शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

फोटोग्राफीत तंत्रज्ञानाची गरुडभरारी...

By admin | Updated: August 19, 2015 00:15 IST

-शशिकांत ओऊळकर फोटोग्राफीने नवनवीन तंत्रज्ञानाची गरूडभरारी घेतली आहे. झपाट्याने तंत्रज्ञानाच्या शिरकाव्यामुळे फोटोग्राफी व्यवसाय, छंदाला नवा लुक मिळाला आहे.

 विविध नामांकित कंपनीचे पाच हजारांपासून २० लाखांपर्यंतचे कॅमेरे बाजारात उपलब्ध आहेत. मोबाईलच्या जमान्यात फोटोग्राफीला उतरती कळा लागेल, असे वाटत होते; परंतु फोटोग्राफी व्यवसायावर फारसा परिणाम झाला नाही. उलट अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे फोटोग्राफीला नवा आयाम प्राप्त झाला. एरियल फोटोग्राफीसाठी ड्रोन कॅमेरा (हेलीकॅम) वापरले जात आहे. या अनुंषगाने आज, बुधवारी जागतिक छायाचित्रदिनानिमित्त येथील सुभाष फोटो प्लॅनेटचे व्यवस्थापक शशिकांत ओऊळकर यांच्याशी ‘लोकमत’ने साधलेला थेट संवाद..... पहिले अत्याधुनिक मशीन कोल्हापुरातजगातील सर्वांत अत्याधुनिक अशी १३ मिनिटांत फोटो प्रिंटिंग करणारी देशात पहिली मशीन येथील आमच्या सुभाष फोटोमध्ये १९९० मध्ये आणली. यामुळे ग्राहकांना १३ मिनिटांत फोटो प्रिंटिंग करून देणे शक्य झाल्याचेही ओऊळकर यांनी सांगितले.फोटोग्राफी सुरुवातीच्या टप्प्यात कशी होती?सन १९३५च्या दरम्यान ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट फोटोग्राफीचा काळ होता. त्यावेळी फोटोग्राफरलाही डेव्हलप केल्यानंतरच छायाचित्र कसे आले आहे हे कळत होते. त्यामुळे फोटोग्राफी अचूक करण्याची कसोटी लागत होती. अशा काळात पहिल्यांदा बेळगावात २३ जानेवारी १९७४ या सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीदिनी स्टुडिओ सुरू केला. त्यानंतर फोटोग्राफीतील प्रत्येक टप्प्यातील बदल बारकाईने पाहात आहे. फोटोग्राफी दिवसेंदिवस प्रगल्भ होत आहे. ग्राहकांसाठी नवा लुक आणि दर्जा दिला जात आहे. कोल्हापुरातही सुभाष फोटोने वेगळे स्थान निर्माण केले आहे. फोटोग्राफीत कौशल्याला काय महत्त्व आहे ?एकाच व्यक्तीने एकाच कॅमेऱ्यातून काढलेले छायाचित्र वेगवेगळे असतात. फोटोग्राफी व्यवसायात कौशल्य आणि दृष्टी याला फार महत्त्व आहे. पूर्वी कौशल्य, तंत्रज्ञान पिढीजात व्यवसायातून शिकले जात होते. मात्र, आता कार्यशाळा आयोजित करून कौशल्याचे धडे दिले जात आहेत. विविध फोटोग्राफीचे धडे देणारे अभ्यासक्रम आहेत. पुणे, मुंबई, दिल्ली येथेही पदविका, पदवीचे अभ्यासक्रम शिकविले जात आहे. इतके महत्त्व फोटोग्राफीला येत आहे. कोणकोणत्या क्षेत्रात फोटोग्राफीला स्थान आहे ?