शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

‘किंगमेकर’ होण्याची शिवसेनेला संधी शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2017 00:15 IST

जागा वाढवण्याला वाव : गटबाजीला लगाम आवश्यक

विश्वास पाटील ल्ल कोल्हापूरविधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वांत घवघवीत यश मिळालेल्या कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत गतनिवडणुकीच्या तुलनेत कामगिरी सुधारण्याची संधी या पक्षाला चालून आली आहे. सत्तेच्या चाव्या या पक्षाच्या हातात येण्याची चिन्हे दिसत आहेत. मागच्या सभागृहात या पक्षाला सहा जागा होत्या. त्या या वेळेला दुप्पट झाल्या तरी चांगले यश मिळाले, असे म्हणायला हरकत नाही.दहापैकी सहा आमदार (साठ टक्के) यश पक्षाला अन्य कोणत्याच जिल्ह्यात मिळालेले नाही. तसा कोल्हापूर हा कधीच शिवसेनेचा बालेकिल्ला नव्हता व नाही. कोल्हापूर शहरातून यापूर्वी या पक्षाला संधी मिळाली तरी त्यामध्ये काँग्रेसमधल्या बेदिलीचा व निष्क्रिय उमेदवाराचा वाटा जास्त आहे. शिवसेनेचे सहा आमदार असे म्हणताना नेहमी हे लक्षात ठेवले पाहिजे की, हे यश पक्षीय संघटनात्मक ताकदीचे नव्हे. आमदार राजेश क्षीरसागर हे त्याला काही प्रमाणात अपवाद ठरू शकतील. अन्य पाच आमदार स्थानिक परिस्थितीत जी प्रस्थापित नेतृत्वाच्या विरोधात नाराजीची, सहानुभूतीची, बदलाची पोकळी तयार झाली, त्यामध्ये घुसून आमदार झाले आहेत. ते होताना त्यांची व्यक्तिगतही राजकीय ताकद तेवढी नाही. त्या-त्या मतदारसंघातील छुपे गट, दोन नंबरचे नेते यांची आणि तत्कालीन जातीय, राजकीय समीकरणे, साखर कारखानदारीतील राजकारणाचे पडसाद यांचा एकत्रित परिणाम झाल्यावर या आमदारांना गुलाल मिळाला. त्यातही चंद्रदीप नरके व सत्यजित पाटील यांचा विजय तर एक हजाराच्या आतील मताधिक्यातील आहे. लोकांनी कुणाला पाडायचे हे निवडणूक लागल्यावर ठरवले होते. ते करण्यासाठी जो उपलब्ध पर्याय होता, त्याचा पक्ष, नेतृत्व हे काहीच न पाहता लोकांनी मते दिल्याने शिवसेनेला हे यश मिळाले.सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे कागल तालुक्यातील संजय मंडलिक-संजय घाटगे गट यावेळेला शिवसेनेसोबत आहे. तो गतनिवडणुकीत काँग्रेसच्या चिन्हावर लढून पाचही जागा जिंकला होता. या तालुक्यात काटाजोड लढती असल्या, तरी वारसांना संधी दिल्याने काही नाराजी असली तरी या दोन्ही नेत्यांची तालुक्यात गट म्हणून ताकद आहे आणि कार्यकर्ते गटाच्या अस्मितेसाठी मतदान करतात, अशी त्या तालुक्याची खासियत आहे. त्यामुळे या निवडणुकीत कागलसह, करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, हातकणंगले तालुक्यात पक्षाला चांगली संधी आहे. भुदरगडमध्ये आमदार प्रकाश आबिटकर हे स्थानिक आघाडी करून लढत आहेत. शिवसेनेची सगळ्यांत मोठी अडचण कोणती असेल तर ती सहा आमदार, संपर्कप्रमुख, सहसंपर्कप्रमुख आणि तीन जिल्हाप्रमुख आणि तितकेच त्यांचे गट यांना एकत्रित जिल्हा पातळीवर बांधून ठेवू शकेल, अशा नेतृत्वाची वानवा. त्यामुळे वरकरणी संघटना आक्रमक दिसत असली तरी ती आतून गटबाजीने पोखरलेली आहे. ती इतकी पोखरली आहे की खासगीत दोन आमदार एकमेकांचा उल्लेख करताना समोरच्याला लाज वाटेल इतक्या खालच्या पातळीवर जाऊन करतात. आमदारांचा एक गट आणि शिवसेनेचा वेगळा असे चित्रही अनेक मतदारसंघांत दिसते. मूळचा शिवसैनिक त्यांच्या कामासाठी जिल्हाप्रमुखाकडे हक्काने जातो; परंतु तो आमदारांची पायरी कधी चढत नाही; कारण आमदारांच्या दरबारात तो खिजगणतीतही नाही. अशी संघटना एकीकडे व लोकप्रतिनिधी दुसरीकडे असे चित्र असल्याने शिवसेनेचा प्रभाव म्हणावा तेवढा पडलेला नाही. जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे व मुरलीधर जाधव यांनी गावोगावी फिरून सच्चा कार्यकर्त्यांना चार्ज केले आहे. शिवसेनेत उमेदवार कोण आहे यापेक्षा धनुष्यबाण बघून मतदान करणाराही वर्ग आहे. त्या बळावर या निवडणुकीत शिवसेनेने चांगली वातावरण निर्मिती केली आहे.मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरून भाजपबरोबरची युती तुटल्याने जिल्ह्यातही त्यांच्याबरोबर युती होण्याची शक्यता नाही. त्याचा परिणाम म्हणून शिवसेना जेवढ्या जास्त जागा घेईल तेवढा भाजप सत्तेपासून दूर जाणार आहे. महापालिका निवडणुकीपासून तटस्थ राहिलेली शिवसेना भाजप-ताराराणीला सत्तेपासून दूर लोटण्यासाठी काँग्रेससोबत गेली. तोच फॉर्म्युला जिल्हा परिषदेतही आकारास येणार आहे. यंदा नवीनच बेरजा..गत निवडणुकीवेळी शिवसेनेचे चंद्रदीप नरके, डॉ. सुजित मिणचेकर आणि राजेश क्षीरसागर हे आमदार होते. त्यातील क्षीरसागर यांचा मतदारसंघ शहरी आहे. नरके यांनी त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील पाच जागा जिंकल्या. आमदार मिणचेकर यांना एका जागेवर समाधान मानावे लागले. आता या निवडणुकीकडे पाहताना काही बेरजा झाल्या आहेत.