शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
2
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
3
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
4
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
5
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
6
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
7
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
8
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
9
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
10
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
11
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 
12
सवतीचे घर बळकावण्यासाठी क्रेनचा वापर; साथीदारांसह घरात घुसून केली मारहाण
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
14
"ते मराठीत न बोलल्याने भाषेला भोकं पडणार का?’’, अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान
15
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   
16
WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला
17
हे सारं मी त्यांच्या सांगण्यावरून केलं, बनावट दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनचा धक्कादायक दावा   
18
IND vs ENG 4th Test Day 2 Stumps: मॅच आधी गिलनं ज्यांना डिवचलं त्या दोघांनीच दमवलं; शेवटी...
19
Asia Cup 2025 : बीसीसीआय UAE च्या मैदानात स्पर्धा घेणार; भारत-पाक हायहोल्टेज मॅचही पाहायला मिळणार?
20
Anshul Kamboj vs Ben Duckett: अंशुल कंबोजची पहिली टेस्ट विकेट! बेन डकेट 'नर्व्हस नाइंटी'चा शिकार

पाडव्याची खरेदी कोट्यवधीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2016 00:39 IST

बाजारपेठेत इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची धूम : सोने, चांदीसह दुुचाकी आणि चारचाकी वाहनांचीही खरेदी

कोल्हापूर : वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दिवाळी पाडव्याला बाजारपेठेत स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची धूम होती. याशिवाय ‘पारंपरिक खरेदी’ म्हणून सोने-चांदी, दारात दुचाकी, चारचाकीचे आगमन अशा शुभशकुनांनी दिवाळी पाडवा साजरा करण्यात आला. आकर्षक योजना, नावीन्यपूर्ण उत्पादने आणि कर्ज सुविधांचा फायदा घेत ग्राहकांनी खरेदीचा यथेच्छ आनंद लुटला़ वर्षातील साडेतीन मुहूर्ताला खरेदी केली की घरात सुख-समृद्धी नांदते, अशी एक श्रद्धा आहे. त्यामुळे प्रत्येक मुहूर्ताला कमी-अधिक प्रमाणात विविध वस्तूंची खरेदी केली जाते. मात्र, दिवाळी हा वर्षातला सर्वांत मोठा सण असतो. भिशी, बोनस, वाढीव पगार, यांमुळे नागरिकांची क्रयशक्तीही वाढलेली असते. त्यामुळे इतरवेळी शक्य असो वा नसो दिवाळी पाडव्याला प्रत्येकाच्या घरी एका नवीन वस्तूचे आगमन होतेच. सणाची खरेदी म्हणजे सोने-चांदी ही पारंपरिक मागणी आता मागे पडली आहे. त्याऐवजी महिलांचे काम हलके करणाऱ्या आणि आनंद देणाऱ्या वॉशिंग मशीन, फ्रीज, ओव्हन, फुड प्रोसेसर, एलईडी, मोबाईल होमथिएटर, सीडी प्लेयरसारख्या वस्तूंना प्राधान्य दिले जाते. त्यामुळेच इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेत या उत्पादनांना मोठ्या प्रमाणावर मागणी होती़ इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या खरेदीसाठी टेंबे रोड, शाहू स्टेडियम, शिवाजी स्टेडियम, राजारामपुरी, शाहूपुरी, महाद्वार येथील शोरूम्स गर्दीने फुलली होती. याशिवाय होम अ‍ॅप्लायन्सेस, दुचाकी, चारचाकी वाहनांची खरेदी मोठ्या प्रमाणात करण्यात आली. तसेच अनेकांच्या दारात नव्या कोऱ्या दुचाकी-चारचाकीचे आगमन झाले. ग्राहकांनी हजारोंच्या संख्येने दुचाकी-चारचाकी गाड्या खरेदी केल्या. या खरेदीवरही कंपन्यांच्यावतीने कमीत कमी डाऊन पेमेंट, कमीत कमी व्याजदर, एक्स्चेंज आॅफर आणि खरेदीवर हमखास बक्षीस अशा आकर्षक योजना जाहीर करण्यात आल्या होत्या. त्याचा लाभ कंपन्यांना आणि ग्राहकांनाही झाला. सोने-चांदी ‘एव्हरग्रीन’ मुहूर्ताच्या दिवशी अन्य वस्तूंचे कितीही मागणी वाढली तरी सोने-चांदीच्या बाजारपेठा नेहमीच गजबजलेल्या असतात. दिवाळीनंतर लग्नाचे मुहूर्त सुरू होतात त्यामुळे पाडव्याच्या मुहूर्तावर महिलांनी विवाहाच्या खास अलंकारांच्या खरेदीवर भर दिला. त्यात अंगठी, चेन, लहान मोठे मंगळसूत्र, गंठण, बांगड्या, कानातले टॉप्स अशा दागिन्यांची खरेदी करण्यात आली, तर तरुणाईला हिऱ्यांच्या अंगठ्यांनी आकर्षित केले. मुहूर्ताला वळे, सोन्याचे नाणी अशा चोख सोन्याची खरेदी केली जाते. मात्र, आता मंदीचे सावट थोडे दूर होत आहे त्यामुळे ग्राहकांनी चोख सोन्याऐवजी तयार दागिन्यांच्या खरेदीला पसंती दिल्याची माहिती महेंद्र ज्वेलर्सचे भरत ओसवाल यांनी दिली. चांदीमध्ये पूजेचे साहित्य, पैंजणाची खरेदी करण्यात आली. एकदम पैसा घालून एखादी वस्तू खरेदी करणे मध्यमवर्गीय कुटुंबांना परवडत नाही, ही बाब लक्षात घेऊन इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांकडून शून्य टक्के व्याजदर आणि झिरो डाऊन पेमेंटवर खरेदीची आॅफर देण्यात आली आहे. तीन कागदपत्रे जमा केले की एक रुपयाही न भरता वस्तू घरात येते, हे लक्षात आल्याने ग्राहकांनी या योजनेचा पुरेपूर वापर केला. त्यामुळे अशा स्कीम्सवर एलईडी, फ्रीज, वॉशिंग मशीन, डिव्हीडी प्लेअर विथ होमथिएटर, फूड प्रोसेसर, ओव्हन अशा इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आल्याची माहिती राजाकाका ई-मॉलचे दीपक केसवानी यांनी दिली. मोबाईल टेक्नॉलॉजीवर भर दहा वर्षांपूर्वी साधा मोबाईल खरेदी करणेही कुणाच्या आवाक्यात नव्हते. मात्र, आता स्मार्ट फोनच्याही पुढे जाऊन फोर जीसारख्या टेक्नॉलॉजी असलेल्या मोबाईलची मागणी होत आहे. पाडव्यादिवशी बाजारपेठेत ओपो, सॅमसंग, जिओनी, विवो या कंपन्यांच्या मोबाईलना ग्राहकांनी पसंती दिल्याची माहिती स्टारलाईट मोबाईलचे यासीर बागवान यांनी दिली. महागडे मोबाईल घेतले की त्यांची काळजीही तेवढीच घ्यावी लागते. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेसाठी मोबाईल कव्हरसारख्या अ‍ॅक्सेसरिजनाही वाढती मागणी होती. भाऊबीजेनिमित्त बहिणीला स्मार्टफोन गिफ्ट करण्याकडे भावांचा कल होता.