कौटुंबिक, सार्वजनिक कार्यक्रमांत फोटोग्राफीचा वापर एकेकाळी अधिक होता. आता सर्वच क्षेत्राशी प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे फोटोग्राफीशी संबंध येत आहे. मॉडेलिंग, फॅशन, औद्योगिक, मार्केटिंग, आर्किटेक्चर, वाईल्ड लाईफ, वृत्रपत्र, चित्रपट अशी फोटोग्राफी वाढते आहे. करिझ्मा, अल्बम, फोटो बुक्स, आॅफसेट फोटो अल्बम, ग्रिटिंग कार्ड, कॅलेंडर्स, बायोडाटा, कोलाज प्रिंटिंग, ४० ते १५० इंचापर्यंतचे मोठे फोटोप्रिंटिंगला मागणी वाढली आहे. परिणामी तरुण पिढी फोटोग्राफीकडे वळत आहे. परवडतील अशा दरात नामांकित किमतीचे कॅमेरे मिळत असल्याने सर्वसामान्य लोकही छंदापोटी फोटोग्राफी करीत आहे. वस्तूचे आॅनलाईन मार्केटिंग करण्यासाठी फोटोचा वापर वाढला आहे. नवीन इमारत बांधल्यानंतर देव, देवतांचे फोटो लावण्याचा फंडा मागे पडला आहे. अलीकडे प्रत्येक खोलीत कुटुुंबातील व्यक्तीचा वेगवेगळ्या पोझचे मोठे फोटो लावले जात आहेत. फोटोग्राफीला चांगले दिवस येत असल्यामुळे नवीन पिढी येत आहे. आर्थिक स्थैर्य मिळवीत आहेत.डिजिटल फोटोग्राफीचा विस्तार कधीपासून झाला?सन १९९० पासून डिजिटल फोटोग्राफीचा विस्तार वेगाने झाला. या तंत्रामुळे फोटोतील दर्जा सुधारला. फोटो काढल्यानंतर काही क्षणांतच फोटोग्राफरला आणि ज्यांचा फोटो काढला आहे त्यांना फोटो कसा आला ते सहज पाहता येऊ लागले. एकाचेच अनेक फोटो काढले तरी नुकसान नाही. काढलेल्यात चांगल्या फोटोची निवड करून प्रिंट करता येऊ लागली. यामुळे संबंधित कार्यक्रमातील फोटो तो कार्यक्रम संपण्यापूर्वीच पाहता येऊ लागले. संगणकावर फोटोवर संस्कार करणे सोपे झाले आहे. गिफ्ट आर्टिकल्स काय आहे ?आजच्या युगात गिफ्ट आर्टिकल्सचे प्रमाण वाढले आहे. वाढदिवस, लग्न समारंभ अशा कोणत्याही कार्यक्रमात गिफ्ट दिली जाते. यामुळे फोटोग्राफीसोबत गिफ्ट गॅलरीही सुरू आहे. गिफ्टवर स्वत:चा किंवा ज्यांना द्यायचे आहे त्यांचा फोटो प्रिंट करून देण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. आमच्या सुभाष फोटोने गिफ्ट गॅलरी सुरू केली आहे. फोटोग्राफीत आताचे नवीन तंत्रज्ञान कोणते ?ड्रोनद्वारे एरियल फोटोग्राफीचे नवीन तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानाद्वारे लाखो लोकांच्या गर्दीचा फोटोही एकाच फोटोत टिपणे शक्य झाले आहे. कोल्हापुरात या तंत्रज्ञाचा वापर करून फोटो काढले जात आहेत. एकाच छताखाली सर्व प्रकारचे फोटो काढण्याची सेवा देणारे स्टुडिओ निर्माण होत आहेत. आयडेंटी, कपल, फॅमिली, चिल्ड्रन, मॉडेलिंग, टेबल टॉप, प्रॉडक्स या फोटोग्राफीचे वेगवेगळे दालन उघडले जात आहे. - भीमगोंडा देसाई चौथी पिढी....सन १९३५ मध्ये बेळगावमध्ये शंभू आप्पाजी अ‍ॅन्ड सन्स या नावे फोटो स्टुडिओ सुरू केला. ग्राहकांना दर्जेदार सेवा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे ‘सुभाष फोटो’चा विस्तार कोल्हापूरसह सांगली, रत्नागिरी, गोवा, येथे झाला आहे. प्राजक्त, शंभू, विक्रांत यांच्या रूपाने चौथी पिढी या व्यवसायात कार्यरत आहे. ८ मार्च २०१५ रोजी शाहूपुरीतील नव्या इमारतीमध्ये ‘सुभाष फोटो प्लॅनेट’ सुरू केले आहे. स्टुडिओ, कॅमेरे, गिप्ट आर्टिकल्सचे स्वतंत्र दालन नव्या इमारतीत आहे. ग्राहकांना काय हवे आणि जगात फोटोग्राफीत नवीन तंत्रज्ञान काय आहे त्याचा अभ्यास करून सेवा देण्यात ओऊळकर बंधू प्राधान्य देत आहेत, असे शशिकांत ओऊळकर यांनी सांगितले.