तुरंबे : शिक्षकांनी नवोपक्रमाच्या माध्यमातून आपली ओळख जपली पाहिजे. गोल्बल शिक्षक रणजितसिंह डिस्ले यांनी कयु आर कोडची ओळख व महत्त्व शिक्षण प्रक्रियेत आणले. या उपक्रमातुन ते जगाच्या पटलावर आले .म्हणजे नवोपक्रम आपल्या जीवनाला कलाटणी देऊ शकतात, यासाठी शिक्षकांनी नवोपक्रम करावेत, असे प्रतिपादन तज्ज्ञ मार्गदर्शक सातापा शेरवाडे यांनी केले.
विद्यामंदिर ठिकपुर्ली (ता. राधानगरी) येथे प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या शिक्षण परिषदेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिक्षण विस्तार अधिकारी आर. एल. तळेकर होते.
यावेळी शेरवाडे म्हणाले, नवोपक्रम किंवा कृती संशोधन हे नवीन दिशा देतात. शिक्षण प्रक्रिया रोज बदलत आहे. आपले ज्ञान नेहमी अद्ययावत ठेवले पाहिजे. जेवढे शिक्षक अपडेट राहतील. तितके विद्यार्थी सक्षम होतील.
यावेळी तज्ज्ञ मार्गदर्शक दीपक पोवार, शिवाजी बारड, प्रदीप पाटील, मृणाली भस्मे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी तुरंबे केंद्रातील एन. एम. एम. एस. व शिष्यवृती परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या मुख्याध्यापक आणि मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक एस. के. पाटील, आर. आर. पाटील, डी. डी. चौगले, मधुकर हिंगे, श्रीकांत मोरे, धनाजी जाधव, सेवक शेटगे, अशोक पाटील, सुकुमार कांबळे, एकनाथ संकपाळ, शशिकुमार पाटील, दत्तात्रय जाधव उपस्थित होते. आभार संजय जितकर यांनी मानले.