शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण रक्षणाची जबाबदारी ‘एसएफआय’वर

By admin | Updated: February 15, 2015 23:47 IST

विनोद गोविंदवार : शिक्षण बचाव परिषद; भगत सिंग यांच्या नावाने अध्यासनाचा ठराव

कोल्हापूर : बाजारीकरण, चिकित्सक दृष्टिकोनाऐवजी वाढत चाललेला धर्मांधतेचा शिरकाव यापासून शिक्षण क्षेत्राचे संरक्षण करण्याची जबाबदारी स्टुडंट्स फेडरेशन आॅफ इंडियापुढे आहे़ विद्यार्थ्यांच्या एकजुटीने हे आव्हान पार पाडण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे प्रतिपादन स्टुडंट्स फेडरेशन आॅफ इंडियाचे (एसएफ आय)चे माजी राज्य सचिव विनोद गोविंदवार यांनी केले़ ते संघटनेच्या वतीने येथील शाहू स्मारक भवनमध्ये मंगळवारी आयोजित शिक्षण बचाव परिषदेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते़ राज्य सचिव दत्ता चव्हाण यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन झाले़ अध्यक्षस्थानी डॉ़ सुभाष जाधव होते़ गोविंदवार म्हणाले, बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये शैक्षणिक परिसरातील लोकशाही मूल्यांचे अस्तित्त्वच संपविण्याचा प्रयत्न सुरू आहे़ शिक्षणाचे जमातीकरण करणे सुरू आहे़ जगातील प्रत्येक शोध प्राचीन काळी आपल्याच देशात लागलेला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी विज्ञान परिषदांमध्ये जाहीरपणे सांगत आहेत; त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात बुद्धिप्रामाण्यवादी दृष्टिकोनाला खीळ बसत आहे़ गुजरात येथील शाळांमध्ये शिकविल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांचा संदर्भ देत गोविंदवार म्हणाले, प्रदेश, वंश, भाषा यांबाबत शिक्षण व्यवस्थेतूनच द्वेष निर्माण करण्याचे षड्यंत्र प्रतिगाम्यांनी सुरू केले आहे. या षड्यंत्राविरोधात समाजात जागृती करण्याचे काम आता ‘एसएफआय’ला करायचे आहे़ अध्यक्षीय भाषणात डॉ़ सुभाष जाधव म्हणाले, सर्वांना शिक्षण, सर्वांना काम याबाबत ‘एसएफ आय’ने नेहमीच अग्रणी भूमिका घेतली आहे़ संघटनेने देशभरात केलेल्या आंदोलनामुळेच ६ ते १४ वयोगटातील बालकांसाठी सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा सरकारला करावा लागला़ सर्वसामान्यांंना शिक्षण मिळण्यासाठी संघटना लढा देईल़ सध्याच्या सरकारचा दृष्टिकोन धोकादायक आहे़ श्रमिकांची पिळवणूक करणारे अनेक कायदेही मोदी सरकार करीत आहे़ धर्माच्या नावाखाली भांडणे लावून घटनेतील धर्मनिरपेक्षतेलाच हरताळ फासला जात आहे़ अशा परिस्थितीमध्ये शहीद भगतसिंग यांनी अंगीकारलेला समाजवादी दृष्टिकोन पुढे नेणे आवश्यक आहे, असे मतही डॉ़ जाधव यांनी व्यक्त केले़या परिषदेत संघटनेचे राज्य अध्यक्ष मोहन जाधव, माजी राज्य सचिव उमेश देशमुख यांनी मार्गदर्शन केले़ स्वागताध्यक्ष अनिल म्हमाने यांनी ठराव मांडले़ मीरा कांबळे यांनी सूत्रसंचालन केले, तर अक्षय जाधव यांनी आभार मानले़ ( प्रतिनिधी )