शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

अन्न भेसळ नव्हे स्लो पॉयझनिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2017 00:11 IST

तरुणपणातच जडते अर्धशिषी अन् अनेक आजार

आमचा काळच वेगळा होता, भाजी-भाकरी खायचो; पण आजारी पडत नव्हतो...’ हे जेव्हा वडीलधारी सांगतात त्यावर ‘हायब्रिड’चा जमाना आहे. हे उत्तर मिळतं. रासायनिकदृष्ट्या पिकवलेले फळे, कडधान्यांमुळे आरोग्यावर दुष्परिणाम होत असतानाच अन्न भेसळ हे भलतंच डोकं वर काढत आहे. यामुळे अप्रत्यक्षपणे ‘स्लो पॉयझनिंग’सारखे काम करत आहेत. त्यामुळे आजच्या पिढीला तरुणपणाच नको ते आजार जडत आहेत. एकेकाळी काटा मारणे म्हणजे, ‘मापात पाप’ समजले जात होते; पण अलीकडच्या काही दशकांपासून जास्त पैसा कमविण्याच्या हव्यासापायी अनेक व्यापारी फळांवर रासायनिक प्रक्रिया करतात. दैनंदिन आहारातील अन्नपदार्थांमध्ये भेसळ केली जात आहे. यातून तान्हुल्यांना दिले जाणारे दूधही सुटलेले नाही. गेल्यावर्षी मॅगीतील भेसळ हे प्रकरण खूपच गाजलं होतं. त्यानंतर खऱ्या अर्थाने भेसळीचा शरीरावर होणारा परिणाम सर्वसामान्यांमध्ये चर्चेला गेला. अन्न पदार्थांचे वजन वाढविण्यासाठी सर्वसाधारणपणे खडे, माती, पाला, झाडांच्या काड्यांचा वापर केला जातो. काही वेळेस दुधाची घनता वाढविण्यासाठी तेल, युरियासारख्या पदार्थांचाही वापर केला जातो. भेसळयुक्त पदार्थ शरीरावर संथगतीने परिणाम करतात. लहान मुलांची प्रतिकार शक्ती कमी असल्यास लवकरच दमा, डोकेदुखी, मधुमेह, शरीरावर व्रण उमटणे, अ‍ॅलर्जी यासारखे आजार जडत आहेत. त्यामुळे चार जिने चढून गेले तरी धाप लागणे, हातपाय थरथरणे, शरीरातील आंतरअवयव निकामी होण्याचेही धोके वाढत आहेत.सर्वच प्रकारचे जंकफूड हे चवीला चटपटीत लागलात. त्यामुळे नेहमीच्या जेवणापेक्षा या पदार्थांसाठी हट्ट धरला जातो. लहान मुलांचा हट्ट पुरविण्यासाठी ते आपणच आणून देतो. मात्र, शरीराला गरज नसलेले पदार्थ खाण्यात आल्याने वजन वाढण्याच्या तक्रारीही वाढत आहेत.फळांचे इंजेक्शनचा धोकाअनेकदा फळांना इंजेक्शन दिले जाते. त्यामुळे शरीरावर विपरीत परिणाम होण्याचा धोका असतो.जगदीश कोष्टी