळ आली आहे. वन्यजीव विभागाची परवानगी न घेताच पाईपलाईनसाठी दाजीपूर अभयारण्य परिसरात बुधवारी (दि. १०) महापालिकेने वृक्षतोड व भूसपाटीकरणाचे काम हाती घेतले. ‘वन्यजीव’ची परवानगी नसल्याने वनक्षेत्रपाल एस. एस. पाटील यांनी ते बंद पाडले. योजनेतील एकूण ५२ किलोमीटरपैकी ४५ किलोमीटरच्या पाईपलाईनचे सर्वेक्षण ठेकेदाराने पूर्ण केले आहे. पाईप टाकण्याच्या पहिल्या टप्प्यात महापालिकेने २१ किलोमीटरसाठी वन विभाग, जिल्हा परिषद, पाटबंधारे विभाग व पीडब्ल्यूडीकडे जागा ताब्यात देण्यासाठी प्रस्ताव पाठविला आहे. संपूर्ण पाईपलाईन सरकारी जागेतून जाणार असल्याच्या सल्लागार कंपनीच्या अहवालानुसार ठेकेदाराने कामास सुरुवात केली. प्रत्यक्षात कोणत्याच विभागाची रीतसर परवानगी अद्याप मिळालेलीच नाही. याचा पहिला दणका वन्यजीव विभागाने दिला. आता ‘वन्यजीव’कडे परवानगीसाठी अर्ज पाठवू, अशी वल्गना अधिकारी करीत आहेत. मुळात वन्यजीव विभागाच्या परवानगीचे त्रांगडे व किचकट प्रक्रियाच महापालिका प्रशासन किंवा सल्लागार कंपनीने समजावून घेतलेली नाही. योजना रखडल्याने दरमहा ४० लाखांचा बोजा नागरिकांवर पडणार आहे. (प्रतिनिधी)