शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

वसुली, मूल्यमापन, हिशेब... येथे सारंच चालतं आलबेल

By admin | Updated: April 16, 2015 00:23 IST

नागरिकांच्या नशिबी हेलपाटे : कर्मचाऱ्यांची अवघ्या दोन तासांची सेवा; घरफाळा कार्यालय म्हणजे ‘आओ- जाओ घर तुम्हारा’

संतोष पाटील - कोल्हापूर-शहरातील घरफाळा विभागाची ए, बी, सी, डी वॉर्डसाठी एक व ई वॉर्डशी एक अशी दोन कार्र्यालयांत विभागणी आहे. येथील मूल्यमापन लिपिकासह इतर बहुतांश कर्मचारी सकाळी नऊ ते दहा व त्यानंतर दुपारी चार ते सहा या वेळेत कार्यालयात भेटतात. इतरवेळी ते काय करतात, कुठे जातात, दिवसभर नेमके किती मिळकती व घरफाळ्याची वसुली तसेच मूल्यमापन कशाचे व किती केले, याचा हिशेब होत नाही. ‘आओ-जाओ, घर तुम्हारा’ अशीच येथील कार्यालयाची गत आहे. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी गुणात्मक व संख्यात्मक किती काम केले याचा आढावा घेतल्यास येथील यंत्रणेवर आपोआपच चाप बसणार आहे. ई-आॅफिस प्रणालीबरोबरच कर्मचाऱ्यांच्या कामाच्या पद्धतीकडेही आयुक्तांनी लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.घरफाळ्याबाबत एखादी तक्रार किंवा शंका असल्यास त्याचे निवारण त्या विभागातील मूल्यमापन लिपिकच करू शकतो. वरिष्ठ हात वर करून मोकळे होतात, संबंधित लिपिकांपर्यंत पोहोचण्यास किमान सहा ते सात फेऱ्या नागरिकांना माराव्या लागत असल्याचे चित्र आहे. बिलातील फरक किंवा तक्रारींबाबत संबंधित लिपिकाकडे बोट दाखवून वरिष्ठ नामानिराळे होतात, तर नागरी सुविधा केंद्राची चूक, संगणकीय यंत्रणेत असलेला दोष अशी जुजबी कारणे देत कर्मचाऱ्यांकडून हात वर करण्याचे प्रकार येथे सुरू आहेत. आयुक्तांनी पकडलेला १० लाख रुपयांच्या दंडात दिलेली सूट हा प्रकारही ‘संगणकीय चूक’ म्हणत वरिष्ठ अगदी किरकोळ समजत आहेत. प्रत्यक्षात ही चूक नसून ‘सायबर क्राईम’ असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अशा प्रकारच्या चुकांसाठीही यापूर्वी परस्पर फौजदारी करण्याचे प्रकार घडले आहेत. ‘सापडला तो चोर; त्यात तो आपला असेल तर बाळ्या; दुसऱ्याचा असेल तर भामटा’ अशा पद्धतीने तक्रारीकडे पाहण्याचा घरफाळा विभागात पायंडा आहे. हाच पायंडा मोडण्याचे आव्हान आयुक्तांसमोर आहे. (समाप्त)मात्र, चार वर्षांपूर्वी शहरातील एका मोठ्या औद्योगिक समूहाला लाखो रुपयांचा घरफाळा न भरताच त्याची बाकी शून्य दाखविण्याची किमया येथील महाभागांनी केली आहे. या प्रकरणाची पोलीस चौकशीनंतर याचे पाळेमुळे थेट आयुक्त कार्यालयापर्यंत पोहोचल्याचे सिद्ध झाले होते. मात्र, काही महिन्यांनंतर सर्व काही आलबेल झाले. घरफाळ्याची झाडाझडती करण्याचे काम आयुक्तांना हाती घ्यावे लागणार आहे.कच्च्या पावतीद्वारे भरलेला घरफाळा प्रत्यक्षात मनपाच्या तिजोरीत गेला किंवा नाही याची माहिती पुढील वर्षीच्या घरफाळ्याची पावती आल्यानंतर समजते. यामध्ये काही गफलत केल्यास याची माहिती फक्त मनपातील संबंधित यंत्रणा व मालकांनाच समजते. या प्रक्रियेत नसलेल्या त्रयस्थाला यातील घोळ सहजासहजी समजत नाही. हीच घरफाळा विभागातील खरी मेख आहे. अशाप्रकारे कच्च्या पावत्या देऊन केलेला आणखी एक घोटाळा मिटविण्याचा प्रकार सुरू आहे. मात्र, याच्या खोलापर्यंत जाण्याचे धाडस वरिष्ठांनी दाखविलेले नाही. येथील घोटाळ्याचे चक्रव्यूह आयुक्त पी. शिवशंकर भेदणार की मागील अनेक प्रकरणांप्रमाणे खमंग चर्चेअंती विषय बासनात गुंडाळून पडणार हाच खरा औत्सुक्याचा विषय आहे.