शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

पाचवीच्या वर्गात एकच विद्यार्थी

By admin | Updated: June 30, 2015 00:25 IST

अब्दुललाटची जि.प.ची शाळा : लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नाने पुन्हा वर्ग फुलला

दगडू कांबळे - अब्दुललाट -सन २०१५चे शैक्षणिक वर्ष सुरू झाले आणि नेहमी भेडसावणारा विद्यार्थ्यांच्या कमतरतेचा विषय सुरू झाला. येथील जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेत पहिल्याच दिवशी इयत्ता पाचवीच्या वर्गात एकच विद्यार्थी हजर राहिला. बाकीचे सर्व विद्यार्थी न्यू इंग्लिश स्कूल अब्दुललाट या शाळेत दाखल झाले. ही अवस्था पाहून प्राथमिक शाळेतील गुरुजींचे धाबे दणाणले. तत्काळ त्यांनी लोकप्रतिनिधींशी संपर्क साधून परिस्थितीची जाणीव करून दिली. त्यानंतर लोकप्रतिनिधी आणि खासगी शाळांचे शिक्षक, संचालक यांच्यात सुरू झाला संघर्षाचा ताकतुंबा. या दोहोतील संघर्षानंतर जिल्हा परिषदेच्या शाळेतील चौथी पास झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा बोलवण्यात आले आणि विद्यार्थ्यांविना पोरक्या झालेल्या शाळेत परत पाचवीचा पट भरल्यावर या संघर्षनाट्यावर पडदा पडला. त्यामुळे आता जबाबदारी आहे ती शाळेची गुणवत्ता वाढवायची की शाळाच बंद पाडायची याची.१६ जूनला शैक्षणिक वर्ष सुरू झाले. काहीजण कित्ता गिरविण्यासाठी दाखल झाले, तर काहीजण पहिली ते चौथीपर्यंत कित्ता गिरवून पाचवीमध्ये प्रवेश केलेले विद्यार्थी मात्र गावातीलच न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दाखल झाले आणि ‘प्राथमिक’चा वर्ग रिकामा पडला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जि. प. सदस्य दादासाहेब सांगावे, सरपंच शानाबाई कोळी, सदस्य मिलिंद कुरणे, माजी सरपंच श्रीकांत मधाळे, आदींकडून ‘त्या’ विद्यार्थ्यांना परत इकडे आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. त्यासाठी त्यांच्या पालकांची बैठक घेतली. या बैठकीला दस्तुरखुद्द आमदारही उपस्थित राहिले. बैठकीत पालकांचे मन वळविण्याचा प्रयत्न सुरू झाला. या सर्व प्रयत्नानंतर पालकांकडून एकच उत्तर मिळाले की, केंद्रीय प्राथमिक शाळेची गुणवत्ता कमी होत चालली आहे. त्यामुळे आमच्या मुलांना दुसऱ्या शाळेत घालत आहोत. यावेळी सर्वांचे म्हणणे ऐकल्यावर आमदारांसह सर्वच लोकप्रतिनिधींनी शाळेचा १५० वर्षांचा इतिहास पाहता ती बंद पडता कामा नये, यासाठी प्रयत्न करूया. तरी पण पालक ऐकेनात. शेवटी सर्व लोकप्रतिनिधींनी त्या पालकांना विनंती केली. यात आमदार उल्हास पाटीलही मागे राहिले नाहीत. यानंतर प्रत्येक महिन्याला शाळेची गुणवत्ता तपासली जाईल. जर यात शिक्षक कमी पडले, तर त्यांच्या बदल्या केल्या जातील, अशी हमी दिल्यानंतर पालकांना पाझर फुटला. त्यामुळे परत प्राथमिकचा पाचवीचा वर्ग फुलला.शिक्षक, पालक यांचीही जबाबदारीप्राथमिक शाळेची ढासळत चाललेली प्रतिमा आणि गुणवत्तेकडे लक्ष देणे गरजेचे बनले आहे. तेथील शिक्षकांवर अंकुश ठेऊन गुणवत्तेबाबत त्यांच्यावर दबावतंत्राचा वापर केला पाहिजे आणि शाळेच्या गरजांकडे लक्ष देणे, अशी कर्तव्ये पार पाडली पाहिजेत. पालकांनीही आपल्या पाल्याविषयी जबाबदारी झटकून चालणार नाही, त्यांनीही शाळेकडे आणि आपल्या पाल्याकडे प्रगतीची खातरजमा करून घेतली पाहिजे. एवढे केले तरच मिळवले, नाही तर प्रतिवर्षी विद्यार्थ्यांची पळवापळवी होतच राहणार आहे.